A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : सोमवार
आजची दिनांक : १६ / ०९ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
१९९७
संस्कृत भाषेसंदर्भात प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल मुंबई येथील मराठा मंदिर संस्थेच्या वरळी हायस्कूलमधील संस्कृतचे निवृत्त शिक्षक पं. गुलाम दस्तगीर अब्बासअली बिराजदार यांना ’राष्ट्रीय संस्कृत पंडित’ हा राष्ट्रपतींकडून दिला जाणारा पुरस्कार जाहीर
१९९७
आय. टी. सी. आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत राजीव बालकृष्णन याने शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत १०.५० सेकंद वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम केला.
१९७५
पापुआ न्यू गिनी या देशाला (ऑस्ट्रेलियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.
(Image Credit: Britannica)
१९४५
दुसरे महायुद्ध – हाँगकाँगमधील जपानी सैन्याने रॉयल नेव्हीसमोर शरणागती पत्करली
१९५६
डेव्हिड सेथ कोटकिन तथा ‘डेव्हिड कॉपरफिल्ड’ – अमेरिकन जादूगार व दृष्टीविभ्रमकार
(Image Credit: विकिपीडिया)
१९५४
पं. संजय बंदोपाध्याय (बॅनर्जी) – सतारवादक
(Image Credit: Wikipedia)
१९४२
नामदेव धोंडो तथा ‘ना. धों.’ महानोर – निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी, विधानपरिषदेचे सदस्य. त्यांना ‘पानझड’ या कवितासंग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. १९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना पद्मश्री पुरस्काराने (१९९१) गौरविण्यात आले आहे.
(Image Credit: @NDMahanor)
१९९४
जयवंत दळवी – साहित्यिक, नाटककार व पत्रकार. कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी लेख असे विविध प्रकार त्यांनी हाताळले. ते ‘ठणठणपाळ’ या टोपणनावाने विनोदी व मार्मिक लेखन करीत.
(जन्म: १४ ऑगस्ट १९२५)
१९७७
केसरबाई केरकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका
(जन्म: १३ जुलै १८९२)
१९७३
पुण्यातील जुन्या पिढीतील सरदार, पर्वती संस्थानचे विश्वस्त, संगीतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक गंगाधरराव नारायणराव तथा आबासाहेब मुजुमदार यांचे निधन. त्यांचे मूळ नाव श्रीधर पांडुरंग प्रभुणे होते. मुजुमदारांकडे ते दत्तक गेले. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाचे ते चोवीस वर्षे चिटणीस होते.
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
यात माझा काय अपराध?
श्री पांडूरंगाला अलंकार वस्त्रे अर्पण करण्यासाठी एक श्रीमंत मनुष्य बऱ्याच दूरच्या गावाहून पंढरपूरास गेला. परंतू मंदिरापाशी जातो, तर त्याला मंदिराचा पुढला दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. मंदिराच्या पायरीवर बसलेला एक पुजारी म्हणाला, 'देव झोपलाय.'
त्या धनवानाला थांबवायला वेळ नव्हता, पण त्याचबरोबर ते वस्त्रालंकार तर त्याला स्वत:च पांडूरंगाच्या अंगावर चढवायचे होते. त्याने सभामंडपात असलेल्या बर्याच बडव्यांनी भेट घेऊन विनवणी केली, पण कुणीच त्याला दाद देईना. एका व्यवहारी बडव्याने मात्र त्या धनिकाला त्याने किती वस्त्रे व अलंकार आणले आहेत ते दाखवायला सांगितले व ते बरेच असल्याची खात्री होताच, तो त्या श्रीमंताला म्हणाला. 'शेट, ठीक आहे. मी दरवाजा उघडतो, तुम्ही माझ्याबरोबर गाभार्यात चला आणि स्वत: पांडूरंगाच्या देहावर पोषाख व अलंकार चढवा.'
त्या बडव्याने त्याप्रमाणे केल्यावर, बाकीचे बडवे त्याच्यावर भडकले. त्यांनी त्या मंदिराच्या विश्वस्तांकडे त्याच्याविरुध्द तक्रार केली. सर्वत्र एकच गहजब सुरु झाला 'या भिकंभटाने देवाची झोपमोड केली !'
अखेर त्या बंडखोर बडव्याच्या नियमबाहय वागण्याबद्दल विचार करुन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी, मंदिराच्या समस्त विश्वस्त व बडवे मंडळीची संयुक्त सभा भरली व तिच्यात त्या अपराधी बडव्याला उपस्थित होण्याचा हुकुम सोडला गेला.
सभेस आलेल्या त्या बडव्याला प्रमुख विश्वस्ताने विचारले, 'पांडुरंग झोपला असताना तू गाभाऱ्याचं दार उघडून त्या धनिकाला आत नेलेस व पांडुरंगाला अलंकार वगैरे अर्पण करण्याची तू त्याला मुभा दिलीस, हे खरे आहे का?'त्या बडव्यानं उत्तर दिलं, 'खरं आहे.' विश्वस्तानं विचारलं, 'तू असं का केलसं?'बडवा - सोन्यारत्नांचे अलंकार ही 'लक्ष्मी' आहे, हे आपल्याला मान्य आहे.विश्वस्त - होय.
बडवा - पांडुरंग हा मूळचा विष्णू आहे, हे आपल्याला मान्य आहे ?विश्वस्त - मान्य केलंच पाहिजे.
बडवा - मग आता तुम्हीच सांगा, की पती झोपेत असला तरी त्याच्याकडे जाण्याचा पत्नीला अधिकार असल्यामुळे, मी त्या अलंकाररुपी लक्ष्मीला तिच्या पतीकडे जाऊ दिले, यात माझा काय अपराध ?या बिनतोड युक्तीवादामुळे ती सभा निरुत्तर झाली आणि भिकभंटाची स्वारी सर्वानुमते निरपराध ठरली.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा. ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.