डोळे येणे म्हणजे काय? (Dole Yene Mhanje Kay in marathi)
डोळे येणे’ याला इंग्रजी मध्ये conjunctivitis म्हटलं जातं. डोळे येणे म्हणजे डोळ्यातील काँनजेक्टिव्हना सुज येणे. काँनजेक्टिव्ह म्हणजे डोळ्यांच्या आतल्या भागातील पांढऱ्या रंगाची एक बारीक कागदा सारखी त्वचा असते व ती डोळ्याच्या पापण्यांच्या आत असते. पावसाळ्याच्या दिवसात डोळे येण्याची साथ वातावरणानुसार पसरते. हा आजार संसर्गजन्य आहे. हा एक वेगाने पसरणारा आजार आहे. हा आजार पसरण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे.डोळे येणे हे संसर्गजन्य असल्यामुळे एकाचे दुसऱ्याला व दुसऱ्याचे तिसऱ्याला असे वाढत जाते. डोळ्यासारख्या नाजूक अवयवावर परिणाम करत असल्याने होणारा त्रास हा अधिक असतो. तो बरा व्हायला देखील ३ ते ८ दिवस कालावधी लागतो, त्यामुळे डोळे आल्यानंतर योग्य काळजी घेणे हेच अधिक फायदेशीर ठरते. विशेषतः या ऋतूमध्ये जे संसर्गजन्य आजार फोफावतात, त्यामध्ये 'डोळे येणं' हा प्रमुख आहे.
डोळे येण्याची लक्षणे काय (Dole yenyachi lakshane kay in marathi)
डोळे आले असल्यास पुढीलपैकी काही लक्षणे प्रामुख्याने आपल्याला जाणवतात.
डोळे लाल होणेडोळ्यांतून पाणी येणे
डोळ्यांना सूज येणेडोळ्यातून पिवळ्या रंगाचा द्रव बाहेर येणे
डोळ्यांना खाज सुटणेडोकेदुखी
पापण्या चिकटणे
डोळ्यांमध्ये आग होणे
डोळ्यातून चिकट पांढरा द्रव बाहेर येणे
डोळे येण्याची कारणे कोणती? (Dole Yenyachi Karane Konti in marathi)
डोळे येण्याचे प्रमुख कारण म्हणजे हवामानातील संसर्ग आणि एलर्जी युक्त घटकांच्या वापरामुळे डोळे येऊ शकतात.
डोळे येण्याचे कारण हे डोळे आलेल्या व्यक्तींच्या सहवासात राहिल्यामुळे म्हणजेच त्यांनी डोळ्यांना हाताने स्पर्श करून जर का दुसऱ्या ठिकाणी हात लावला त्यामुळे संसर्ग वाढत जातो किंवा हवेतील कीटकांमुळे होऊ शकतो.
डोळे येण्याचा कारण हे एकमेकांच्या वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमुळे होऊ शकतो. जसे की टॉवेल, रुमाल, ब्युटी क्रीम, काजळ किंवा साबण इत्यादी .
हवेतील प्रदूषणामुळे किंवा हवेतील धुळीच्या कणांमुळे डोळे येण्याचा संसर्ग होऊ शकतो.
एकमेकांचे हात रुमाल ,टॉवेल ,चष्मा वापरल्यामुळे डोळे येण्याचा संसर्ग होऊ शकतो.
डोळे येणे हा संसर्ग कसा पसरतो?
डोळे येणे (Conjunctivitis) हा संसर्ग विषाणूमुळे होत असल्याने इतर सर्व विषाणूजन्य संसर्गाप्रमाणे पसरतो. संसर्ग झालेल्या पृष्ठभागाच्या संसर्गात आल्यास तसेच संसर्ग झालेल्या व्यक्तीशी खूप जवळ संपर्क झाल्यास हा आजार पसरू शकतो.
डोळे आल्यावर कोणती काळजी घ्यावी? (Dole aalyavar konti kalji ghyavi in marathi)
डोळे आल्यावर सतत डोळ्यांना हात लावू नये.
डोळे पुसण्यासाठी स्वच्छ कपड्याचा वापर करावा. डोळ्यांना हात लावल्यावर लगेच साबण लावून हात धुवावे.
डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन डोळ्यांची तपासणी करणे.डॉक्टरांच्या सांगितल्याप्रमाणे औषधी व डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप घ्यावेत.
डोळे आल्यावर साधा कोणताही पण स्वच्छ असा चष्म्याचा वापर करावा.डोळ्यांना स्वच्छ पाण्याने दिवसात तीन चार वेळा धुवावे. व स्वच्छ कपड्याने पुसावेत.
धूर, हवा, लाईटचा प्रकाश यांचा सहवास टाळावा.
डोळे आल्यावर सार्वजनिक जागेवर जाऊ नये, कारण डोळे येणे संसर्गजन्य असल्यामुळे आपल्याला झालेला संसर्ग दुसऱ्यांना होऊ शकतो. यामुळे सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे.
डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध वापरा.
स्विमिंग पुलमध्ये जाऊ नका.
लक्षणे कमी करण्याचे मार्ग कोणते?
- लक्षणे कमी करण्यासाठी डोळ्यांच्या डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे आय ड्रॉप्स वापरा.
- ल्युब्रिकंट आय ड्रॉप्स वारंवार वापरा.
- कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे बंद करा.
- डोळ्यांना मेकअप करणे बंद करा.
- कोमट ओल्या कापडाने तुमचे डोळे वारंवार धुवा.
- जर पापण्यांना सूज आलेली असेल तर खोलीइतके तापमान असलेल्या पाण्यामध्ये कापड भिजवून त्याने डोळे स्वच्छ करून, बंद डोळ्यांवर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा.
