११) क्षेत्रभेट व यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : आपल्या सभोवती (बँक क्षेत्रभेट)
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक क्षेत्रभेटीसाठी बँकेला भेट देण्याचे निश्चित करतात.
शिक्षक परिसरातील क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या बँक प्रमुखांची परवानगी घेतात व पालकांची पूर्व परवानगी घेतात.
शिक्षक विद्यार्थ्यांना सुरक्षासंबंधी व शिस्तीचे पालन होण्यासाठी सूचना देतात. विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी याची सूचना देतात. (उदा. पाणी बॉटल ठेवणे, रांगेत चालणे, परवानगीशिवाय अनोळखी वस्तूंना हात लावू नये, शांतता राखणे, लक्षपूर्वक ऐकणे, स्वतःच्या साहित्याची काळजी घेणे इ. सूचना)
• शिक्षक क्षेत्रभेटीसाठी ठिकाण निश्चित झाल्यानंतर विद्यार्थ्यांशी चर्चा करून प्रश्नावली तयार करतात.
उदा. गावातील बँक भेट
१) बँकेचे नाव काय आहे?
२) बँकेची वेळ किती आहे ?
३) बँकेत किती कर्मचारी काम करतात ?
४) बँकेचे खातेदार किती आहेत ?
५) बँक ग्राहकांसाठी कोणकोणत्या सुविधा देते ?
६) बँक ग्राहकांसाठी कोणकोणत्या योजना राबवतात ?
७) बँकेतील व्यवहार कसे केले जातात?
८) चेकबुक, एसएमएस, लोन, लॉकर यांबद्दल माहिती मिळवा.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती- निरीक्षण, संप्रेषण, सहकार्य, प्रश्नकौशल्य, व्यावसायिक विकास आवश्यक साहित्य : पूर्वपरवानगीचे पत्र, प्रश्नावली, पाण्याची बाटली, डबा इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक पूर्वनियोजनानुसार विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीसाठी घेऊन जातात.
२) शिक्षक क्षेत्रभेटीच्या ठिकाणी शिस्तीचे व सुरक्षेचे पालन करण्यासाठी सूचना देतात.
३) शिक्षक प्रश्नावलीच्या साहाय्याने क्षेत्रभेटीच्या ठिकाणची माहिती विद्यार्थ्यांना घेण्यास सांगतात.
४) शिक्षक क्षेत्रभेटीच्या ठिकाणी शक्य असल्यास आवश्यक ते फोटो घेतात/विद्यार्थ्यांना घ्यायला सांगतात.
५) शिक्षक क्षेत्रभेटी दरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करतात. मदत करतात.
६) शिक्षक विद्यार्थ्यांना अहवाल / प्रकल्प लेखनासाठी मुद्दे देतात. जसे की, क्षेत्रभेटीचे ठिकाण, दिनांक, वार, वेळ, क्षेत्रभेटीचा हेतू, साहित्य, मिळालेली माहिती, समारोप याप्रमाणे विद्यार्थ्यांशी चर्चा करून अहवाल लेखन करून घेतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी प्रश्नावलीच्या मदतीने माहिती मिळवतात.
२) विद्यार्थी क्षेत्रभेटी दरम्यान निरीक्षण करतात. संबंधिताना प्रश्न विचारून आवश्यक माहिती संकलित करतात.
३) विद्यार्थी क्षेत्रभेटीच्या ठिकाणी शिस्तीचे व सुरक्षेचे पालन करतात.
४) विद्यार्थी क्षेत्रभेटीच्या ठिकाणी शक्य असल्यास आवश्यक ते फोटो घेतात. प्रश्न/शंका विचारतात.
५) क्षेत्रभेटीचे ठिकाण, दिनांक, वार, वेळ, क्षेत्रभेटीचा हेतू, साहित्य, मिळालेली माहिती, समारोप या मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखन करतात. आवश्यक तेथे फोटो जोडतात. अशा प्रकारे लघुउद्योग, बंधारा, नदीचा उगम / नदी किंवा स्थानिक परिस्थितीनुसार उपलब्ध ठिकाणी क्षेत्रभेटी देता येतील.
संदर्भ साहित्य :