माझा अद्भुत मित्र | संगणकाची ओळख-1 | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
१७) संगणकाची ओळख
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : माझा अद्भुत मित्र
पूर्वनियोजित कृती :
शिक्षक विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातून घरी, शेजारी प्रश्न विचारून संगणक कुठे पाहिला आहे? तो कसा दिसतो? त्यात कोणकोणते भाग असतात? संगणक कोणकोणती कामे करतो? याचे उत्तर विद्यार्थ्यांना मिळविण्यास सांगतील.
शिक्षक शाळेतील संगणक / संगणक प्रतिकृती / संगणक प्रयोगशाळा / संगणकाचे भित्तिचित्र/चित्र जिथे असेल तिथे विद्यार्थ्यांना गटनिहाय नेण्याचे नियोजन करतात. शिक्षक संगणकाचे चित्र स्टिकर किंवा वर्तमानपत्रातून मिळविण्याचे नियोजन करतील.
संगणकाचे विविध भाग किंवा चित्र दाखवून संगणकाचे कार्य समजण्यासाठी विद्यार्थ्यांना विचारण्यासाठीचे प्रश्न.
१) संगणकाच्या भागाचे नाव काय आहे? उदा., मॉनिटर
२) या भागाचे काम काय आहे? उदा., चित्र दाखवणे
३) संगणकाच्या या भागामुळे कोणते काम करता येते? उदा., चित्र पाहणे, चित्रपट पाहणे, पुस्तक वाचणे, गेम खेळणे (विद्यार्थ्यांना संगणकाच्या प्रत्येक भागासाठी भागाच्या नावानुसार योग्य बदल करून वरील तीन प्रश्न विचारावेत.)
विद्यार्थ्यांना या भागांची नावे माहिती नसल्यास किंवा काही नावे माहिती नसल्यास शिक्षकांनी स्वतः सांगावे यामध्ये विशेष करून
१) मॉनिटर २) कीबोर्ड ३) साऊंड ४) माऊस ५) सीपीयू
चर्चा संगणक आपला मित्र होईल का? मित्राप्रमाणे नेहमी मदत करतो का? संगणक हा मानवाचा अद्भुत मित्र कसा काय होऊ शकतो हे स्पष्ट करतात. संगणक आपला अद्भुत मित्र कसा? तो कशी अद्भुत कामे करतो हे सांगतात.
संगणकाच्या मदतीने केली जाणारी कामे
१) चित्र काढता येतात.
२) रंग देता येतो.
३) लिहिता (टाईप) येते.
४) चित्रपट पाहता येतो.
५) गाणी ऐकला येतात.
६) कविता ऐकता येतात.
७) अभ्यास करता येतो.
८) संदेश पाठविता येतो. इत्यादी
एवढी सगळी मदत करतो म्हणून हा मित्र अद्भुत आहे. त्याची कामे पाहून आपणास आश्चर्य वाटते.
संगणकाच्या सर्व भागाचे स्टिक पपेट तयार करावे. संगणकाच्या भागाचे चित्र पेपरच्या स्टिक, स्ट्रॉ किंवा काडीवर चिकटवावे.
विकसित होणारी कौशल्ये डिजिटल साक्षरता, निरीक्षण कौशल्य, सहयोग कौशल्य 'संगणकाची ओळख' मध्ये संगणकाच्या भागांची नावे व उपयोग सांगतात. संगणक आपला अद्भुत मित्र असण्याची कारणे समजतात.
आवश्यक साहित्य : संगणक, संगणक प्रतिकृती, संगणक व त्याच्या भागांची चित्रे
शिक्षक कृती :
१) शिक्षक विदयार्थ्यांना तुम्ही संगणक कोठे कोठे पाहिला आहे? हे विचारतात त्याच वेळी गटानुसार आलेल्या उत्तरांचे लेखन फलकावर करतात. शिक्षक संगणक/चित्र/प्रतिकृती/चित्र/स्टिकर/भित्तिचित्र दाखवून हे काय आहे? याला आपण अजून कोणत्या नावाने ओळखतो? संगणकाचे भाग दाखवून नावे स्पष्ट करतात. संगणकाच्या मराठी, इंग्लिश नावाचा तोंडी सराव घेतात.
