A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : गुरुवार
आजची दिनांक : १२ / ०९ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००५
हाँगकाँगमधील डिस्नेलँड (Disney Land, Hong Kong) सुरू झाले.
(Image Credit: Wikiwand)
१९९८
डॉ. जयंत नारळीकर यांना ‘पुण्यभूषण’ पुरस्कार प्रदान
१९८०
तुर्कस्तानमधे लष्करी उठाव
१९३०
विल्फ्रेड र्होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे १,११० वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला.
(Image Credit: Wikipedia)
१९४८
मॅक्स वॉकर – ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फूटबॉलपटू
(मृत्यू: २८ सप्टेंबर २०१६)
(Image Credit: WISDEN)
१९१२
फिरोझ जहांगीर घंडी तथा फिरोझ गांधी – १९५० ते १९५२ मधील हंगामी संसद सदस्य,पहिल्या (प्रतापगढ, उत्तर प्रदेश) व दुसऱ्या (रायबरेली, उत्तर प्रदेश) लोकसभेतील खासदार, इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी, द नॅशनल हेराल्ड आणि द नवजीवन या वृत्तपत्रांचे संपादक
(मृत्यू: ८ सप्टेंबर १९६०)
(Image Credit: Wikipedia)
१८९७
आयरिन क्यूरी ज्योलिओट – नोबेल पारितोषिक विजेत्या (१९३५) फ्रेन्च भौतिक व रसायनशास्त्रज्ञ
(मृत्यू: १७ मार्च १९५६)
(Image Credit: Wikipedia)
१९९६
पं. कृष्णराव रामकृष्ण चोणकर – मराठी व गुजराती संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते, एक तपाहून अधिक काळ ‘गंधर्व नाटक मंडळी’मध्ये नटसम्राट बालगंधर्वांचे नायक म्हणून त्यांनी काम केले.
(जन्म: ? ? ????)
१९९६
पद्मा चव्हाण – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री, स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना म्हणून ख्याती असलेल्या पद्मा चव्हाणांच्या नाटकांच्या जाहिरातींत त्यांच्या नावाआधी ‘मादक सौंदर्याचा अॅटम बॉम्ब’ असे छापले जात असे. ‘महाराष्ट्राची मर्लिन मनरो’ व ‘सौंदर्याचा अँटम बॉम्ब’ हे किताब आचार्य अत्रे यांनी त्यांना बहाल केले होते.
(जन्म: ७ जुलै १९४८ - कोल्हापूर)
(Image Credit: IMDb)
१९९२
पं. मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, (ग्वाल्हेर घराण्याचे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य). नीलकंठबुवा अलुरमठ आणि (जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र) मंजी खाँ व भुर्जी खाँ असे तीन गुरू त्यांना लाभले, पद्मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले.
(जन्म: ३१ डिसेंबर १९१०)
(Image Credit: सतीश पाकणीकर)
१९८०
चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचे मुंबई-गोवा महामार्गावर ‘मंतरलेली चैत्रवेल’ हे नाटक घेऊन चाललेल्या नाटक कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत जळाल्याने निधन झाले.
(जन्म: १४ डिसेंबर १९३९)
(Image Credit: IMDb)
१९८०
चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग यांचे मुंबई-गोवा महामार्गावर ‘मंतरलेली चैत्रवेल’ हे नाटक घेऊन चाललेल्या नाटक कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत जळाल्याने निधन झाले.
(जन्म: २ मार्च १९२५)
(Image Credit: Cinestaan)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
पांडित्य सत्कारणी लावा
पांड्य राजाच्या पदरी असलेल्या पंडीत कोलाहल याची बुध्दी असामान्य होती. त्याच्याकडे येणार्या पंडिताने एखादे असत्यच नव्हे, तर सत्य विधान जरी केले, तरी पंडीत कोलाहल हा आपल्या तरल कल्पकतेच्या जोरावर ते विधान असत्य असल्याचे सिध्द करी.आपल्या पदरी असलेल्या या पंडिताचा पांड्य राजाला मोठा अभिमान वाटत होता, म्हणून त्याने एक पण जाहीर केला, 'जो कोणी माझ्या समक्ष या माझ्या पंडीत कोलाहलांचा बोलण्यात पराभव करील, त्याला एक हजार सुवर्ण मोहोरा तर देण्यात येतीलच, पण त्याशिवाय त्याची दरबारात, पंडीत कोलाहल शास्त्र्यांच्या जागी नेमणूक केली जाईल.
