चला संगणक हार्डवेअरची ओळख करून घेऊ | संगणकाची ओळख-1 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
१७) संगणकाची ओळख
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : चला संगणक हार्डवेअरची ओळख करून घेऊ...
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक उपक्रम घेण्याच्या आदल्या दिवशी किंवा काही दिवस अगोदर विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातून घरी, शेजारी प्रश्न विचारून हार्डवेअर म्हणजे काय ? संगणकाची हार्डवेअर कोणकोणती आहेत ? याचे उत्तर मिळविण्यास सांगतील.
(संगणक हार्डवेअर - संगणक हार्डवेअरमध्ये संगणकाचे भौतिक भाग असतात, ज्याला आपण हात लावून पाहू शकतो. जसे की, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (CPU), रँडम एक्सेस मेमरी (RAM), मदरबोर्ड, संगणक डेटा स्टोरेज, ग्राफिक्स कार्ड, साऊंड कार्ड आणि कॉम्प्युटर केस. यात मॉनिटर, माऊस, किबोर्ड आणि स्पीकर यांसारख्या बाह्य उपकरणांचा समावेश आहे.)
• शिक्षक शाळेतील संगणकाचे हार्डवेअर / संगणक हार्डवेअर प्रतिकृती / संगणक प्रयोगशाळा/संगणकाचे भित्तिचित्र/चित्र ज्या ठिकाणी असे अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन जातील व त्यांचे गट करतील.
विद्यार्थ्यांचे ४-४ किंवा विद्यार्थी संख्येनुसार योग्य होईल असे गट तयार करतील.
• शिक्षक संगणकाच्या हार्डवेअरचे स्टिकर किंवा वर्तानपत्रातून चित्रांची कात्रणे मिळवतील.
संगणकाचे हार्डवेअर संकल्पना व चित्र दाखवून संगणकाच्या हार्डवेअरचे कार्य समजण्यासाठी विद्यार्थ्यांना विचारण्यासाठीचे नमुना प्रश्न :
१) संगणकाच्या हार्डवेअरचे नाव काय आहे? (उदा., मॉनिटर)
२) या हार्डवेअरचे काय काम आहे? (उदा., चित्र दाखवणे)
३) संगणकाच्या हार्डवेअरमुळे कोणते काम करता येते?
(उदा. चित्र पाहणे, केलेले काम किंवा फाईल पाहणे, चित्रपट पाहणे, पुस्तक वाचणे, गेम खेळणे) (प्रत्येक भागासाठी/हार्डवेअरसाठी वरील तीन प्रश्न योग्य तो बदल करून विचारावेत.)
चर्चा: संगणकाच्या हार्डवेअरची काळजी व हाताळणी व्यवस्थित करावी हे स्पष्ट करतात.
१) तुमचा किबोर्ड नियमितपणे स्वच्छ करा.
२) केबल्स व्यवस्थित ठेवा.
३) मॉनिटर नियमित पुसून स्वच्छ करा.
४) तुमचा संगणक थंड वातानुकूलित ठिकाणी ठेवा.
५) योग्य पद्धतीने संगणक बंद करा. थेट पॉवर बटन बंद करू नका.
संगणकाच्या हार्डवेअरच्या स्टिक पपेट तयार करणे. संगणकाच्या भागाचे चित्र पेपरच्या स्टिक, स्ट्रॉ किंवा काडीवर चिकटविणे.
विकसित होणारी कौशल्ये डिजिटल साक्षरता, निरीक्षण कौशल्य, संभाषण कौशल्य, सहयोग कौशल्य 'संगणकाची ओळख' मध्ये संगणकाच्या हार्डवेअरची नावे व उपयोग सांगतात. संगणक मल्टीमीडिया ऑडिओ, व्हिडिओ, इमेज इत्यादी असण्याचे कारणे समजतात.
आवश्यक साहित्य : प्रत्यक्ष संगणक / संगणक प्रतिकृती, संगणक चित्र, संगणक हार्डवेअर प्रत्यक्ष/प्रतिकृती / संगणक हार्डवेअरची चित्रे.
शिक्षक कृती :
१) शिक्षक ४-४ विद्यार्थ्याचे गट तयार करतात.
२) शिक्षक पूर्वतयारी म्हणून विदयार्थ्यांना माहिती घ्यायला सांगितलेल्या, हार्डवेअर म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर विचारतात व त्यावर गटात चर्चा करतात.
३) शिक्षक विद्यार्थ्यांना तुम्ही संगणकाचे हार्डवेअर कोठे कोठे पाहिलेले आहे? हे विचारतात त्याच वेळी गटानुसार आलेल्या उत्तरांचे लेखन फलकावर करतात.
४) शिक्षक संगणकाचे हार्डवेअरचे/चित्र/प्रतिकृती/चित्र/स्टिकर / भित्तिचित्र किंवा प्रत्यक्ष हार्डवेअर दाखवून हे काय आहे? याला आपण अजून कोणत्या नावाने ओळखतो?
