A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : रविवार
आजची दिनांक : २९ / ०९ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२०१२
अल्टमास कबीर यांनी भारताचे ३९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२००८
‘लेहमन ब्रदर्स’ आणि ‘वॉशिंग्टन म्युच्युअल’ या बड्या वित्तीय संस्थांनी दिवाळखोरी जाहीर केल्यामुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा ‘डाऊ जोन्स’ निर्देशांक एका दिवसात ७७८ अंकांनी कोसळला. ही अमेरिकन शेअरबाजारात एका दिवसात झालेली सर्वाधिक घट आहे.
१९९१
हैतीमधे लष्करी उठाव
१९६३
‘बिर्ला तारांगण’ हे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू झाले.
१९४१
दुसरे महायुद्ध – किएव्हमधे नाझींनी ३३,७७१ ज्यूंना ठार मारले.
१९७८
मोहिनी भारद्वाज – अमेरिकन कसरतपटू (Gymnast)
(Image Credit: Wikipedia)
१९५७
ख्रिस ब्रॉड – इंग्लिश क्रिकेटपटू व पंच
(Image Credit: ESPN CricInfo)
१९४३
लेक वॉलेसा – नोबेल शांति पुरस्कार विजेते (१९८३)पोलंडचे राष्ट्राध्यक्ष
(Image Credit: The Nobel Prize)
१९३४
लान्स गिब्ज – वेस्ट इंडीजचा फिरकी गोलंदाज
(Image Credit: ESPN CricInfo)
१९९१
उस्ताद युनुस हुसेन खाँ – आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक
(जन्म: १५ नोव्हेंबर १९२७)
१९१३
रुडॉल्फ डिझेल – डिझेल इंजिनचा संशोधक
(जन्म: १८ मार्च १८५८)
१८३३
फर्डिनांड (सातवा) – स्पेनचा राजा
(जन्म: १४ आक्टोबर १७८४)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
एक लांडगा जंगलात खुप भुकेला होउन हिंडत होता. पण त्याला शिकार मिळत नव्हती. फिरता फिरता एका झाडाच्या ढोलीत त्याला एक ससा बसलेला दिसला आणि लांडग याला खुप आनंद झाला. लांडगा आपल्याच दिशेने येतो आहे हे पाहून सावध झालेला ससा ढोलीतुन उडी मारून जोरात पळत सुटला. लांडगाही त्याच्या मागे धावू लागला. पण शेवटी ससा जोरजोरात पळत खुप पुढे निघून गेला.
लांडगा आधीच भुकेलेला आणि आता पळून पळून थकला होता तो एका झाडाखाली विश्रांती साठी बसला. इतकावेळ ससा आणि लांडग्याची पळापळ झाडावर बसलेला एक कावळा पाहत होता. त्याने खवचटपणे लांडग्याला विचारले, " काय हे , एवढासा ससा तुझ्या हातात सापडला नाही ? असं झाल तर तुझा धाक कसा राहील ?" त्यावर स्वःताची बाजू सावरत लबाड लांडगा म्हणाला," त्याला त्याच्या जीवाची भीती होती म्हणून तो जीवानिशी धावत होता. हे माझ्या लक्षात आल्यावर मी त्याला सोडून दिलं. दुसऱ्याच चांगल होण्यासाठी स्वतःचा थोडा तोटा झाला तरी तो सोसायला हवा.
बोध – स्वार्थापेक्षा परमार्थ श्रेष्ठ.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा. ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.