काय करावे आणि काय करू नये?
- आरोग्याला पोषक आहार आणि पुरेशी झोप घ्या. यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढेल.
- कंजंक्टिवायटिसचा संसर्ग खूप लोकांना होत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळा.
- हात वारंवार सॅनिटाईज करा.
- तुम्हाला जर कंजंक्टिवायटिसचा संसर्ग झालेला असेल तर सार्वजनिक ठिकाणी जाऊ नका कारण अशा ठिकाणी संसर्ग खूप जास्त पसरतो.
- डोळ्यांना वारंवार हात लावणे टाळा.
- जर दृष्टी अस्पष्ट झाली असेल किंवा असह्य वेदना होत असतील तर डोळ्यांच्या डॉक्टरशी तातडीने संपर्क साधा.
डोळ्यांचा संसर्ग दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय
1. त्रिफळा पेस्टरात्री एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा त्रिफळा पावडर टाकून भिजत ठेवा. सकाळी ते पाणी उकळून घ्या आणि पाणी अर्ध झालं की ते ते पाणी चांगल गाळून घ्या. आय कप्समध्ये टाकून डोळा स्वच्छ करू शकता. महत्वाचं म्हणजे दोन्ही डोळ्यांना वेगवेगळे आय कप घ्यावेत. तसंच दिवसातून हे एक ते दोन वेळा करावे. महत्वाचं म्हणजे एकावेळी जवळपास १५ ते २० वेळा डोळे उघडझाप करावी.
3. गुळवेल
गिलॉय म्हणजेच गुळवेलच्या दोन गोळ्या दिवसातून एकदा घ्या. ज्यामुळे डोळ्यांची जळजळ होणे थांबेल आणि आराम मिळेल. गुळवेलमुळे डोळे आले असतील तर ते पूर्ण बरे होतात.
डोळ्यांच्या फ्लूपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही गुलाबजल देखील वापरू शकता. गुलाब पाण्यामध्ये अँटीसेप्टिक आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. यामुळे संक्रमण करणाऱ्या जंतूंशी लढण्यास मदत होते. गुलाबपाणी डोळ्यांच्या फ्लूमुळे होणारी समस्या कमी होऊन डोळ्यांना आराम मिळतो. यासाठी फक्त गुलाब पाण्याचे दोन थेंब डोळ्यात टाका.
5. तुळशी
तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आणि अँटीऑक्सिडेंट हे उपयोगी गुणधर्म आहेत. तुळशीची काही पाने पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी यातील तुळशीची पानं गाळून या पाण्याने डोळे धुवा.
डोळ्यांचा संसर्ग टाळण्यासाठी बटाटा फायदेशीर ठरू शकतो. बटाट्यामध्ये कूलिंग इफेक्ट असल्याने डोळ्यांच्या संसर्गामुळे होणारा त्रास कमी होऊ शकतो. यासाठी बटाट्याचे गोल काप करून ते डोळ्यांवर ठेवा. बटाट्याचे तुकडे 10-15 मिनिटे डोळ्यांवर राहू द्या.
हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात. हळदीमध्ये असलेले औषधी गुणधर्म डोळ्यांच्या संसर्गास प्रतिबंध करण्यास मदत करतात. अर्धा चमचा हळद पावडर थोड्या कोमट पाण्यात मिसळा. नंतर हळदीच्या पाण्यात कापूस भिजवून डोळ्यांना लावा. यामुळे डोळ्यांमधील घाण निघून जाईल. तसेच वेदना आणि जळजळीपासून आराम मिळेल.
FAQ : वारंवार विचारले जाणारे प्रश्न | Conjunctivitis information in Marathi
1. 'डोळे येणे' याला इंग्रजीत काय म्हणतात?उत्तर- Conjunctivitis
उत्तर. डोळे लाल होणे, दुखणे, चुडचूड होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे इत्यादी.
उत्तर- डॉक्टरांचा सल्ला घेऊन डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप घ्यावेत. व कोणतेही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
4. डोळे आल्यावर चष्मा का वापरावा?
उत्तर. चष्मा वापरल्यामुळे डोळ्यांना प्रदूषित हवेचा किंवा धूर , व तीव्र प्रकाश यामुळे इजा होऊ नये म्हणून चष्म्याचा वापर करावा.
5. काँनजेक्टिव्ह म्हणजे काय ?
उत्तर. डोळ्यातील आतल्या भागात असलेली पांढऱ्या रंगाची त्वचा म्हणजे काँनजेक्टिव्ह होय.
6. डोळे आल्यावर किती दिवसात बरे होतात?
उत्तर . डोळ्यांची चांगली निघाली असताना डोळे तीन-चार दिवसात बरे होतात.
7. डोळे आलेल्या व्यक्तीचे डोळे बघून डोळे येत असतात का ?
उत्तर. नाही, डोळे आलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांना हाताने स्पर्श केल्यावर दुसऱ्या कोणत्याही वस्तूला किंवा कपड्याला किंवा इतर ठिकाणी झालेल्या स्पर्शामुळे संसर्ग वाढत असतो.
डॉ. निरेन डोंगरे, कन्सल्टंन्ट, ओफ्थल्मोलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई यांनी सध्या घेरलेल्या डोळ्यांच्या साथीबाबत अधिक माहिती दिली आहे. डोळ्यांना बाधा झाल्यानंतर साधारणतः हे ३-४ दिवस तसेच सुजून राहतात. मात्र अशावेळी बाहेर न फिरता आराम करणं गरजेचे आहे. कारण आपल्यामुळे दुसऱ्यांनाही हा संसर्ग होऊ शकतो.