A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : बुधवार
आजची दिनांक : ११ / ०९ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००१
अमेरिकेत ठिकठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २९९६ लोक ठार झाले. यावेळी अध्यक्ष जॉर्ज बुश यांना तातडीने अज्ञातस्थळी हलवले गेले. अमेरिकेचे जर एखाद्या देशाशी अणूयुद्ध झालेच तर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षिततेसाठी अमेरिकेत ७५ हून अधिक ठिकाणी जमिनीखाली विषेश व्यवस्था तयार ठेवण्यात आलेली आहे. पेंटॅगॉन या अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात सुमारे दहा कोटी डॉलरचे नुकसान झाले.
(Image Credit: University of Amsterdam)
१९७२
नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित ‘तरुण तुर्क, म्हातारे अर्क’ या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला. थिएटरमधील पहिला प्रयोग ५ आक्टोबर १९७२ रोजी मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदिरात झाला.
१९६५
भारत पाक युद्ध – भारतीय सैन्याने लाहोरजवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.
१९१७
फर्डिनांड मार्कोस – फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (१९६५ - १९८६)
(मृत्यू: २८ सप्टेंबर १९८९)
(Image Credit: On This Day)
१९१५
पुपुल जयकर – सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या अभ्यासक आणि पुरस्कर्त्या, पद्मभूषण (१९६७)
(मृत्यू: २९ मार्च १९९७ - मुंबई)
(Image Credit: Wikipedia)
१९१२
बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत – नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री (१९५५), इजिप्त, नॉर्वे, ब्रिटन इ. देशांतील भारताचे राजदूत
(मृत्यू: ५ ऑक्टोबर १९९२)
(Image Credit: औंध.इन्फो)
१९११
नानिक अमरनाथ भारद्वाज तथा लाला अमरनाथ – भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर
(मृत्यू: ५ ऑगस्ट २००० - नवी दिल्ली)
(Image Credit: ESPN CricInfo / WISDEN)
१९९८
क्रीडामहर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक
(जन्म: १० आक्टोबर १९०९ - अहमदनगर, महाराष्ट्र)
(Image Credit: ENNS - Past Students’ Association)
१९८७
महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, कादंबरीकार व लघुकथाकार, हिंदी साहित्याच्या छायावादी परंपरेतील चार आधारस्तंभांपैकी एक स्तंभ, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, ‘यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८२) देण्यात आला.
(जन्म: २६ मार्च १९०७ - फरुखाबाद, उत्तर प्रदेश)
(Image Credit: Wikipedia)
१९७१
निकिता क्रूश्चेव्ह – सोविएत युनियनच्या मंत्रिपरिषदेचे अध्यक्ष
(जन्म: १५ एप्रिल १८९४)
(Image Credit: Wikipedia)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
देवा, तुमचं कसं व्हायचं?
एक लाकूडतोडया लाकूड तोडण्यासाठी नदीकाठच्या झाडावर चढला असता, त्याची लोखंडाची कुर्हाड खाली असलेल्या खोल डोहात पडली. त्याला पोहता येत नसल्याने, डोहात उडी मारुन कुर्हाड काढता येईना. साहजिकच तो नदीच्या काठी बसून रडू लागला.
त्याला रडताना पाहून देव तिथे प्रकट झाला व त्याने एकामागून एक सोन्याची-चांदीची-तांब्याची-पितळेची व शेवटी लोखंडाची अशा पाच कुर्हाडी त्या डोहातून काढून त्याला दाखविल्या. परंतू त्यापैकी 'लोखंडाची कुर्हाड हीच आपली' असे त्याने सांगितल्यामुळे देवाने त्याच्या प्रामाणिकपणावर प्रसन्न होऊन, त्याला पाचही कुर्हाडी इनाम म्हणून दिल्या.
