'फार्म टू प्लेट' अंतर्गत भरडधान्य पाककृती स्पर्धा | कृषीविषयक साक्षरता-1 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
६) कृषीविषयक साक्षरता
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : 'फार्म टू प्लेट' अंतर्गत भरडधान्य पाककृती स्पर्धा
पूर्वनियोजित कृती :
• विद्यार्थ्यांमध्ये कृषीविषयक साक्षरता विकसित होण्यासाठी भरडधान्य पाककृती स्पर्धा आयोजन करणे.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती :
१) कृषी तंत्रज्ञान व अन्नप्रक्रिया
२) वैज्ञानिक दृष्टिकोन
३) अन्न परिरक्षण
४) सुसंवाद
५) माहिती साक्षरता
६) नेतृत्व
७) सादरीकरण कौशल्य इत्यादी
आवश्यक साहित्य : वही, पेन, खडू, फळा, प्रोजेक्टर, डस्टबिन, रंगरंगोटीचे साहित्य, अन्नपदार्थांची मांडणी करण्यासाठी प्लेट इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना भरडधान्य पाककृती स्पर्धेबाबत माहिती देतात.
२) शिक्षक या स्पर्धेच्या सूचना विद्यार्थ्यांना समजावून देतात.
• भरडधान्याचा वापर करून पाककृती तयार करावयाची आहे.
अन्नपदार्थाचे पोषणमूल्य व तयार करण्याची कृतीचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण करावे.
पाककृती तयार करण्यासाठी पालकांचे मार्गदर्शन घेऊ शकतात.
स्वतःची सुरक्षितता व योग्य काळजी घेऊन पालकांच्या मार्गदर्शनाखाली पाककृती घरी तयार करायची आहे.
स्पर्धेच्या दिवशी तयार केलेली पाककृती व सोबत माहिती वजा पोस्टर शाळेत आणावे.
• आकर्षक मांडणी करून पाककृती बाबत २ मिनिटे सादरीकरण करावे.
३) विद्यार्थ्यांना पाककृती स्पर्धेसाठी पुरेसा वेळ देऊन स्पर्धेच्या दिवसाचे नियोजन सांगतात.
४) प्रत्यक्ष स्पर्धेच्या दिवशी विद्यार्थ्यांना टेबल व इतर साहित्य देऊन योग्य मांडणी करण्यास सांगतात.
५) मांडणी झाल्यानंतर मूल्यमापन पथकामार्फत मूल्यमापन करतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांच्या सूचनेनुसार उपक्रमामध्ये सक्रिय सहभागी होतात.
२) पालकांच्या मदतीने विविध पाककृती तयार करून आणतात.
३) पाककृतीबाबत सादरीकरण करतात.
४) भरडधान्याचे आहारातील महत्त्व व पोषणमूल्याबाबत माहिती सांगतात.
संदर्भ साहित्य :
१) इंटरनेटवरील माहिती
२) यूट्यूबवर उपलब्ध असणारे सुयोग्य व समर्पक व्हिडिओ.
३) ग्रंथालयात संबंधित विषयाचे उपलब्ध असणारे पुस्तक.
या उपक्रमाअंतर्गत स्थानिक परिस्थितीनुसार पुढील कोणत्याही कृतीचे नियोजन करता येईल.
१) शेतातून ताटात येईपर्यंत होणारा अन्नधान्याचा प्रवास समजून घेणेसाठी क्षेत्रभेटीचे आयोजन करणे किंवा सुसंगत शैक्षणिक व्हिडिओ दाखवणे.
२) अन्नप्रक्रिया उद्योगामधील प्रगतशील शेतकऱ्यांच्या मुलाखतीतून कृषीविषयक विविध प्रक्रिया समजून घेणे.
३) पशुपालन, जनावरांचा गोठा, कुक्कुटपालन, दूध डेअरी इत्यादी यांसारख्या शेतीपूरक व्यवसाय स्थळांना भेटी देणे व माहिती मिळवणे.
४) एक राज्य निवडून त्या राज्याच्या आहार वैशिष्ट्यांवर आधारित पाककृतीची माहिती संकलित करणे.
५) भरडधान्यापासून तयार होणारे अन्नपदार्थ आणि त्यांचे पोषणमूल्य याबाबत जाणीवजागृती करणारे पोस्टर प्रदर्शन आयोजित करणे.