२) संगणकाचे विविध भाग किंवा चित्र दाखवून संगणकाचे कार्य समजण्यासाठी विद्यार्थ्यांना विचारण्यासाठी प्रश्न विचारतात. (खालील उत्तरे ही अपेक्षित उत्तरे आहेत यापेक्षा वेगळी उत्तरे पण येऊ शकतात.)
साऊंडचा उपयोग काय?
कविता, गाणी ऐकणे.
कीबोर्डच्या मदतीने आपण काय काय करू शकतो?
लेखन (टायपिंग) करणे.
माऊसचा उपयोग कशासाठी केला जातो?
कर्सर इकडे तिकडे करणे, टायपिंगसाठी कर्सर योग्य ठिकाणी ठेवणे, विविध फाईल बंद चालू करण्यासाठी क्लिक करणे इत्यादी.
३) शिक्षक विद्यार्थ्यांना गटनिहाय संगणकाची कामे कोणती हे विचारतात व ही कामे फलकावर लिहितात. फलकावर लिहिलेली ही कामे पाहिल्यावर लक्षात येते की संगणक सर्व ठिकाणी व दैनंदिन कामासाठी उपयुक्त आहे. असे आपल्याला सर्व ठिकाणी व भरपूर कामांसाठी घरी कोण मदत करते? मित्र उत्त्तर आल्यानंतर संगणकाशी तुलना करून 'संगणक आपला अद्भुत मित्र' कसा होऊ शकतो हे स्पष्ट करतात.
• चित्र काढता येतात.
• रंग देता येतो.
• लिहिता (टाईप) येते.
• चित्रपट पाहता येतो.
• गाणे ऐकता येतात,कविता ऐकता येतात.
• अभ्यास करता येतो.
• संदेश पाठविता येतो.
ही व अशी अनेक कामे करतो तरीही थकत नाही.
४) शिक्षक विद्यार्थ्यांना संगणकाच्या भागाचे स्टिक पपेट दाखवून त्याचे नाव व काय काम आहे ते सांगतात. विद्यार्थ्यांना गटनिहाय पुढे बोलावून त्यानंतर स्टिक पपेट देऊन संगणकाची कामे स्पष्ट करतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी, संगणक कोठे पाहिला आहे याचे हे गटनिहाय उत्तरे देतात. विदयार्थी संगणक / संगणकाचे चित्र/संगणकाची प्रतिकृती / स्टिकर / भित्तिचित्र पाहून हे काय आहे? याला आपण अजून कोणत्या नावाने ओळखतो. संगणकाच्या भागांची नावे सांगतात. संगणकाच्या मराठी, इंग्लिश नावांचा तोंडी सराव करतात.
२) संगणकाचे विविध भाग किंवा चित्र पाहून संगणकाचे कार्य समजण्यासाठी विदयार्थी प्रश्नांची उत्तरे देतात. विद्यार्थी गटनिहाय, संगणकाची कामे कोणती हे सांगतात.
३) शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात.
४) चर्चेत भाग घेतात.
५) एखादा भाग समजला नाही तर त्याविषयी आवश्यक तेवढे प्रश्न विचारतात.
४) विद्यार्थी फलकावरील उत्तराचे वाचन करतात. शिक्षकांनी सांगितलेल्या भागावर चर्चा करतात. विद्यार्थी संगणक सर्व ठिकाणी व दैनंदिन कामासाठी उपयुक्त आहे. 'संगणक आपला अद्भुत मित्र' आहे हे चर्चेच्या माध्यमातून समजून घेतात.
४) विद्यार्थी शिक्षकांचे संगणकाचे स्टिक पपेटसहित सादरीकरण पाहतात. शिक्षकांनी सांगितल्यानुसार त्यात आपला सहभाग नोंदवितात. विद्यार्थी गटनिहाय स्टिक पपेटच्या साहाय्याने सादरीकरण करतात.
संदर्भ साहित्य :