तिथून देवलोकी गेल्यावर देवाने ही गोष्ट आपल्या 'देवी' ला सांगितली. ती ऎकून देवी म्हणाली, 'सध्याच्या काळी एवढा प्रामाणिक माणूस मिळणं कठीण. मला तरी दाखवा तो माणूस.'देवीच्या आग्रहाखातर, देव तिला घेऊन भूलोकी लाकूडतोडयाच्या गावाबाहेर आला आणि लाकूडतोडयाच्या प्रामाणिकपणाची थोडीशी झलक देवीला दाखविण्यासाठी त्याने एक युक्ती योजली.
त्या लाकूडतोडयाची बायको गावाबाहेरच्या शेतावर गेली असता, देवाने मायेच्या योगाने तिला नाहीशी केली व देवीसह तो एका झुडपाआड दडून बसला.बराच वेळ झाला तरी शेतावर गेलेली बायको घरी परतली नाही म्हणून तो लाकूडतोडया शेतावर गेला व तिचा शोध घेऊ लागला. बराच वेळ शोध घेऊनही जेव्हा ती सापडेना, तेव्हा त्यानं ढसढसा रडत तिला हाका मारायला सुरुवात केली.
त्याला रडताना पाहून देव देवीला म्हणाला, 'देवी ! हाच बरं का तो प्रामाणिक लाकूडतोडया. आता मी तुला त्याच्या प्रामाणिकपणाचा नमुना दाखवतो.'याप्रमाणे बोलून देव देवीसह त्या लाकूडतोडयाजवळ गेला व त्याने त्याला विचारले, 'बा लाकूडतोडया ! तू का बरं रडतोस ?''माझी शेतावर आलेली बायको नाहीशी झाली म्हणून', लाकूडतोडयानं उत्तर दिलं. यावर देव म्हणाला, 'थांब रडू नकोस. मी तुला एकामागून एक पाच बायका दाखवतो त्यातील तुझी कोणती ते खरं सांग, म्हणजे मी तिला तुझ्या स्वाधीन करीन.'
याप्रमाणे बोलून देवानं तोंडानं कसलातरी मंत्र पुटपुटुन तिथे एक अप्सरेसारखी सुंदर व तरुण स्त्री निर्माण केली आणि तिच्याकडे बोट दाखवून त्यानं लाकूडतोड्याला विचारल, 'हिच का तुझी बायको ?'त्या स्त्रिचं रंगरुप पाहून मोहित झालेला तो लाकूडतोडया बेधडक म्हणाला, 'होय देवा ! हीच ती माझी हरवलेली माघारीण!'त्याची ती लबाडी पाहून देवीनं आपल्या पतीकडे अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं.
त्याबरोबर देव भडकून त्या लाकूडतोडयाला म्हणाला, 'मी तुला प्रामाणिक समजत होतो, पण तु लुच्चा आहेस. ही तुझी बायको आहे काय ?'यावर तो लाकूडतोडया स्वत:ची बाजू सावरण्यासाठी म्हणाला, 'देवा, तुमचा गैरसमज होतोयं. मागच्यावेळी पाच कुर्हाडी दाखवून, अखेर माझ्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून तुम्ही त्या पाचही कुर्हाडी मला बक्षीस दिल्यात. मग आताही पाच बाया दाखवून माझ्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून त्या पाचही जणींना तुम्ही मला बक्षीस दिल्यात, तर त्यांच मी पोषण कसं करु? म्हणून मी ही पहिलीच बाई माझी बायको असल्याचे तुम्हाला सांगितले.
'तुझं म्हणणं बरोबर आहे' असं म्हणून देवानं ती स्त्री त्याच्या स्वाधीन केली आणि देवीसह तो देवलोकी जाऊ लागला. वाटेने जाताना देवी त्याला म्हणाली, 'देवा ! बारीकसारीक गोष्टीत प्रामाणिकपणा दाखवणार्या माणसाचा तो प्रामाणिकपणा मोठया आणि महत्त्वाच्या गोष्टीत टिकत नाही. त्या लाकूडतोड्यानं चातूर्याच्या जोरावर तुम्हाला चक्क फसवलं देवा, तुमचं कसं व्हायचं?
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.