गायन केलेली कविता
कराओके कविता
Music 4 3 2 1
छोटेसे बहीणभाऊ, उद्याला मोठाले होऊ
छोटेसे बहीणभाऊ, उद्याला मोठाले होऊ
उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला
नवीन आकार देऊ
छोटेसे बहीणभाऊ, उद्याला मोठाले होऊ
छोटेसे बहीणभाऊ, उद्याला मोठाले होऊ
Music 4 3 2 1
ओसाड उजाड जागा, होतील सुंदर बागा
ओसाड उजाड जागा, होतील सुंदर बागा
शेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांना
शेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांना
नवीन बहार देऊ
छोटेसे बहीणभाऊ, उद्याला मोठाले होऊ
छोटेसे बहीणभाऊ, उद्याला मोठाले होऊ
Music 4 3 2 1
मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ
मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ
निर्मळ मनाने, आनंदभराने
निर्मळ मनाने, आनंदभराने
आनंद देऊ अन् घेऊ
छोटेसे बहीणभाऊ, उद्याला मोठाले होऊ
छोटेसे बहीणभाऊ, उद्याला मोठाले होऊ
Music 4 3 2 1
प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू,
प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू,
अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे
अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे
अनेक एकत्र होऊ
छोटेसे बहीणभाऊ, उद्याला मोठाले होऊ
छोटेसे बहीणभाऊ, उद्याला मोठाले होऊ
उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला
नवीन आकार देऊ
छोटेसे बहीणभाऊ, उद्याला मोठाले होऊ
छोटेसे बहीणभाऊ, उद्याला मोठाले होऊ
छोटेसे बहीणभाऊ, उद्याला मोठाले होऊ
गीत - वसंत बापट
संगीत व व्हिडिओ निर्मिती
श्री. प्रविण डाकरे व श्री. जयदिप डाकरे
खालील बटनाला क्लिक करून गीत ऐका. सराव करा.
गीत गायन - प्रविण डाकरे
वरील गीत खाली संगीत ट्रॅकवर सराव करा.
Tags
पहिली मराठी कविता