२) प्राणायाम/योग/ध्यानधारणा/श्वसनाची तंत्रे
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : सर्वांगासन व्यायाम
पूर्वनियोजित कृती :
• सर्वप्रथम शिक्षक सर्वांगासन व्यायामाचे प्रात्यक्षिक करून दाखविण्याचे नियोजन करतात व शिक्षक विद्यार्थ्यांकडून सर्वांगासन व्यायामाचे प्रकार करून घेतात. यासाठी नियोजन करतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती: शारीरिक लवचिकता, शारीरिक स्नायूंचा विकास, चपळता.
आवश्यक साहित्य : योगासन पट्टी
शिक्षक कृती :
१) शिक्षक सर्वांगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवतात.
२) सर्वप्रथम शिक्षक आसनपट्टीवर पाय जमिनीला समांतर ठेवतात.
३) त्यानंतर ९०० कोनात पाय वर घेतात.
४) त्यानंतर १८०० कोनात पाय हाताचा आधार घेऊन पाठीमागे घेतात.
५) त्यानंतर ९०० कोनात पाय वर घेतात व पाठीला हाताचा आधार देतात.
विद्यार्थी कृती :
१) सर्वप्रथम विद्यार्थी आसनपट्टीवर पाय जमिनीला समांतर ठेवतात.
२) त्यानंतर ९०० कोनात पाय वर घेतात.
३) त्यानंतर १८०० कोनात पाय हाताचा आधार घेऊन पाठीमागे घेतात.
४) त्यानंतर ९०० कोनात पाय वर घेतात व पाठीला हाताचा आधार देतात.
संदर्भ साहित्य :
१) आयुष मंत्रालय भारत सरकारची योगासनासंदर्भात अधिकृत यूट्यूब लिंक.
२) आयुष मंत्रालय भारत सरकार योगासन पद्मासनाचा व्हिडिओ.
https://youtube.com/@ministryofayushofficial?si=T8DRU5J7V2bqAjtj