शालेय बचत बँक | वित्तीय व्यवस्थापन-1 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
७) वित्तीय व्यवस्थापन
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : शालेय बचत बँक
पूर्वनियोजित कृती :
• शालेय बचत बँक निर्मिती करण्यासाठी सर्वप्रथम शिक्षक हे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांकडे शालेय कामकाज करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांकडे बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी करावयाची जबाबदारी, कामे, कर्तव्य यांच्याविषयी सर्वप्रथम सर्वांना मार्गदर्शन करतात व जबाबदारी निश्चित करतात.
• हिशोबाचे नियोजन व व्यवस्थापन करतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती : बचत करण्याची सवय, बँकिंग व्यवहार कौशल्य
आवश्यक साहित्य : वही, पेन, बचत पुस्तक.
शिक्षक कृती :
१) शालेय शालेय बचत बँक निर्मिती करण्यासाठी सर्वप्रथम शिक्षक हे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांकडे शालेय कामकाज करण्यासाठी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची करावयाची जबाबदारी, कामे, कर्तव्य यांच्याविषयी सर्वप्रथम सर्वांना मार्गदर्शन करतात व जबाबदारी निश्चित करतात.
२) हिशोबाचे नियोजन व व्यवस्थापन करतात. शिक्षक विदयार्थ्यांना बँकेचे महत्त्व समजावून सांगतात.
३) बँकेत पैसे ठेवणे आणि काटकसरीची सवय लागते व पैशांचे संरक्षण होते. बचत केलेल्या पैशावर बँक व्याज देते ही माहिती शिक्षक विद्यार्थ्यांना देतात.
विद्यार्थी कृती :
१) शाळेतील विद्यार्थ्यांकडे शालेय कामकाज करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांकडे बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची
करावयाची जबाबदारी, कामे, कर्तव्य पार करतात व जबाबदारी समजावून घेतात.
२) हिशोबाचे नियोजन व व्यवस्थापन करतात. विद्यार्थ्यांना बँकेचे महत्त्व समजते. बँकेत पैसे ठेवण्याची आणि काटकसरीची सवय लागते. विद्यार्थी बँकेचे महत्त्व समजावून घेतात.
३) शिल्लक पैसे घरात न ठेवता ते बँकेत ठेवण्याची सवय लागते. थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीने बँकेत पैसे ठेवल्याने पैशांमध्ये वाढ होत असते.
४) विद्यार्थी आपल्याजवळील पैशाचे नियोजन करतात.
संदर्भ साहित्य :
1) https://youtu.be/S6qV1_Qzmv8?si=DqjFoBxfisqp2CxA