लगोरी | पारंपरिक खेळांचा परिचय-1 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
१२) पारंपरिक खेळांचा परिचय
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : लगोरी
पूर्वनियोजित कृती :
शिक्षक लगोरी खेळाशी संबंधित माहितीचे संकलन करतात.
लगोरी खेळाची माहिती विद्यार्थ्यांस गोळा करण्यास सांगतात व यासाठी घटक ठरवून देतात.
लगोरी या खेळाला अजून कोणत्या नावाने संबोधले जाते?
लगोरी खेळ केव्हापासून खेळला जातो?
लगोरी खेळात किती संघ खेळतात ?
लगोरी कशास म्हणतात ?
लगोरी फोडण्यास कोणत्या चेंडूचा वापर करतात ?
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती संघभावना, एकाग्रता, चपळता, सहकार्य, हस्त व नेत्र समन्वय, धोरणात्मक विचार.
आवश्यक साहित्य : लगोरी, चेंडू, चुना, दोरी, मेजरींग टेप.
शिक्षक कृती :
१) लगोरी खेळ खेळण्यासाठी १८.२८ मी. ते ३०.४८ मी. व्यासाचे वर्तुळ आखून घेतात.
२) लगोरी खेळाविषयी विद्यार्थ्यांना माहिती विचारतात.
३) लगोरी खेळ व खेळाच्या नियमांविषयी विद्यार्थ्यांना थोडक्यात माहिती देतात.
४) खेळ खेळताना सुरक्षिततेच्या महत्त्वाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण करतात.
५) खेळ खेळण्यासाठी विद्यार्थ्यांची गटात विभागणी करतात.
६) खेळ कसा खेळावा हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीद्वारे समजावतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी लगोरी खेळाविषयी संकलित केलेली माहिती सांगतात.
२) खेळ खेळताना सुरक्षिततेच्या महत्त्वाविषयी जाणून घेतात.
३) शिक्षकांनी लगोरी खेळ व खेळाच्या नियमांविषयी सांगितलेली माहिती लक्ष देऊन ऐकतात.
४) खेळ खेळण्यासाठी गटात विभागतात.
५) प्रत्यक्ष खेळ कसा खेळावा याविषयी शिक्षकांनी दाखविलेल्या प्रात्यक्षिकाचे काळजीपूर्वक निरीक्षण करून खेळ खेळतात.
संदर्भ साहित्य :
1) https://youtu.be/tOD8DK7kLiY?si=kJ4zKcqm33U1dgU0
2) https://youtu.be/oq_3DNyD1IA?si=5SLgAfJg5Pmm_2WL
3) https://marathiglobalvillage.com/traditional-cultural-games/