आपल्या गावातील किंवा परिसरातील होऊन गेलेले स्वातंत्र्यसैनिक व समाज सुधारक | जाणून घेऊया आपल्या परिसराचा इतिहास-1 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
१८) जाणून घेऊया आपल्या परिसराचा इतिहास
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : आपल्या गावातील किंवा परिसरातील होऊन गेलेले स्वातंत्र्यसैनिक व समाज सुधारक
उपक्रमाची पूर्वतयारी :
१) मुख्याध्यापक व संस्थाप्रमुख यांची परवानगी घेणे.
२) पालकसभा घेऊन उपक्रमाविषयी माहिती देणे व त्यांची मदत घेणे.
३) विद्यार्थ्यांना उपक्रमाची माहिती करून देणे.
४) उपक्रमासाठी उपयोगी पडतील असे लिखित, मौखिक व भौतिक साधनांची यादी तयार करणे.
५) विद्यार्थ्यांचे गट तयार करून घेणे.
६) आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे.
उपक्रमाची उद्दिष्टे :
१) विदयार्थ्यांना आपल्या गावाचा समृद्ध इतिहास याविषयी माहिती करून देणे.
२) आपल्या गावातील स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचे योगदान तसेच समाज सुधारक व समाजसुधारक यांचे कार्य याविषयी विद्यार्थ्यांना जाणीव करून देणे.
३) विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य वाढीस लावणे.
४) विद्यार्थ्यांमध्ये इतिहास विषयाची गोडी निर्माण करणे.
५) विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे.
६) विद्यार्थ्यांमध्ये इतिहास लेखन व संशोधन कसे करावे याबद्दल माहिती मिळवणे.
उपक्रमाची कार्यवाही :
१) प्रथम विद्यार्थ्यांचे गट तयार करून विद्यार्थ्यांना ठरावीक परिसर नेमून दिला जाईल.
२) विद्यार्थी नेमून दिलेल्या परिसरात जाऊन तेथील ज्येष्ठ व्यक्ती, तज्ञ यांना प्रत्यक्ष भेटून गावातील होऊन गेलेले स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारक यांची माहिती मिळवतील.
३) विद्यार्थी यासाठी गावातील ग्रामपंचायत कार्यालय, नगरपरिषद यात स्वातंत्र्यसैनिकांविषयीच्या व समाजसुधारक यांच्या काही नोंदी आढळतात का याविषयी माहिती मिळवतील.
४) विदयार्थी इतिहासाची पुस्तके, वृत्तपत्र यातून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील.
५) विद्यार्थी गावातील सार्वजनिक व शाळेतील ग्रंथालय याला भेट देऊन सध्या सैनिक व समाजसुधारक यांच्याबद्दल माहिती मिळण्याचा प्रयत्न करतील.
६) विद्यार्थी त्यांना माहिती असलेल्या स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारक यांच्याविषयी जास्तीची माहिती
मिळवण्याचा प्रयत्न करतील.
७) विद्यार्थी गावातील उभारलेले काही वास्तू, शिल्प वा स्मारक असतील तर त्या ठिकाणी भेट त्याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतील.
८) विद्यार्थी गावातील माजी सैनिक यांच्याकडून सुद्धा माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील.
९) विद्यार्थी यांना मिळालेली माहिती एकत्र करून हाती घेतलेला उपक्रम यशस्वी करतील.
उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन :
१) विद्यार्थ्यांचेसमूहातील व समाजातील वर्तन यांचे निरीक्षण करणे.
२) विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य व मदतीची भावना आहे का याचे निरीक्षण करणे.
३) विद्यार्थ्यांच्या मिळालेला माहितीची नोंद घेण्याच्या पद्धतीची अवलोकन करणे.
उपक्रमाची फलनिष्पत्ती :
१) विद्यार्थ्यांमध्ये इतिहास विषयाची आवड निर्माण होईल.
२) विद्यार्थ्यांना इतिहास लेखनाची प्राथमिक माहिती मिळेल.
३) विद्यार्थ्यांना आपल्या गावातील स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारक याविषयी माहिती मिळेल. गावाचा इतिहास त्यांना समजेल.
४) विद्यार्थ्यांचे कृतीतून अध्ययन होईल.
५) विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल.