८ ऑगस्ट १९४२ साली कॉग्रेसच्या मुंबई अधिवेशनात महात्मा गांधींनी 'भारत छोडो' आंदोलन सुरु केले. गांधीनी देशाला संबोधताना त्यांच्या भाषणात 'करो या मरो' चे आवाहन केले. भारतातील ब्रिटीशांची सत्ता संपवण्यासाठी ही सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली होती. भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात झाल्यामुळे याला 'ऑगस्ट चळवळ' किंवा 'ऑगस्ट क्रांती' असेही म्हणतात.
९ ऑगस्ट १९४२ रोजी चळवळीस सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधींसह कॉग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अटकेनंतर अरुणा असफ अली यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे नेतृत्व केले. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी '९ ऑगस्ट' हा ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली वाहून तसेच देशाच्या एकतेची भाषणे आणि इतर कार्यक्रमाद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
क्रांतिदिन भाषण -
इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशालामुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे 9 ऑगस्ट अर्थात क्रांतीदिन स्वातंत्र्यलढ्यातील मशाल पेटवत इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत देशातून करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस.
इंग्रजानी भारताला स्वतंत्र करण्यासाठी दिलेला शब्द न पाळल्यामुळे या आंदोलनाची सुरुवात झाली. महात्मा गांधीनी देशभर ऑगस्ट क्रांती आंदोलनाची घोषणा केली. 9 ऑगस्ट 1942 रोजी चळवळ सुरू झाली परंतु ब्रिटिश राजवटीने त्वरेने कारवाई केली, त्यांनी गांधीजींना, सरदार पटेल, मौलान अबूल कलाम अशा साऱ्या महत्त्वच्या नेत्यांना अटक केले मात्र त्यामुळे आंदोलन थांबले नाही तर गांधीजींना, सरदार पटेल, मौलान अबून कलाम उफाळून आले.
9 ऑगस्ट 1942 च्या सकाळी गवालिया टंक मैदानावर (आजचा ऑगस्ट क्रांती मैदान) लाखोंच्या गर्दीवर पोलिसानी निष्ठुरपणे लाठी हल्ला केला त्याला न डगमगता अरुणा आसफ अली या युवतीने 'वंदेमातरमच्या घोषणा देत तिरंगा फडकवला. मुंबईतून सुरु झालेल्या या आंदोलनाचे पडसाद देशभर उमटू लागले. निशस्त्र आंदोलकांवर ब्रिटिश सोजिरांनी लाठीचार लाठीचार्ज केला,अनुधुराच्या नळकांड्या फोडल्या, लाखोंनी तुरुंगवास भोगला, हजारो शहीद झाले. मात्र स्वातंत्र्यासाठीचा हा वणवा पेटतच राहिला.
9 ऑगस्ट 1942 चा 'चले जाव' आणि 'करेंगे या मरेंगे' हा गांधीजींचा नारा म्हणजे स्वातंत्र्याचे पहिले पाऊल ठरले. त्यानंतर देशवासियांनी इंग्रजांना हाकलून लावे पर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवले. या आंदोलनात बलिदान देणाऱ्या या क्रांतिवीरांनी श्रध्दांजली म्हणून ऑगस्ट 'क्रांती दिन साजरा केला जातो.
जय हिंद..!
टीप- सदर माहिती स्वनिर्मित नसून वेबवरून संकलित केलेली आहे.