A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : सोमवार
आजची दिनांक : २३ / ०९ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००२
‘मोझिला फायरफॉक्स’ या ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.
१९८३
‘सेंट किट्स आणि नेव्हिस’चा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश
(Image Credit: Wikipedia)
१९०८
कॅनडातील ‘युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा’ ची स्थापना
(Image Credit: University of Alberta)
१९०५
आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी ‘कार्लस्टॅड’ कराराद्वारे अलग होण्याचा निर्णय घेतला.
१९५२
अंशुमान दत्ताजीराव गायकवाड – क्रिकेटपटू, भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक (दोन वेळा)
(Image Credit: ICC Cricket)
१९४३
तनुजा – चित्रपट अभिनेत्री
(Image Credit: Bollywood Life)
१९२०
प्रा. भालचंद्र वामन तथा ‘भालबा’ केळकर – लेखक व अभिनेते, ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’ या नाट्यसंस्थेचे एक संस्थापक
(मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८७)
(Image Credit: दैनिक प्रहार)
२०१९
माधव लक्ष्मण आपटे – क्रिकेटपटू, मुंबईचे नगरपाल (१९८३)
(जन्म: ५ ऑक्टोबर १९३२)
(Image Credit: CricketMASH)
२०१४
शंकर वैद्य – साहित्यिक
(जन्म: १५ जून १९२८)
२०१२
कांतिलाल गिरीधारीलाल व्होरा ऊर्फ के. लाल – जादूगार
(जन्म: ? ? १९२४)
२००४
डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष
(जन्म: २८ जानेवारी १९२५)
१९८७
राजेन्द्र कृष्ण – गीतकार कवी व पटकथालेखक
(जन्म: ६ जून १९१९)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
पाचशे साक्षीदार
एका लबाड सावकाराने एका शेतकर्याचे झोपडीवजा घर भाडयाने घेतले. पंधरावीस वर्षे त्याने ते आपल्या नोकरांना रहाण्यासाठी वापरले व त्याचे त्या शेतकर्याला भाडेही दिले. पण पुढे त्या शेतकर्याला भाडे दयायचे बंद केले व ते घर आपलेच आहे, असे तो म्हणू लागला. हा व्यवहार विश्वासावर झाल्याने, त्या शेतकर्यापाशी लेखी पुरावा नव्हता. तरीही त्याने ते घर आपल्याला मिळावे म्हणून त्या सावकाराविरुध्द न्यायालयात दावा केला.
न्यायालयात दावा सुनावणीला निघण्याच्या आदल्या दिवशी रात्री तो लुच्चा सावकार पाचशे रुपयांची थैली घेऊन न्यायमुर्तीकडे गेला. त्यांना म्हणाला, 'साहेब ! ती झोपडी जरी त्या शेतकर्याची असली, तरी मी त्याला तिचं गेली वीस वर्षे भाडं दिलेलं आहे. ती जर माझ्या मालकीची झाली, तर ती पाडून मी तिच्या जागी माझ्या दुसर्या मुलासाठी बंगला बांधीन. तेव्हा हे पाचशे रुपये घ्या आणि उद्या न्यायालयात माझ्या बाजूनं निकाल द्या.' त्या न्यायाधीशाने काहीएक न बोलता ती पाचशे रुपयांची थैली घेतली.
सावकार मोठया खुषीत आपल्या घरी निघून गेला.दुसर्या दिवशी न्यायालयात दावा सुनावणीला निघाला असता न्यायमूर्तींनी त्या सावकाराला विचारले, ' ईश्वराला स्मरून सांगा की, ती झोपडी खरी कुणाची आहे? कारण या शेतकर्यांच म्हणणं असं आहे की, ती त्याची आहे.'
सावकार ईश्वराची शपथ घेऊन म्हणाला, 'साहेब ! ती झोपडी माझीच होती आणि आजही माझीच आहे. म्हणून तर ती माझ्या ताब्यात आहे. या गावातले एक दोनच नव्हे, तर शंभर साक्षीदार ती झोपडी माझी आहे, सांगण्यासाठी मी न्यायालयात उभे करु शकेन.'न्यायमुर्तींनी त्या शेतकर्याला विचारलं, 'काय रे बाबा, ती झोपडी तुझी आहे, हे सिध्द करणारा एखादा पुरावा आहे का तुझ्यापाशी ? निदान 'ती झोपडी तुझी आहे.' असं सांगणारा, या गावातला एकादा साक्षीदार तरी तू इथे आणू शकशील का?'
दु:खी स्वरात शेतकरी म्हणाला, 'नाही साहेब. सावकार श्रीमंत असल्याने, जेव्हा त्याने त्याच्या गडी माणसांना रहाण्यासाठी ती झोपडी माझ्याकडे मागितली, तेव्हा तो माझी गरीबाची झोपडी गडप करणार नाही अशा विश्वासाने मी ती त्याच्याकडून काहीएक लिहून न घेता त्याच्या स्वाधीन केली. गेली बरीच वर्षे त्याने मला त्या झोपडीचे भाडेही दिले. पण जेव्हा त्याने भाडे देण्यास नकार दिला व ती झोपडी आपलीच असल्याचे सांगू लागला, तेव्हा मला न्यायालयात यावे लागले.
पैसा व दरारा यांच्या जोरावर सावकार शंभरच नव्हे तर पाचशे साक्षीदारसुध्दा त्याच्या बाजूने उभे करील, पण मज गरीबाची बाजू घेऊन, या सावकाराला दुखविण्याचं धारिष्ट या गावात कोण करील ?'सावकार म्हणाला, 'ऎकलतं ना साहेब, किती खोटं बोलतो आहे हा ? ती झोपडी याचे आहे असं सांगणारा एकही लेखी पुरावा याच्यापाशी नाही, आणि एकही साक्षीदार हा इथे आणू शकत नाही, तेव्हा ती झोपडी माझी आहे, हे आपल्याला पटले ना ?'न्यायमुर्ती सावकाराला म्हणाले, 'तुझी बाजू सत्याची आहे, असं सांगणारे शंभर साक्षीदार तू माझ्यापुढे आणायला तयार आहेस, पण ती झोपडी या शेतकर्याची आहे असं सांगणारे पाचशे साक्षीदार अगोदरच माझ्याकडे आलेले आहेत.'याप्रमाणे बोलून व आदल्या दिवशी सावकाराने लाच म्हणून दिलेले पाचशे रुपये टेबलावर ठेवून, न्यायमुर्ती त्याला म्हणाले, ' ती झोपडी त्या शेतकर्याची असूनही ती गिळंकृत करण्यासाठी काल तू माझ्या घरी आणून लाचेखातर मला दिलेले हे पाचशे रुपये या शेतकऱ्याची बाजू न्यायाची आहे, असं ठणकून सांगणारे पाचशे साक्षीदार आहेत. तेव्हा तू आज संध्याकाळपर्यंत ती झोपडी या शेतकऱ्याला द्यावीस . तू मला लाच देण्याचा प्रयत्न केलास म्हणून तू सरकारात १००० रुपये दंड भरावा, आणि लाच म्हणून तू मला देऊ केलेले हे पाचशे रुपये तू या शेतकर्याला त्या झोपडीची डागडुजी करण्यासाठी द्यावे, असा मी निर्णय देत आहे.'
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा. ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.