A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : शुक्रवार
आजची दिनांक : २५ / १० / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००९
बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.
१९९९
दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे ‘बूकर पारितोषिक’ दुसर्यांदा मिळाले.
१९९४
अझीझ मुशब्बर उर्फ ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
(कार्यकाल: २५ ऑक्टोबर १९९४ ते २४ मार्च १९९७)
(Image Credit: scroll.in)
१९४५
अपर्णा सेन – बंगाली अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका, पद्मश्री (१९८७)
(Image Credit: iffk.in)
१८८१
पाब्लो पिकासो – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार
(मृत्यू: ८ एप्रिल १९७३)
(Image Credit: Wikipedia)
२०१२
जसपाल भट्टी – छोट्या पडद्यावरील विनोदी अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक, पद्मभूषण (२०१३)
(जन्म: ३ मार्च १९५५)
(Image Credit: IMDb)
२००९
चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते
(जन्म: १५ जानेवारी १९२३)
(Image Credit: IMDb)
२००३
पांडुरंग वैजनाथ तथा पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ. न्याय, वेदांत व्याकरण आदि शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला. अवघ्या वीस सहकार्यांना बरोबर घेऊन त्यांनी ‘स्वाध्याय परिवार’ सुरू केला. त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे ‘मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.
(जन्म: १९ आक्टोबर १९२० - रोहा, रायगड)
(Image Credit: Swadhyay Online)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
दोन कवड्या
बादशहा अकबराच्या दरबारात कलाकारांना मानसन्मान दिला जात असे. तानसेनासारखा महान संगीतकार अकबराच्या दरबाराची शोभ होती. त्यावेळी तानसेनच्या तुलनेत दुसरा कोणीच संगीतकार नव्हता. त्यामुळे तानसेनला थोडा अहंकार झाला होता. त्यावेळी काही संगीतसाधकांनी आपल्या संगीत साधनेतून ईश्र्वराला लक्ष्य बनवले होते. हे लोक संगीताच्या माध्यमातून ईश्र्वराची उपासना लीन होऊन करत होते. यात अष्टछापचे कवी तसेच वल्लभ संप्रदायाचे काही आचार्य होते. एक दिवस तानसेन आचार्य विठ्ठलनाथ यांना भेटायला गेला. काही वेळ चर्चा केल्यावर तानसेनने विठ्ठलनाथांच्या सांगण्यावरून आपले गायन प्रस्तुत केले. विठ्ठलनाथांनी गायनाची स्तुती केली व तानसेनाला दहा सहस्त्र रूपये व दोन कवड्या इनामाच्या रूपात भेट दिल्या. तानसेनने कवडी देण्याचे कारण विचारले असता विठ्ठलनाथ म्हणाले,’’तुम्ही मुघल दरबाराचे प्रमुख गायक आहात त्यामुळे दहा हजारांचा इनाम देण्यात आला आहे आणि दोन कवड्या ही व्यक्तिगत माझ्या दृष्टीने तुमच्या गायनाची किंमत आहे.’’ तानसेनाला फार वाईट वाटले. तो जायला निघणार इतक्यात श्रीकृष्णाचे दुसरे भक्त गोविंद स्वामी तेथे आले आणि विठ्ठलनाथांच्या आग्रहावरून त्यांनी कृष्णाचे एक पद गायिले. ते ऐकून तानसेनच्या डोक्यात असलेला स्वत:च्या गायनाविषयीचा भ्रम कमी झाला व तो म्हणाला,’’ विठ्ठलनाथजी महाराज, माझ्या गायनाची वास्तवात खरेच किंमत दोन कवड्याइतकीच आहे. मी बादशहाला खुश करण्यासाठी गातो आणि तुम्ही ईश्र्वराला प्रसन्न करण्यासाठी गात असता. मखमल आणि गोणपाट यांची कधीच तुलना होऊ शकत नाही त्याप्रमाणे तुमचे गायन ईश्र्वरी आहे तर माझे मानवी आहे. आपण चांगले केले की माझा अहंकार तोडला’’
तात्पर्य- कोणतेही काम ईश्र्वरासाठी व ईश्र्वराचे कार्य मानुन केल्यास त्यात आपोआपच दैवी गुण प्रकट होतात.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा. ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.