सकस आहार पळतील आजार | आरोग्य रक्षण करण्यासाठी उपाययोजना-1 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
८) आरोग्य रक्षण करण्यासाठी उपाययोजना
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : 'सकस आहार पळतील आजार'
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक सकस आहारामुळे आजारांपासून कसे संरक्षण होते या विषयीची माहिती, संदर्भचित्रे व व्हिडिओ यांचे संकलन करतात.
शिक्षक विद्यार्थ्यांना सकस आहारामुळे आजारांपासून कसे संरक्षण होते याविषयी माहिती गोळा करण्यासाठी घटक ठरवून देतात.
घटक : सकस आहार म्हणजे काय ?
सकस आहाराचे घटक कोणकोणते आहेत ?
सकस आहाराला अजून कोणत्या नावाने संबोधले जाते?
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती तर्कसंगत विचार, चिकित्सक वृत्ती, आरोग्यदायी सवयी, सकस आहाराचे महत्त्व.
आवश्यक साहित्य : चित्रे, व्हिडिओ क्लिप
शिक्षक कृती: पूर्वनियोजनानुसार शिक्षक विद्यार्थ्यांना सकस आहारामुळे आजारांपासून कसे संरक्षण होते याविषयी एकत्रित करण्यासाठी सांगितलेली माहिती विचारतात.
१) सकस आहार म्हणजे काय ? (उत्तर: रोजच्या अन्नपदार्थांत पुरेशा प्रमाणात पोषणतत्त्वांचा समावेश करणाऱ्या आहाराला 'सकस आहार' असे म्हणतात.)
२) सकस आहाराचे घटक कोणकोणते आहेत ? (उत्तर कर्बोदके, दुग्धजन्य पदार्थ, फळे व भाजीपाला,
स्निग्धपदार्थ, तृणधान्य, खनिजे, पाणी व कडधान्य इत्यादी.)
३) सकस आहाराला अजून कोणत्या नावाने संबोधले जाते? (उत्तर: समतोल आहार)
शिक्षक विद्यार्थ्यांना सकस आहार कोणता? सकस आहारामुळे आजारांपासून होणारा बचाव याविषयी खालील मुद्द्यांचे महत्त्व पटवून देतात.
सकस आहार : रोजच्या अन्नपदार्थांत पुरेशा प्रमाणात पोषकतत्त्वांचा समावेश असणाऱ्या आहाराला सकस आहार असे म्हणतात.
निरोगी शरीरासाठी संतुलित, पौष्टिक व सकस आहार आवश्यक आहे. योग्य वाढ आणि विकासासाठी ते आवश्यक आहे. तसेच आहारात पोषकतत्त्वांचे योग्य संतुलन राखणे गरजेचे आहे. शिवाय भाज्या, फळे, मांस यांचे सेवन केल्याने आजार टाळण्यास आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.
सकस आहारामुळे आजारांपासून संरक्षण :
• सकस आहार शरीराला योग्य प्रकारे कार्य करण्यास मदत करते आणि रोगापासून संरक्षण करते.
• सकस आहारामुळे एन्झाईम्स, हार्मोन्स आणि शरीरातील इतर रसायने तयार होण्यास मदत होते.
• सकस आहार शरीराच्या पेशींची दुरुस्ती आणि पुनर्निमिती करण्यासाठी पोषक ठरतो.
• सकस आहार अन्नातून पोषकतत्त्वे शोषून घेण्यास आणि वापरण्यास मदत होते.
• पोषक आहार नियमित शारीरिक क्रियाकलाप हे हृदयविकार, कर्करोग आणि पक्षाघात यासह जुनाट आजारांना प्रतिबंध करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
• मुलांमध्ये आणि पौगंडावस्थेतील मुलांमध्ये नियमित शारीरिक हालचाली केल्याने आणि सकस आहाराचे सेवन केल्याने लठ्ठपणा आणि संबंधित जुनाट आजारांचा धोका कमी होतो.
• जीवनसत्त्वे ए, सी, ई, डी आणि बी 6 निरोगी रोगप्रतिकारक यंत्रणा टिकवून ठेवण्यास उपयुक्त आहेत. आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी सकारात्मक कार्य करणाऱ्या खनिजांमध्ये जस्त, तांबे आणि सेलेनियमचा समावेश आहे.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी पूर्वनियोजनानुसार शिक्षकांनी ठरवून दिलेल्या घटकांवर संकलित केलेली माहिती सांगतात.
२) सकस आहार व त्यामुळे आजारांपासून बचाव याविषयी शिक्षकांनी सांगितलेल्या माहितीचे काळजीपूर्वक श्रवण करतात.
३) निरोगी जीवनशैलीसाठी सकस आहाराचे असलेले महत्त्व आत्मसात करतात.
४) दैनंदिन जीवनात सकस व संतुलित आहार देतात.
संदर्भ साहित्य :
1) https://youtube.com/@ministryofayushofficial?si=T8DRU5J7V2bqAjtj
2) https://en.wikipedia.org/wiki/Nutrition