A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : मंगळवार
आजची दिनांक : २९ / १० / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००८
नॉर्थवेस्ट एअरलाईन्सचे डेल्टा एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन डेल्टा एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.
२००५
दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार
१९९९
चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान
१९९७
माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला ‘माणिकरत्न पुरस्कार’ गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर
१९९७
अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा ‘एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ जाहीर
१९९६
स्वदेशात बनविलेली ‘कामिनी’ ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्कम येथे कार्यान्वित करण्यात आली. युरेनिअम-२३३ हे इंधन वापरणारी ही आशियातील पहिली अणूभट्टी आहे.
१९७१
मॅथ्यू हेडन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
(Image Credit: ESPN CricInfo)
१९३१
प्रभाकर तामणे – साहित्यिक व पटकथालेखक. त्यांनी पटकथा लिहिलेले ‘एक धागा सुखाचा’, ‘मधुचंद्र’, ‘रात्र वादळी काळोखाची’ यांसारखे मराठी चित्रपट गाजले. तसंच त्यांच्या कथेवर राज कपूरने काढलेला ‘बीवी ओ बीवी’ हा विनोदी सिनेमाही बऱ्यापैकी गाजला होता.
(मृत्यू: ७ मार्च २०००)
(Image Credit: Bytes of India)
१८९७
जोसेफ गोबेल्स – जर्मनीचा चॅन्सेलर व नाझी नेता. ३० एप्रिल १९४५ रोजी हिटलरने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मृत्युपत्रात लिहिल्याप्रमाणे जोसेफ गोबेल्स हा जर्मनीचा चॅन्सेलर (पंतप्रधान) झाला. मात्र दुसऱ्याच दिवशी आपल्या सहा मुलांना सायनाईड देऊन गोबेल्स व त्याच्या पत्नीने आत्महत्या केली.
(मृत्यू: १ मे १९४५)
(Image Credit: Wikipedia)
२०२०
केशुभाई पटेल – गुजरातचे १० वे मुख्यमंत्री (१४ मार्च १९९५ ते १९ ऑक्टोबर १९९५), ६ व्या लोकसभेतील खासदार (जुनागढ) आणि राज्यसभा सदस्य (१० एप्रिल २००२ ते ९ एप्रिल २००८), पद्मभूषण (२०२१ - मरणोत्तर)
(जन्म: २४ जुलै १९२८)
(Image Credit: OpIndia!)
१९८८
कमलादेवी चट्टोपाध्याय – मॅगसेसे पुरस्कार विजेत्या (१९६६) स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या
(जन्म: ३ एप्रिल १९०३ - मंगलोर, कर्नाटक)
(Image Credit: Wikipedia)
१९८१
दादा साळवी – अभिनेते
(जन्म: ? ? ????)
(Image Credit: IMDb)
१९७८
वसंत रामजी खानोलकर – भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे
(जन्म: १३ एप्रिल १८९५)
(Image Credit: मराठी विश्वकोश)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
त्रिपिडास्तु दिने दिने
मठ्ठंभटाला कधी नव्हे तो एकदा भोज राजाला भेटण्याचा योग आला. मठ्ठंभटाचा तो वरवरचा रुबाब पाहून कुणी महापंडित आपल्याकडे आला असावा, असा गैरसमज होऊन भोजराजाने त्याला नमस्कार केला; त्याबरोबर ‘सुपीडास्तु दिने दिने’ म्हणजे प्रतिदिवशी तुला गोड त्रास व्हावा.’ असा राजाला आशिर्वाद देण्याऎवजी मठ्ठंभट अज्ञानाने म्हणून गेला ‘राजा, त्रिपीडास्तु दिने दिने ।’ (राजा तुला तीन पीडा व्हाव्यात)मठ्ठंभटाने दिलेला हा शापवत ‘आशिर्वाद’ ऎकून राजा भोज रागाने लालबुंद झाला. तो आता मठ्ठंभटाला काहीतरी जबरदस्त शिक्षा देणार हे हेरुन कालीदास पुढे सरसावला व राजाला म्हणाला, ‘मठ्ठंभटांच्या आशीर्वादात फ़ार खोल अर्थ भरला आहे. पाहा ना ?
श्लोक
प्रदाने
विप्रपीडास्तु, शिशुपीडास्तु भोजनें ।
शयनें
पत्निपीडास्तु, त्रिपिडास्तु दिने दिने ॥
(अर्थ – दानाचे वेळी
ब्राम्हणांचा त्रास व्हावा; जेवणाच्या वेळी बालकाडून व झोपण्याचे वेळी
पत्नीकडून अशा त-हेने हे तीन (गोड) त्रास तुला प्रति दिनी व्हावेत.)
हे
स्पष्टीकरण ऎकून प्रसन्न झालेल्या राजाने मठ्ठंभटाचा बरेच द्रव्य देऊन सन्मान केला, पण त्याचबरोबर
कालीदासाने मठ्ठंभटाला यापुढे संस्कृतमधन कुणालाही आशीर्वाद न देण्याबद्दल सुचना
करुन, त्याला
तिथून हाकून लावला.
तात्पर्य-
आपल्याजवळ जर एखाद्या गोष्टीचे अज्ञान असेल तर अशा वेळेला शांत बसणे योग्य ठरते.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा. ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.