राजाने केलेला हा पण सर्वत्र जाहीर झाल्याने, देशोदेशीचे गाढे विद्वान त्याच्या दरबारी आले, पण पंडीत कोलाहल यांच्याकडून ते पराभूत झाल्याने, शरणागती लिहून देऊन परत गेले !एकदा भाष्याचार्य नावाचे पंडित आपला पट्टशिष्य यमुनाचार्य याच्यासह पांड्य राजाच्या दरबारी आले. भाष्याचार्य आपला पराभव करण्यासाठीच आले असल्याचे समजताच पंडीत कोलाहल पुढं आला आणि म्हणाला, ' भाष्याचार्य ! तुम्ही कोणतंही विधान करा; मी ते खोटं असल्याचं सिध्द करुन दाखवीन.''खरं असलं, तरीही ते खोटं असल्याचं तुम्ही सिध्द कराल का?' भाष्याचार्यांनी प्रश्न केला.
पंडीत कोलाहल म्हणाला, 'अर्थात ! ते तर माझ्या अचाट बुध्दीचं वैशिष्ट्य आहे.' भाष्याचार्यांनी आव्हान दिलं, 'मग बाप हा अगोदर आणि नंतर मुलगा हे माझं विधान खोटं असल्याचं सिध्द करा पाहू?'यावर पंडीत कोलाहल म्हणाला, 'तुमचं म्हणणं साफ चुकीचं आहे. 'मुलगा हा अगोदर आणि नंतर बाप' ही वस्तुस्थिती आहे. जोवर मुलगा झालेला नसतो, तोवर त्या माणसाला कुणी बाप म्हणत नाही. एखाद्याला मुलगा झाल्यानंतरच त्याला बाप म्हटल जातं म्हणजे अगोदर मुलगा आणि नंतर बाप. तेव्हा भाष्याचार्यजी ! तुम्ही मला निमूटपणे शरणागती लिहून द्या आणि इथून निघून जा.'
आपल्या गुरुचा शरणागती लिहून देण्याकडे कल झुकला असल्याचे पाहून शिष्य यमुनाचार्य पुढे सरसावून म्हणाला, 'पंडीत कोलाहल शास्त्रे ! बुध्दीच्या जोरावर ही तुम्ही केवळ शाब्दिक कसरत चालविली आहे. तरीही मी तीन विधाने करतो, ती खोट असल्याचं जर तुम्ही सिध्द केलतं, तर मी तुम्हाला नुसतीच शरणागती लिहून देणार नाही, तर मी तुमचा अजन्म सेवक होईन. मात्र तुम्ही माझे विधाने खोडू शकला नाहीत, तर राज दरबारातील ही वैभवशाली नोकरी सोडून आपलं पुढलं उर्वरीत आयुष्य तुम्ही अशिक्षीतांना व गोरगरिबांना शिक्षण देण्यात घालवाल का ?'
पंडीत कोलाहलांनी होकार देताच, पंडित यमुनाचार्य म्हणाला, 'माझं पहिलं विधान असं आहे की, तुम्ही ज्यांच्या आश्रयाला आहात ते पांड्य महाराज भरतखंडाचे भूषण आहेत,माझं दुसरं विधानं असं आहे की, पांड्य महाराजांची राणी सुनीतीदेवी ही थोर पतिव्रता आहे,'आणि माझं तिसरं विधानं असं आहे की, पांड्य महाराज व राणी सुनीतीदेवी यांना देवानं शतायुषी करावं, अशी तुमची, माझीच नव्हे, तर सर्व प्रजेची मनोमन इच्छा आहे.''यमुनाचार्य ही जी तीन विधाने केली, पांड्य महाराजांच्या समोर खोडून काढणं म्हणजे मृत्युला आमंत्रण आहे.' हे हेरुन पंडीत कोलाहलाने ती विधाने मान्य केली; तरुण यमुनाचार्याला शरणागती लिहून दिली आणि राजदरबारातील नोकरी सोडून, तो अशिक्षित व गरीब लोकांना सुशिक्षित करण्यासाठी उरलेलं आयुष्य खर्च करण्यासाठी निघून गेला.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.