A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : गुरुवार
आजची दिनांक : २४ / १० / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२०००
थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला. ६ डिसेंबर २००० रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९९७
सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा ‘प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
१९८४
भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.
१९७२
दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी ‘सकाळ रिलीफ फंड’ या संस्थेतर्फे ‘दत्तक बैल योजना’ सुरू करण्यात आली.
१९६४
उत्तर र्होडेशियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.
१९७६
रीमा लांबा ऊर्फ ‘मल्लिका शेरावत’ – अभिनेत्री व मॉडेल
१९२६
केदारनाथ सहानी – सिक्कीमचे राज्यपाल (२००१-२००२), गोव्याचे राज्यपाल (२००२-२००४), दिल्लीचे महापौर
(मृत्यू: ३ आक्टोबर २०१२)
१९२१
रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण – व्यंगचित्रकार, पद्मभूषण (१९७१), रॅमन मॅगसेसे (१९८४), पद्मविभूषण (२००५) इत्यादि पुरस्कारांचे मानकरी
(मृत्यू: २६ जानेवारी २०१५)
१९१४
लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन
(मृत्यू: २३ जुलै २०१२)
१९१०
‘लीला’ ऊर्फ माई भालजी पेंढारकर – मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री
(मृत्यू: ? ? ????)
१८६८
भवानराव श्रीनिवासराव तथा ‘बाळासाहेब’ पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार तसेच व्यायामविषयक पुस्तकांचे कर्ते
(मृत्यू: १३ एप्रिल १९५१)
२०१३
प्रबोधचंद्र डे तथा ‘मन्ना डे’ – पार्श्वगायक. ‘सीमा’, ‘बरसात की रात’, ‘दो बिघा जमीन’, ‘देख कबीरा रोया’ आदी चित्रपटांतील त्यांची गाणी गाजली होती.
(जन्म: १ मे १९१९)
१९९५
माधवराव साने – पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष
(जन्म: ? ? ????)
१९९२
अरविंद गोखले – मराठी नवकथेचे जनक, ‘गंधवार्ता’ या त्यांच्या कथेला आशियाई-अरबी-अफ्रिकी कथा स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. भारतीय उपखंडातील प्रसिद्ध लेखकांच्या लघुकथांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना १९८४ मधे केंद्र सरकारची फेलोशिप मिळाली होती.
(जन्म: १९ फेब्रुवारी १९१९)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
राजा सूर्यसेन
राजा सूर्यसेनचे राज्य प्रतापगड इथपर्यंतच मर्यादित होते. आणखी काही राज्ये त्याच्या अधीन होती. राजाला एक मुलगी होती. ती दिसायला फार सुंदर आणि बुद्धिमान होती. ती लग्नाच्या वयाची झाल्यावर राजाने तिच्यासाठी वर पाहाणे सुरु केले. त्याची इच्छा अशी होती की, आपल्या मुलीचा विवाह वीर आणि बुद्धिमान मुलाशी व्हायला पाहिजे. जो आपल्यानंतर या राज्याचा योग्यप्रकारे सांभाळ करू शकेल. राजकुमारी आणि राज्यावर अनेक राजकुमारांची नजर होती. मात्र राजा सूर्यसेनने एक कठीण अट ठेवली होती. जेव्हा जो कोणी विवाहाचा प्रस्ताव ठेवित असे तेव्हा राजा त्याला संसारातील सर्वात मौल्यवान वस्तू घेऊन ये असे सांगत असे व लोभी व्यक्तींना धडा बसविण्यासाठी त्याने पुढे अट ठेवली होती की ती वस्तू मला आवडली नाही तर मी त्याला कारागृहात टाकणार.अनेक राजकुमार वेगवेगळ्या वस्तू घेऊन आले परंतु राजाने त्या वस्तूंना असहमती दर्शवत त्यांना कारागृहात टाकले. राजाला विश्वास होता की, एक ना एक दिवस कोणी ना कोणी बुद्धीमान वीर पुरुष आपल्या राजकन्येसाठी ही अट पूर्ण करेल. एके दिवशी त्याच्याच राज्यातील एका छोट्या खेडयातील एका शेतक-याचा तरूण मुलगा रघु तीन वस्तू घेऊन राजाकडे आला व अट मान्य करण्याची इच्छा व्यक्त करू लागला. राजाने अनुमती दिली. रघु म्हणाला,’’मी जगातील तीन अनमोल वस्तु आणल्या त्यापैकी पहिली म्हणजे माती, जी आपल्याला अन्न देते, दुसरे म्हणजे पाणी जे भेदाभेद न पाहता सर्वांची तृषा शांत करते, आयुष्य वाचवते आणि तिसरी वस्तू म्हणजे पुस्तक जे सर्वांना समान न्यायाने ज्ञानदान करते, ज्ञानाचा आधार म्हणजे पुस्तक. ज्ञानाची गरज भागविण्याचे काम याच्याकडून केले जाते.’’ राजा या तीनही वस्तू व त्याचे त्यामागचे विचार पाहून ऐकून भारावून गेला. त्याने त्याच्या मुलीचा विवाह रघुशी केला व राज्याचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले.
तात्पर्य- बुद्धिमान लोकांकडूनच जगातील कठिणातील कठीण प्रश्नांची उत्तरे प्राप्त केली जाऊ शकतात.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा. ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.