माझ्या पर्यावरणस्नेही सवयी या थीमवर आधारित पोस्टर मेकिंग स्पर्धा व चित्रकला स्पर्धा | पर्यावरण संवर्धन-1 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
२) पर्यावरण संवर्धन
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : माझ्या पर्यावरणस्नेही सवयी या थीमवर आधारित पोस्टर मेकिंग स्पर्धा व चित्रकला स्पर्धा.
पूर्वनियोजित कृती :
• इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणस्नेही सवयी या विषयावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करणे. या उपक्रमांतर्गत शिक्षक पुढील कोणत्याही एका थीमवर पोस्टर मेकिंग स्पर्धा व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करतात.
१) पाणी बचत
२) ऊर्जा/वीज बचत.
३) स्वच्छ आणि सुंदर शाळा/घर.
४) कचरा व्यवस्थापन इत्यादी.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती: सर्जनशीलता, निरीक्षण, पर्यावरण संरक्षण व संवर्धन, जाणीव-
जागृती, निसर्गप्रेम, वैज्ञानिक दृष्टिकोन.
आवश्यक साहित्य : विविध पोस्टर मेकिंग / चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यासाठी लागणारे साहित्य आणि प्रदर्शन मांडणी करण्यासाठी शाळेत उपलब्ध असणारे साहित्य.
शिक्षक कृती :
१) शिक्षक इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना 'माझ्या पर्यावरणस्नेही सवयी' या विषयावर आधारित शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांविषयी सविस्तर सूचना देतात.
२) या सूचनांमध्ये स्पर्धेचे निकष, कालावधी आणि नियोजन याविषयी माहिती देतात.
२.१) स्पर्धेकरिता पुढील विषय असतील.
पाणी बचत
• ऊर्जा/वीज बचत
स्वच्छ व सुंदर शाळा/घर.
• कचरा व्यवस्थापन
२.२) या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी घरी पोस्टर/चित्र तयार करावे.
२.३) या स्पर्धेसाठी तयारीसाठी २ आठवड्यांचा वेळ असेल.
२.४) तयार पोस्टर संदर्भात २ मिनिट सादरीकरण करणे.
३) शिक्षक स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना कालावधी देऊन प्रदर्शन मांडणीच्या एका शनिवारी विद्यार्थ्यांनी तयार शिक्षक स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना कालावधी देऊन प्रदर्शन मांडणीच्या एका शनिवारी विद्यार्थ्यांनी तयार केलेले पोस्टर आणि चित्रे यांचे संकलन करून प्रदर्शन मांडणी करतात.
४) विद्यार्थ्यांना पोस्टर आणि काढलेल्या चित्रांविषयी थोडक्यात सादरीकरण करण्याची संधी देतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी चित्रकला स्पर्धा व पोस्टर मेकिंग सादरीकरण स्पर्धांमध्ये सहभागी होतात.
२) विद्यार्थी पर्यावरणस्नेही सवयींविषयी आपल्या चित्रातून किंवा पोस्टरमधून अभिव्यक्त होतात.
संदर्भ साहित्य :
१) इंटरनेट, माहिती पुस्तिका, वतर्मानपत्रातील कात्रणे इत्यादी.