आट्यापाट्या | पारंपरिक खेळ-1 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
१२) पारंपरिक खेळ
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : आट्यापाट्या
उद्देश :
• आट्यापाट्या हा खेळ भारतातील पारंपरिक खेळांपैकी एक आहे. प्राचीन काळापासून मुलांमध्ये हा खेळ लोकप्रिय आहे. हा खेळ विशेषतः ग्रामीण भागात शाळांमध्ये आणि सण-उत्सवांच्या प्रसंगी खेळला जातो. या खेळाच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना मिळते.
• साहित्य संकलन :
> खेळण्यासाठी मोकळे मैदान किंवा घरातील मोकळी जागा.
> जमिनीवर आखण्यासाठी खडू किंवा रंगीत पावडर.
• सुरक्षितता निर्देश :
> खेळताना चांगल्या प्रकारे बसून खेळावे.
> इतरांशी सहकार्य करून खेळावे.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती-
१) शारीरिक विकास धावणे, उड्या मारणे यामुळे शारीरिक चपळता वाढते.
२) मानसिक विकास खेळाच्या विविध तंत्रांचा विचार करून निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते.
३) सामाजिक कौशल्ये: सामूहिक खेळामुळे सहकार्य व संघभावना विकसित होते.
४) तणाव निवारण: मजा व आनंदामुळे ताणतणाव कमी होतो.
आवश्यक साहित्य :
१) जमिनीवर आखण्यासाठी खडू किंवा रंगीत पावडर.
२) खेळण्यासाठी मोकळे मैदान शाळेचे मैदान, अंगण किंवा कोणतेही खुले क्षेत्र.
शिक्षक कृती :
१) शिक्षक खेळाची ओळख, खेळाची पद्धत, नियम, व खेळाचे तंत्र विद्यार्थ्यांना समजवून सांगतात.
२) खेळ कसा खेळायचा याचे प्रात्यक्षिक दाखवतात.
३) खेळताना कोणती सुरक्षितता घ्यावी याचे मार्गदर्शन करतात.
४) विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करतात.
५) शिक्षक विद्यार्थ्यांना खेळाची पुढील माहिती देतात.
आट्यापाट्या हा एक पारंपरिक मैदानी खेळ आहे. खेळ दोन संघात खेळला जातो. पूर्वी संध्याकाळच्या वेळी हा खेळ खेळायचे. त्याचे मैदान ९० फूट लांब बाय ११ फूट रुंद या आकारमानाचे असते. या मैदानावर एक उभी पाटी तिला 'सुरपाटी' म्हणतात व त्यावर नऊ आडव्या पाठ्यांनी तिला संरक्षण पाटीमध्ये विभागणी केलेली असते. या खेळामध्ये एका संघातील खेळाडू दुसऱ्या संघातील खेळाडूची आडवणूक अथवा कोंडी करतात. मग ती केलेली कोंडी तोडायची असते व प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू त्यांना स्पर्श करून बाद करण्याचा प्रयत्न करतात. त्याच वेळी दुसऱ्या संघातील खेळाडू बचाव करत हुलकवणे देऊन निसटून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या खेळात अडवणूक, पाठ शिवणे, हुलकावणी या तिन्ही तंत्राचा वापर होतो खेळ सुरू होतो त्या पाटीला 'कपाळपाटी' म्हणतात व ज्या पाटीला खेळ संपतो त्या पाटीला 'लोण' म्हणतात मध्यभागी सूरपाटी असते. ती समान भाग करते. दोन संघ असतात. प्रत्येक संघात नऊ किंवा बारा खेळाडू असतात. मैदानावर नऊ पाठ्यांना समान भाग देतात. मैदानाभोवती दहा फूट मोकळी जागा असावी लागते. तीन डावांचा समावेश असतो. दोन डाव जो सलग जिंकतो तो संघ विजयी होतो किंवा किती खेळाडू बाद करतात गुणपद्धतीने ही सामना खेळला जातो. प्रत्येक डाव सात मिनिटाचा असतो. प्रत्येक डावांच्या मध्यभागी पाच मिनिटांची विश्रांती वेळ असते. प्रत्येक संघात सहा खेळाडू पूर्वी असायचे वेळ हा २० मिनिटांचा असायचा, हल्ली या खेळासाठी पाच पंच असतात. नऊ अधिक तीन असे मिळून प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रतिस्पर्ध्याला स्पर्श करून तो खेळाडू बाद करणे हे कौशल्य आहे. हा खो-खो खेळा सारख्याच प्रकारचा खेळ आहे. आट्यापाट्या हा खेळ संपूर्ण भारतामध्ये खेळला जातो. शासनाने शालेय स्पर्धांमध्ये सुद्धा या पारंपरिक खेळाचा समावेश केलेला आहे.
विद्यार्थी कृती :
१) खेळासाठी आवश्यक साहित्य जसे खडू किंवा रंगीत पावडर आणणे.
२) खेळाच्या नियमांचे पालन करून खेळणे.
३) सहकाऱ्यांसोबत खेळताना एकमेकांना मदत करणे व एकत्र खेळणे.
४) घरात व शाळेत सराव करणे.
संदर्भ साहित्य :
१) पुस्तके :
• भारतीय पारंपरिक खेळ, लेखक राजेश पाटील.
बालकांसाठी खेळ व क्रीडा, लेखक संतोष राव.
२) लेख :
आट्यापाट्या खेळाचे इतिहास, लेखक सुमित देशमुख.
भारतीय सांस्कृतिक खेळ, लेखक मनीषा पाटील