माझी छोटीशी बाग / परसबाग उपक्रम | कृषीविषयक साक्षरता-1 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
५) कृषीविषयक साक्षरता
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : माझी छोटीशी बाग / परसबाग उपक्रम
पूर्वनियोजित कृती :
विद्यार्थ्यांमध्ये कृषीविषयक साक्षरता विकसित होण्यासाठी माझी छोटीशी बाग/परसबाग उपक्रम आयोजित करणे. या अंतर्गत शिक्षक पुढील कृतींचे आयोजन करतात.
१) शालेय परिसरात परसबाग तयार करणे व देखभाल करणे.
२) वर्गाच्या रिकाम्या जागेत / कुंडीत रोपे लावून त्यांची जोपासना करणे.
३) शालेय परिसरातील जमा होणारा कचरा जसे पालापाचोळा, फळांची साली, भाज्यांची देठे संकलित करून त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करणे आणि त्याचा वापर करणे.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती: पर्यावरण संरक्षण व संवर्धन, निसर्गप्रेम, सर्जनशीलता, कारककौशल्यांचा विकास इ.
आवश्यक साहित्य : विविध प्रकारची रोपे, फुलझाडे, कुंड्या किंवा रिकामे पत्र्याचे डबे / रंगांचे रिकामे डबे इ.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना माझी छोटीशी बाग / परसबाग उपक्रम या विषयावर आधारित माहिती देऊन त्याबद्दल महत्त्व पटवून सांगतात आणि रोपे आणणे, माती, कुंड्या इतर साहित्य संकलन इत्यादीची पूर्वतयारी करतात.
२) शिक्षक विद्यार्थ्यांना माझी छोटीशी बाग / परसबाग उपक्रम या उपक्रमांतर्गत करावयाच्या नियोजित कृतीबाबत सविस्तर सूचना देतात.
३) शाळेमध्ये परसबाग तयार केली नसेल किंवा रोपांची लागवड केली नसेल तर ती तयार करण्यासाठी विदयार्थ्यांना या उपक्रमाबाबत करावयाच्या कृतीबाबत मार्गदर्शन करतात.
प्लॅस्टिकची बाटली/पत्र्याचे डबे यांची रंगरंगोटी करणे.
• फळझाडे, फुलझाडे इत्यादी यांची कुंड्यांमध्ये लागवड करण्यासाठी शिक्षकांना मदत करणे.
• शालेय परसबागेतील कचरा काढून टाकणे व स्वच्छता करणे.
• रोपांना पाणी देणे इत्यादी.
४) शिक्षक 'स्वच्छ शाळा आणि सुंदर शाळा' अंतर्गत वर्गातील रिकाम्या जागेत फुलझाडे लावणे आणि त्यांची देखभाल करणे याविषयी गटनिहाय काम करण्यास सांगतात.
५) शिक्षक शालेय परिसरातील कचरा संकलित करून त्यापासून खत निर्मिती करणे आणि त्याचा वापर
परसबागेत करण्यास सांगतात.
६) शालेय बागेतून मिळणाऱ्या फुलांपासून कार्यक्रमासाठी आकर्षक पुष्पगुच्छ तयार करण्यास प्रोत्साहन देतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी माझी छोटीशी बाग/परसबाग उपक्रमात सहभागी होतात.
२) शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार वर्गातील मोकळ्या जागेत फुलझाडे लावतात आणि त्यांची देखभाल करतात.
३) विद्यार्थी परिसरातील जमा होणाऱ्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी आवश्यक कृती करतात.
४) विद्यार्थी शालेय परसबागेतील औषधी वनस्पती व इतर झाडांची नावे सांगून त्यांची माहिती सांगतात.
संदर्भ साहित्य :
१) परसबाग तयार करण्यासंबंधीचे व्हिडिओ, माहिती पुस्तिका.