छान माझा मुखवटा | कृती व खेळांवर आधारित शिक्षण-1 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
१) कृती व खेळांवर आधारित शिक्षण
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : छान माझा मुखवटा
पूर्वनियोजित कृती :
• विद्यार्थ्यांना विविध प्राणी, पशु-पक्षी, कार्टून्स यांचे मुखवटे तयार करण्याविषयी कल्पना देतात.
• कार्डशीट कागद, डिंक, स्केचपेन, दोरा, सजावट साहित्य इत्यादी वस्तू सोबत आणण्याविषयी सूचना देतात.
सादरीकरणासाठी संकल्पना ठरवून ठेवतात.
विकसित होणारी कौशल्ये- संघभावनेचा विकास सर्जनशीलता, कलात्मक कौशल्याचा विकास, संवादकौशल्याचा विकास
आवश्यक साहित्य : कार्डशीट कागद, डिंक, स्केचपेन, दोरा, सजावट साहित्य इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मुखवटे दाखवतात. उदा., लाकूड, कागद, रबर, कागदी प्लेट्स इत्यादींपासून तयार केलेले मुखवटे.
२) विद्यार्थ्यांना कार्डशीटपासून मुखवटा तयार करताना कागदावर रेखाटन, रंगकाम, बाह्यरेषा हाताने कापणे, दोरा बांधणे या टप्प्यांसह कृती पूर्ण करून दाखवतात.
३) विद्यार्थ्यांना मुखवटा बनविण्यासाठी प्रोत्साहन देतात. आवश्यक तेथे मदत करतात.
४) शिक्षक स्वतः मुखवटा चेहऱ्यावर परिधान करून संवाद म्हणतात.
५) विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेला मुखवटा चेहऱ्यावर लावायला सांगतात. पात्रानुसार आवाज काढून वैयक्तिक सादरीकरण करायला सांगतात, त्या पात्राची गुणवैशिष्ट्ये सांगण्यास प्रेरित करतात.
६) त्यांनतर काही विद्यार्थ्यांना गटाने मुखवट्यासह छोटेछोटे संवाद सादर करायला सांगतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांच्या प्रात्यक्षिकाचे निरीक्षण करतात.
२) शिक्षकांच्या सूचनेनुसार त्यांचा आवडता प्राणी, पक्षी, कार्टून यांचे मुखवटे तयार करतात.
३) रेखाटन, रंगकाम, बाह्यरेषा कापणे, दोरा बांधणे या टप्प्याने कृती करतात.
४) तयार केलेला मुखवटा चेहऱ्यावर लावून त्यानुसार प्राणी, पक्षी, कार्टून इत्यादींचा आवाज काढतात.
५) विदयार्थी समोर येऊन वैयक्तिकरीत्या मुखवट्यांसह छोटेछोटे संवाद सादर करतात.
संदर्भ साहित्य : https://youtu.be/s3hgr97Tkj8?si=VA61WMcZOIWqv-em