A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : बुधवार
आजची दिनांक : २५ / ०९ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
१९४१
‘प्रभात’चा ‘संत सखू’ हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला.
(Image Credit: @hinduaesthetic)
१९२९
जनरल जेम्स हॅरॉल्ड डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडींग केले.
(Image Credit: Pioneers of Flight)
१९६९
हॅन्सी क्रोनिए – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान
(मृत्यू: १ जून २००२)
(Image Credit: Cricket Country)
१९४६
बिशन सिंग बेदी – फिरकी गोलंदाज
(Image Credit: CricketMASH)
१९२८
माधव यशवंत गडकरी – पत्रकार, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, मुंबई सकाळ, गोमंतक इत्यादी वृत्तपत्रांचे संपादक. १९९२ मध्ये निवृत्त झाल्यानंतर ते मुंबई चौफेर या वृत्तपत्रात नियमित एक सदर लिहीत असत. पद्मश्री (१९९०)
(मृत्यू: १ जून २००६)
(Image Credit: मैत्री २०१२)
२०२०
दाक्षिणात्य चित्रपटातील गायक, चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक, पद्मश्री (२००१), पद्मभूषण (२०११) व पद्मविभूषण (२०२१ - मरणोत्तर) पुरस्कार विजेते श्रीपती पंडिताराध्युला तथा एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांचे Covid-19 मुळे निधन
(जन्म: ४ जून १९४६)
(Image Credit: Wikipedia)
२०१३
शंकर नारायण तथा शं. ना. नवरे – लेखक, नाटककार व पटकथाकार. मध्यमवर्गीय माणसाचे अनुभव व भावनाविश्व रेखणाऱ्या कथानकांसाठी ते ओळखले जातात. ‘शन्नाडे’ या नावाने त्यांनी वृत्तपत्रांतूनही स्तंभलेखन केले आहे. तिळा उघड, जत्रा, कोवळी वर्षं, इंद्रायणी, सखी, खलिफा, भांडण, बेला, झोपाळा, वारा, निवडुंग, परिमिता, मनातले कंस, शहाणी सकाळ, बिलोरी, मार्जिनाच्या फुल्या, अनावर, एकमेक, मेणाचे पुतळे, सर्वोत्कृष्ट शन्ना, तिन्हीसांजा, शांताकुकडी, कस्तुरी, पर्वणी, झब्बू, पाऊस, निवडक, पैठणी, असे त्यांचे एकूण २७ कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. एक असतो राजा, मन पाखरू पाखरू, धुक्यात हरवली वाट, नवरा म्हणू नये आपला, ग्रँड रिडक्शन सेल, सुरुंग, धुम्मस, सूर राहू दे, हवा अंधारा कवडसा, गहिरे रंग, गुलाम, वर्षाव, रंगसावल्या, हसत हसत फसवुनी, मला भेट हवी हो ही त्यांची नाटकं प्रसिद्ध आहेत. शं.ना. नवरे यांनी जयवंत दळवी यांच्या ‘महानंदा’ या कादंबरीवरून लिहिलेले ‘गुंतता हृदय हे’ हे नाटक अतिशय गाजले आहे.
(जन्म: २१ नोव्हेंबर १९२७)
(Image Credit: लोकसत्ता)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
मोहिनी
एका धिप्पाड व शक्तीमान राक्षसानं आपल्याला सिध्दी प्राप्त व्हावी म्हणून भगवान शंकराची तपश्चर्या सुरु केली.खडतर अशा तपश्चर्येनंतर शंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले व म्हणाले, ' हे राक्षसा ! तू केलेल्या तपश्चर्येवर मी प्रसन्न झालो आहे; तेव्हा तू कोणताही एक वर माग. मी तो तुला देइन.'यावर तो तामसी वृत्तीचा राक्षस म्हणाला, ' हे शंकरा ! मी ज्याच्या ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन, त्याचे त्याचे भस्म होऊन जाईल, अशी सिध्दी तू मला दे. मला दुसरे तिसरे काही नको.'या राक्षसाला आपण हा वर दिला, तर तो काय अनर्थ करुन सोडील, या गोष्टीचा विचार न करता शंकरांनी 'तथाऽस्तु' म्हणून त्याला तो वर दिला व ते तिथून अंतर्धान पावले.
परंतु त्या वरामुळं तो राक्षस एवढा उन्मत्त बनला की, जो दिसेल व त्याला जो नको असेल, त्याच्या मस्तकावर हात ठेवून तो त्याचे भस्म करु लागला. जग त्याला 'भस्मासूर' या नावानं ओळखू लागलं व त्याचं नुसतं नाव निघालं तरी चळचळा कापू लागलं.
एकदा तर भस्मासूर प्रत्यक्ष वर देणाऱ्या शंकरांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांचं भस्म करण्य़ासाठी त्यांचा पाठलाग करु लागला, तेव्हा शंकर मदत मागण्यासाठी विष्णूंकडे गेले.सरळ द्वंद्वयुध्दात या भस्मासुरांपुढं आपला निभाव लागेलच अशी खात्री न वाटल्यानं भगवान विष्णूंनी अत्यंत सुंदर अशा मोहिनी अप्सरेचं रुप घेतलं आणि भस्मासूरासमोर सुंदर अंगविक्षेपांसह नृत्य करायला सुरुवात केली. मोहिनींच ते अलौकिक रुप पाहून बेभान झालेला भस्मासूर, ती नाचेल तसा नाचू लागला व ती हातवारे करी तसे हातवारे करु लागला.
आपल्यावर मोहित झालेला भस्मासूर आता पूर्णपणे देहभान हरपून गेला असल्याचे पाहून, मोहिनीचं रुप घेतलेल्या विष्णूंनी आपला हात आपल्या मस्तकावर ठेवला; त्याबरोबर भस्मासुरानेही मोहिनीचे अनुकरण केले. आणि आपला हात आपल्या मस्तकावर ठेवून, स्वत:च स्वत:चे भस्म करुन घेतले !
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा. ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.