परिसर ओळख (पोस्ट ऑफिस क्षेत्रभेट) | क्षेत्रभेट व यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती-1 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
१०) क्षेत्रभेट व यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : परिसर ओळख (पोस्ट ऑफिस क्षेत्रभेट)
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक परिसरातील पोस्ट ऑफिसबाबत माहिती गोळा करतात.
शिक्षक पोस्ट ऑफिसला कुठे, केव्हा कशी भेट दयायची याचे नियोजन करतात. पोस्ट ऑफिस प्रमुखाची परवानगी घेतात व पालकांना याची पूर्वकल्पना देतात.
शिक्षक विद्यार्थ्यांना शिस्तीचे पालन होण्यासाठी सूचना देतात. उदा., पाण्याची बाटली ठेवणे, रांगेत चालणे इत्यादी सूचना
शिक्षक विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटी दरम्यान कोणत्या बाबींची माहिती घ्यावी किंवा निरीक्षण करावे यांबाबत
सविस्तर पूर्व सूचना देतात. खालील प्रश्नांच्या आधारे माहिती संकलित करण्यास सांगतात.
प्रश्न :
१) पोस्ट ऑफिसचे नाव काय आहे?
२) पोस्ट ऑफिस कोठे आहे?
३) पोस्ट ऑफिसची वेळ काय आहे?
४) पत्रपेटीमधील पत्रे वेगवेगळ्या ठिकाणी कशी पाठवली जातात ?
५) पिनकोडवरून गाव कसे शोधतात इत्यादी.
• क्षेत्रभेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांसोबत कशा प्रकारे (प्रश्नोत्तरे, गप्पागोष्टी) चर्चा करणार हे ठरवतात. प्रश्न
निश्चित करतात.
विकसित होणारी कौशल्ये- निरीक्षण, संप्रेषण, सामाजिक भावना. आवश्यक साहित्य : पेन, वही, पाण्याची बाटली इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील पोस्ट ऑफिसची माहिती सांगतात.
२) परिसरातील पोस्ट ऑफिसला भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांना शिस्ती संदर्भात सूचना देतात. (उदा. एका रांगेत चला, स्वतःच्या वस्तू स्वतः सांभाळा, इत्यादी.)
३) शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील क्षेत्रभेटी वेळी पूर्वनियोजनात तयार केलेले प्रश्न विचारून माहिती घेण्यास सांगतात.
४) क्षेत्रभेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्वनियोजनात तयार केलेले प्रश्न विचारून वर्गात विद्यार्थ्यांशी चर्चा करतात.
प्रश्न :
१) पोस्ट ऑफिसचे नाव काय होते?
२) पोस्ट ऑफिस कोठे होते?
३) पोस्ट ऑफिसची वेळ काय होती?
४) पोस्ट ऑफिसमध्ये किती कर्मचारी काम करत होते ?
५) पत्रपेटीमधील पत्रे वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यासाठी काय केले जात होते?
६) तुम्हाला पिनकोडवरून गाव शोधता येईल का? ते कसे शोधाल ?
७) पोस्ट ऑफिसला भेट देऊन तुम्हाला कसे वाटले, काय अनुभव आले इत्यादी
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी परिसरातील भेट दिलेले पोस्ट ऑफिसचे नाव सांगतात.
२) विद्यार्थी क्षेत्रभेटीदरम्यान शिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार निरीक्षण करतात व आवश्यक माहिती संकलित करतात.
३) विद्यार्थी परिसरातील भेट दिलेल्या पोस्ट ऑफिसची माहिती सादर करतात.
४) विद्यार्थी क्षेत्रभेटीनंतर होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात.
अशा प्रकारे सायकल दुरुस्ती दुकान / सरकारी कार्यालय/दवाखाना/बेकरी/इत्यादींना क्षेत्रभेट देता येईल.
संदर्भ साहित्य :