शालेय परिसरातील कचऱ्याचे ऑडिट करणे | पर्यावरण संवर्धन-1 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
३) पर्यावरण संवर्धन
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : शालेय परिसरातील कचऱ्याचे ऑडिट करणे.
पूर्वनियोजित कृती :
'शालेय परिसरातील कचऱ्याचे ऑडिट' या उपक्रमाचे आयोजन करतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती :
१) पर्यावरण संरक्षण
२) निरीक्षण
३) वैज्ञानिक दृष्टिकोन
४) वैयक्तिक व सामाजिक जबाबदारीचे भान
५) संवाद
६) सर्जनशीलता
७) नेतृत्व
आवश्यक साहित्य : वही, पेन, खडू, फळा, प्रोजेक्टर, टाकाऊ वस्तू, डिंक, रंगीत कागद, कुदळ, फावडे इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक शालेय परिसरात कचरा गोळा होणारी ठिकाणे निश्चित करतात.
२) शिक्षक शालेय परिसरात तयार होणाऱ्या कचऱ्याचे ऑडिट करण्यासाठी तक्ते बनवतात.
३) तक्त्यामध्ये खालीलप्रमाणे स्तंभ असावेत.
कचरा गोळा होण्याचे ठिकाण
कचऱ्याचे स्वरूप (ओला/सुका)
• कचऱ्याचे अंदाजे वजन
विघटनशील कचऱ्याचे अंदाजे प्रमाण %
अविघटनशील कचऱ्याचे अंदाजे प्रमाण %
कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते?
४ ) शिक्षक विदयार्थ्यांचे गट करून उपक्रमाबाबत सूचना देतात.
५) शिक्षक विद्यार्थ्यांना कचऱ्याचे ऑडिट कसे करावे याबाबत सूचना देतात.
६) माहितीचे संकलन व विश्लेषण करण्यास विद्यार्थ्यांना मदत करतात.
७) प्राप्त माहितीवरून निष्कर्ष काढण्यास मदत करतात.
८) निष्कर्षावरून संभाव्य उपाययोजना कोणत्या करता येतील याविषयी चर्चा घडवून आणतात.
६) संकलित माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना अहवाल लेखन करण्यास सांगतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांच्या सूचनेनुसार उपक्रमामध्ये सक्रिय सहभागी होतात.
२) विद्यार्थी गटामध्ये प्रकल्प करतात.
३) संकलित माहितीवरून अहवाल लेखन करतात.
४) शिक्षकांना प्रकल्प अवलोकनार्थ सादर करतात.
संदर्भ साहित्य :
१) इंटरनेटवरील संबंधित विषयाची माहिती.
२) यूट्यूबवर उपलब्ध असणारे सुयोग्य व समर्पक व्हिडिओ.
३) ग्रंथालयात संबंधित विषयाचे उपलब्ध असणारी पुस्तके.
या उपक्रमाच्या अनुषंगाने शिक्षकांना स्थानिक परिस्थितीनुसार पुढील कृतींचे आयोजनसुद्धा करता येईल.
१) घरात तयार होणाऱ्या कचऱ्याचे ऑडिट करणे.
२) शून्य कचरा प्रकल्प राबवणे.
३) कचऱ्याची सुयोग्य पद्धतीने विल्हेवाट लावणाऱ्या विविध तंत्राची माहिती घेणे.
४) शालेय परिसरातील कचऱ्यापासून कंपोस्ट बनवणे.
५) टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन भरवणे.