नेल आर्ट | विविध व्यवसायांचा परिचय आणि करिअरविषयक मार्गदर्शन-1 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
१५) विविध व्यवसायांचा परिचय आणि करिअरविषयक मार्गदर्शन
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : नेल आर्ट
पूर्वनियोजित कृती :
शिक्षक नेल आर्टबाबत इंटरनेटवरून खालील बाबीं संदर्भात माहिती गोळा करतात.
आवश्यक साहित्य
नेल आर्टच्या कृती पायऱ्या
विविध डिझाईन
नेल आर्ट करणाऱ्या व्यावसायिकाचे नाव
हा व्यवसाय कोठे केला जातो?
साधारणपणे नेल आर्टसाठी एक नख याप्रमाणे किती पैसे घेतले जातात?
नेल आर्ट करण्यासाठी पालकांच्या अनुमतीने विद्यार्थ्यांना साहित्य घेऊन येण्यास सांगतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती- निरीक्षण, सर्जनशीलता, कला कुसर.
आवश्यक साहित्य : नेल पॉलिश / नेल वार्निश, चमकते रंग, नेल आर्ट पेन, नेल डॉटर ज्याला 'डॉटिंग टूल्स' म्हणून देखील ओळखले जाते, नेल आर्ट ब्रश, स्टेशनरी टेप/स्टिकर, पातळ रंगीत स्ट्रिपिंग टेप, स्पंज (ग्रेडिएंट इफेक्ट्ससाठी), नेल स्टिकर, छोटी वाटी, पाण्याची बाटली.
शिक्षक कृती : शिक्षक विद्यार्थ्यांना नखाच्या सजावटीविषयी पुढीलप्रमाणे माहिती देतात.
१) नेल आर्ट म्हणजे नखाला विविध प्रकारे सजविण्याची कला.
२) या कलेचा वापर आजच्या काळात मोठ्या प्रमाणात केला जातो.
३) नेल आर्ट पार्लर येथे जाऊन केले जाते.
४) यासाठी प्रत्येकी एक नख १००/- रुपये कमीत कमी अशी किंमत आकारली जाते.
५) आवश्यक साहित्यात नमूद केलेले साहित्य यासाठी वापरले जाते.
शिक्षक विद्यार्थ्यांना नेल आर्टसाठी खालील पायऱ्यांप्रमाणे कृती करून दाखवतात.
१) नखावर पहिल्यांदा नेलपेंटचा कोणत्याही एका रंगाचा प्राथमिक थर लावावा.
२) यानंतर त्याच नखावर दुसऱ्या रंगाचे दोन थर लावावेत.
३) हे थर सुकू दयावेत.
४) यावर लवकर सुकू शकतो तो top-coat लावावा व तो सुकू दयावा.
५) पांढऱ्या acrylic रंगात थोडे पाणी मिसळावे.
६) पेंट ब्रशने नेलपेंट लावलेल्या नखावर छोटे फूल/चंद्र/फुलपाखरू काढावे.
७) काळ्या नेल पेंटचा उपयोग करून बारीक brush ने वरील फूल/चंद्र/फुलपाखरूसाठी बाहेरील किनार काढावी.
८) यावर top-coat लावावे व सुकू दयावे.
९) अनावश्यक लागलेले नेलपेंट, नेलपेंट रिमुव्हरने कापसाच्या बोळ्याच्या साहाय्याने पुसून टाकावे.
१०) शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे नेलआर्ट करण्यास सांगतात.
विद्यार्थी कृती :
१) शिक्षकांनी नेल आर्टबाबत दिलेली माहिती काळजीपूर्वक ऐकतात.
२) विद्यार्थी शिक्षक करीत असलेल्या कृतीचे निरीक्षण करतात.
३) कृती पायऱ्यांप्रमाणे नेल आर्टच्या आवडीनुसार वेगवेगळ्या डिझाईन्स करतात.
संदर्भ साहित्य :
1) प्री-व्होकेशनल गाईडलाईन्स NCERT
2) hhttps://youtube.com/shorts/_oawZl2lp6c?si=MzXeYMJhullR5UBP
3) https://youtube.com/shorts/aEcOWq_ZfFc?si=EYZQbkfPeOz5NZCB