A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : गुरुवार
आजची दिनांक : ३१ / १० / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
१९८४
पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या
१९८४
भारताचे ६ वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.
[कार्यकाल: ३१ डिसेंबर १९८४ ते २ डिसेंबर १९८९]
१९६६
दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
१९४१
‘माऊंट रशमोअर’ या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले. ४ ऑक्टोबर १९२७ रोजी याच्या बांधकामास सुरुवात झाली होती. अमेरिकेच्या साऊथ डाकोटा राज्यातील कीस्टोन परगण्यात ब्लॅक हिल्स या डोंगरावर हे शिल्प कोरले आहे. यात जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थिओडोर रुझव्हेल्ट आणि अब्राहम लिंकन (डावीकडून उजवीकडे) असे अमेरिकेचे चार राष्ट्राध्यक्ष साकारण्यात आलेले आहेत. सुरुवातीला हे शिल्पामध्ये अर्धपुतळे बनवण्याची योजना होती, परंतु निधीच्या कमतरतेमुळे ते मधेच थांबवण्यात आले. या भागातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी म्हणून हा प्रकल्प हाती घेतला होता आणि तो चांगलाच यशस्वी झाला.
(Image Credit: Wikipedia)
१९४६
रामनाथ पारकर – क्रिकेटपटू
(मृत्यू: ११ ऑगस्ट १९९९)
(Image Credit: ThisDay)
१८९५
कोट्टारी कनकय्या तथा सी. के. नायडू – क्रिकेटपटू, भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले कप्तान, पद्मभूषण (१९५६)
(मृत्यू: १४ नोव्हेंबर १९६७ - इंदौर, मध्य प्रदेश)
(Image Credit: Wikipedia)
१८७५
वल्लभभाई झंवरभाई पटेल तथा सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्न (मरणोत्तर - १९९१)
(मृत्यू: १५ डिसेंबर १९५०)
(Image Credit: Wikipedia)
२०१९
गिरीजा कीर – लेखिका आणि कथाकथनकार
(जन्म: ५ फेब्रुवारी १९३३ - धारवाड, कर्नाटक
(Image Credit: Wikipedia)
२००९
सुमती गुप्ते – मराठीत तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोज्ज्वळ नायिका रंगवून आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार आणि रसरंग दादासाहेब फाळके पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी १९४० मध्ये संत ज्ञानेश्वर या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पाऊल टाकले. भालजी पेंढारकर यांच्या ‘थोरातांची कमळा’ या चित्रपटाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. राजा परांजपे यांच्या ‘ऊन पाऊस’ या चित्रपटात त्यांनी एका वृद्ध महिलेची भूमिका केली होती. या भूमिकेचे आजही प्रचंड कौतुक होते. संत ज्ञानेश्वर (१९४०), थोरातांची कमळा (१९४१), माझे बाळ (१९४३), शरबती आँखे (१९४५), संतान (१९४६), वीर घटोत्कच (१९४९), नंद किशोर (१९५१), शिव लीला (१९५२), श्यामची आई (१९५३), ऊन पाऊस (१९५४), समाज (१९५४), शेवग्याच्या शेंगा (१९५५), कारिगर (१९५८), मौसी (१९५८), कीचक वध (१९५९), वक्त (१९६५), सज्जो रानी (१९७६), हरे काच की चुडिया (१९६७), परिवार (१९६८), प्रार्थना (१९६९), अधिकार (१९७१), जलते बदन (१९७३), पेसै की गुडिया (१९७४), आदमी सडक का (१९७७), फासी का फंदा (१९८६), पवनाकाठचा धोंडी, शेवटचा मालूसरा, कुंकवाचा करंडा, दाम करी काम हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. अभिनयाबरोबरच ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘जानकी’ आणि ‘शेवटचा मालुसरा’ या चित्रपटांची निमिर्ती आणि लेखनही सुमतीबाईंनी केले होते. दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांच्या त्या पत्नी. मराठी चित्रपटांप्रमाणेच ‘लग्नाची बेडी’, ‘घराबाहेर’, ‘संशयकल्लोळ’ इत्यादी नाटकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या.
(जन्म: ११ मे १९१९ - वाई, जि. सातारा)
(Image Credit: Bytes of India)
२००५
अमृता प्रीतम – पंजाबी भाषेतील प्रतिथयश लेखिका आणि कवयित्री. त्यांच्या ‘कागज ते कॅनव्हास’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८१) देण्यात आला. ‘रसीदी टिकट’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
(जन्म: ३१ ऑगस्ट १९१९ - गुजरानवाला, पंजाब (पाकिस्तान)
(Image Credit: Wikipedia)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
बोध
राज्यकारभारापेक्षा इतर अवांतर गोष्टीत रस घेणाऱ्या एका राजाने आपल्या सेनापतीला दोन प्रश्न विचारले व उत्तरे देण्यासाठी त्याला एका आठवड्याची मुदत दिली. सेनापतीने आपल्याच चेहऱ्य मोहोऱ्याच्या आपल्या एका सेवकाला आपला पोषाख घालायला देऊन, आणि त्या प्रश्नांची उत्तरे पढवून, राजाकडे पाठविले. ‘हा आपला सेनापतीच आहे’ अशा समजुतीनं राजानं त्याला विचारलं, ‘काय सेनापतीसाहेब ? मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तयार आहेत का ?’ नकली सेनापती म्हणाला, ‘महाराज ! ते प्रश्न आपण पुन्हा विचारलेत तर बरे होईल.’ राजा – समोरच्या पर्वताची माती एकूण किती टोपल्या होईल ? नकली सेनापती – त्या पर्वताच्या एकूण क्षेत्रफ़ळाच्या एक दशांश आकाराची जर एक टोपली बनवली, तर त्या पर्वताची एकूण माती दहा टोपल्या होईल. राजा – वा: ! अगदी बरोबर आहे उत्तर. सेनापतीसाहेब ! आता माझ्या मनात काय आहे ते सांगा. नकली सेनापती – सध्या तुमच्या मनात तुम्ही सेनापतीशी बोलत आहात असं आहे; पण मी खरा सेनापती नसून, सेनापतीच्या सोंगात तुमच्याकडे आलेला सेनापतीसाहेबांचा नोकर आहे. राजा – मग तुम्ही दोघांनी मला असं का फ़सवलं ? नकली सेनापती – माझ्या धन्याचं असं म्हणणं आहे की, जे माणसं मोठ्या पदांवर आहेत, त्यांनी मनोरंजनाच्या भलत्यासलत्या गोष्टीत वेळ वाया घालवू नये. राजाचं कर्तव्य राज्य उत्तम त-हेनं चालविण हे आहे, तर सेनापतीचं कर्तव्य राज्याचं उत्तम त-हेनं रक्षण करणे हे आहे. अशा अशा स्थितीत आपण त्यांना नसते प्रश्न विचारुन त्यांच मन त्यांच्यापुढे असलेल्या मुख्य प्रश्नांवरुन उडवून भलत्याच प्रश्नांकडे वेधता. त्यांना आपलं हे वागणं मान्य नसल्यामुळे, त्यांनी आपल्या मामुली प्रश्नांची उत्तर देण्यासाठी माझ्यासारख्या मामुली सेवकाला सेनापतीचं सोंग घेऊन पाठविलं.’ नकली सेनापतीच्या या खुलाशानं राजा वरमला आणि मनोरंजनाच्या बाबींतून लक्ष काढून त्याने ते राज्यकारभारात घातले.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा. ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.