आनंद बाजार | वित्तीय व्यवस्थापन/आर्थिक साक्षरता-1 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
६) वित्तीय व्यवस्थापन/आर्थिक साक्षरता
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : आनंद बाजार
पूर्वनियोजित कृती : 'आनंद बाजार' हा विद्यार्थ्यांच्या आवडीचा उपक्रम आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार व स्थानिक परिस्थितीनुसार आनंद बाजारात विक्री करण्यासाठी विविध पदार्थ आणण्याची सूचना देतात. त्यासोबतच खरेदी-विक्री व्यवहार होण्यासाठी आवश्यक इतर साहित्यदेखील आणायला सांगतात. जमा-खर्चाच्या नोंदी ठेवण्यासाठी मार्गदर्शन करतात.
विकसित होणारी कौशल्ये :
१) आर्थिक व्यवहार कौशल्य, व्यवहारज्ञानाचे कौशल्य.
आवश्यक साहित्य : भाजीपाला, फळे, खाण्याचे पदार्थ, स्टॉल, वजनकाटा, रोख रक्कम व सुटे पैसे.
शिक्षक कृती :
१) 'आनंद बाजार' हा उपक्रम विद्यार्थ्यांना नेहमीच आवडतो.
२) शिक्षक विदयार्थ्यांना वस्तू कशा विकायच्या याबाबत मार्गदर्शन करतात.
३) वस्तूंची किंमत काय आहे हे शिक्षक समजावून सांगतात.
४) वस्तू विकल्यानंतर आलेल्या पैशातून आपले पैसे घेऊन उरलेले पैसे गिऱ्हाईकास परत कसे दयायचे याबद्दल मार्गदर्शन करतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांच्या सूचनांचे पालन करतात.
२) आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाची दक्षता घेतात.
३) आपल्या हिशोबाच्या नोंदी ठेवतात.
४) आनंद बाजारातून मिळालेल्या या अनोख्या अनुभवाबद्दल आपले मतदेखील व्यक्त करतात.
संदर्भ साहित्य : https://youtu.be/BiIMJJaAc_E?si=QBGFQ6DC-_MATMm5