बुधवार, 23 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5:47 च्या सुमारास विक्रम लँडरची चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया सुरु होणे अपेक्षित आहे. संध्याकाळी 6:04 वाजता विक्रम लँडर चंद्रभूमीला स्पर्श करेल, असे अपेक्षित आहे. (आधी घोषित केलेल्या योजनेपेक्षा ही वेळ सुधारित आहे)
ही शेवटची 15 मिनिटं इस्रो च्या वैज्ञानिकामध्ये "15 मिनिट हॉरर" म्हणून ओळखली जातात.
......पण का ????
कारण या टप्प्यात चांद्रयान 3 जे क्षैतिज दिशेने सुमारे 25 किमीच्या कक्षेत आहे, ते सुमारे 6000 किमी/ताशी वेगाने चंद्राच्या पृष्ठभागाकडे सरकू लागेल, चंद्राच्या पृष्ठभागाजवळ येताच त्याची दिशा उभ्यामध्ये बदलेल आणि त्याचा वेग कमी करेल. ऑन-बोर्ड 4 रॉकेट (चांद्रयान 2 मध्ये 5 होते) आणि थ्रस्टर वापरून कमाल वेग 3 किमी/ताशी वर आणला जाईल.
विक्रम लँडर जमिनीपासून सुमारे 100 मीटर उंचीवर असतांना चंद्राचा पृष्ठभाग स्कॅन करेल आणि सुरक्षित लँडिंग ठिकाण शोधेल आणि वर नमूद केलेल्या प्रोपल्शन सिस्टमचा वापर करून त्या दिशेने जाईल आणि शेवटी चंद्रावरील पृष्ठभागावर उतरेल. (हे सर्व करताना स्वतःला संतुलित ठेवावे लागेल, जे कि ऑनबोर्ड संगणकाद्वारे नियंत्रित केले जाईल.) आणि नंतर विविध प्रयोग करण्यासाठी प्रज्ञान रोव्हरला त्याच्या पोटातून बाहेर काढेल...
रोमांचक वाटतंय??
हे सर्व अंतिम मॅन्युव्हरिंग पूर्णपणे स्वचालित असेल, ऑनबोर्ड संगणकाद्वारे विविध अल्गोरिदम वापरून चालवले जाईल जे लिफ्ट ऑफ करण्यापूर्वी त्यात दिले जाते. ते स्वचालित आहे कारण, त्या वेळी गोळा केलेल्या डेटावर अवलंबून कोणता अल्गोरिदम वापरायचा हे ते स्वतःच निवडेल. (इस्रो कमांड सेंटर या कमांड्स थेट हाताळण्यास सक्षम असणार नाही, कारण हे सर्व क्षणांक्षणांना घ्यायचे निर्णय आहेत आणि पृथ्वीवरून दिलेला आदेश चंद्रावर विक्रम लँडरला पोहोचण्यासाठी 2.4 ते 2.7 सेकंद लागतात, या वेळात काहीही होऊ शकते, त्यामुळे हि परिस्थिती ऑनबोर्ड कॉम्पुटरलाच हाताळावी लागेल.)
विक्रम लँडरला जिथे तो उतरायचा आहे, त्या चंद्राच्या पृष्ठभागाचा तपशीलवार नकाशा (4 किमी × 4.5 किमी) फीड करण्यात आला आहे. (चांद्रयान 2 ला तत्कालीन प्रस्तावित लँडिंग साइटचा 500 mts × 500 mts नकाशा देण्यात आला होता) या सर्व घटनांमध्ये अनेक जर आणि तर आहेत आणि या संपूर्ण प्रयत्नात आपल्याला का अनपेक्षित असे सुद्धा काही घडू शकते. यामुळे, लँडर उतरण्याची शेवटची 15 मिनिटे पूर्णपणे अप्रत्याशित आहेत आणि म्हणून त्यांना "15 मिनिट हॉरर" असे म्हणतात.
खरं तर चांद्रयान 3 उतरण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे आणि या मिनिटालाही इस्रो कमांड सेंटरच्या बटणाच्या क्लिकवर हा अंतिम टप्पा सुरू होईल.
मग आपण 23 ऑगस्टची वाट का पाहतोय. ??
कारण ज्या ठिकाणी चांद्रयान 3 उतरण्याची प्रस्तावित योजना आहे, ती जागा सध्या अंधारात आहे (एक चंद्राची रात्र 14 दिवसांची आहे). म्हणून आम्ही लँडिंग साइटवर पहाटेची (14 दिवसांच्या सूर्यप्रकाशाचा पहिला प्रकाश) वाट पाहत आहोत...!
या आतुरतेने वाट पाहत असलेला कार्यक्रम बुधवार, 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 5:27 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) पासून ISRO वेबसाइट, त्याचे YouTube चॅनेल आणि फेसबुक पेज आणि DD National TV यासह अनेक प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित केला जाईल.
तेव्हा चुकवू नका... दिवस, तारीख आणि वेळ नोंद करून ठेवा - बुधवार, २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ५:२७ पासून सुरू होणार्या या महाअंतिम नाट्यासाठी.....!
ऐतिहासिक गोष्टीचे साक्षीदार होण्याची संधी सोडू नका......!
Chandrayaan-3 Mission Soft-landing LIVE Telecast | चांद्रयान ३ च्या लँडिंगची प्रक्रिया लाईव्ह पहा
Subscribe to Gurumauli YouTube channel
( स्त्रोत- सोशल मीडियावरून संकलित )
Tags
Breaking News