५) संगणकाचे हार्डवेयर भाग दाखवून नावे स्पष्ट करतात. संगणकाच्या मराठी, इंग्लिश नावाचा तोंडी सराव घेतात. (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (CPU), रँडम एक्सेस मेमरी (RAM), मदरबोर्ड, संगणक डेटा स्टोरेज, ग्राफिक्स कार्ड, साऊंड कार्ड आणि कॉम्प्युटर केस. यात मॉनिटर, माऊस, किबोर्ड आणि स्पीकर)
६) संगणकाचे हार्डवेअर विविध भाग किंवा चित्र दाखवून संगणकाचे कार्य समजण्यासाठी विद्यार्थ्यांना विचारण्यासाठी प्रश्न तयार करतात.
१) संगणकाच्या हार्डवेअरचे नाव काय आहे? (उदा. मॉनिटर)
२) या संगणकाच्या हार्डवेअरचे काय काम आहे? (उदा. चित्र दाखवणे)
३) संगणकाच्या हार्डवेअरमुळे कोणते काम करता येते? (उदा. चित्र पाहणे, केलेले फाईल काम पाहणे, चित्रपट पाहणे, पुस्तक वाचणे, गेम खेळणे)
प्रत्येक संगणकाचे हार्डवेअरसाठी वरील तीन प्रश्न विचारणे. (हे नमुना प्रश्न आहेत. यामध्ये शिक्षण परिस्थिती पाहून प्रश्नांची संख्या वाढवतात.)
७) शिक्षक विद्यार्थ्यांना गटनिहाय संगणकाच्या हार्डवेअरची कामे कोणती हे विचारतात.
८) विद्यार्थ्यांच्या आलेली उत्तरे फलकावर नोंदवितात. याबाबत विद्यार्थ्यांना आपापसात चर्चा करण्यास वेळ देतात.
९) फलकावर नोंदविलेली माहिती पाहिल्यावर लक्षात येते की, मल्टीमीडिया तयार करण्यास उपयुक्त आहे, असे आपल्याला सर्वप्रकारचे ऑडिओ, व्हिडिओ तयार करता येतात. सर्व ठिकाणी व भरपूर कामासाठी संगणकाचे हार्डवेअर उपयुक्त आहे हे स्पष्ट करतात.
१०) शिक्षक विद्यार्थ्यांना संगणकाच्या हार्डवेअरचे स्टिक पपेट दाखवून त्याचे नाव व काम विचारतात व माहिती असल्यास स्वतः सांगतात.
११) विद्यार्थ्यांना गटनिहाय पुढे बोलवून त्यानंतर स्टिक पपेट देऊन संगणकाचे हार्डवेअर व कामे स्पष्ट करतात.
१२) संगणक हार्डवेअरची काळजी कशी घ्यावी व स्वच्छता कशी करावी याविषयी माहिती सांगतात व चर्चा करतात. तुमचा किबोर्ड नियमितपणे स्वच्छ करणे, केबल्स व्यवस्थित ठेवणे, मॉनिटर नियमित पुसून स्वच्छ करणे, पीसी थंड ठेवणे, योग्य पद्धतीने संगणक बंद करणे व थेट पॉवर बटन बंद न करणे. (हे कसे करावे याविषयी चर्चा करतात व आवश्यक स्पष्टीकरण देतात.)
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी संगणकाचे हार्डवेअर कोठे कोठे पाहिलेले आहे हे सांगतात. त्याचवेळी गटानुसार आलेल्या उत्तरांच्या नोंदी व नंतर वाचन करतात.
२) विद्यार्थी संगणकाचे हार्डवेअर / हार्डवेअर चित्र/प्रतिकृती/चित्र/स्टिकर / भित्तिचित्र पाहून हे काय आहे? याला आपण अजून कोणत्या नावाने ओळखतो? अशा प्रश्नांची उत्तरे देतात.
३) संगणकाचे हार्डवेअर भाग पाहून नावे सांगतात. संगणकाच्या हार्डवेअरच्या मराठी, इंग्लिश नावाचा तोंडी सराव करतात.
४) संगणकाचे हार्डवेअर विविध भाग किंवा चित्र दाखवून संगणकाच्या हार्डवेअरचे कार्य समजण्यासाठी विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे देतात.
५) विदयार्थी गटनिहाय संगणकाच्या हार्डवेअरची कामे कोणती हे सांगतात.
६) विद्यार्थी नोंदविलेल्या उत्तराचे वाचन करतात. गटनिहाय आपसात विद्यार्थी चर्चा करतात.
७) संगणकाच्या हार्डवेअरमुळे मल्टीमीडिया सर्व प्रकारचे ऑडिओ, व्हिडिओ तयार करता येतात. सर्व ठिकाणी व भरपूर कामासाठी संगणकाचे हार्डवेअर उपयुक्त आहे, हे स्पष्ट करतात.
८) विद्यार्थी संगणकाच्या हार्डवेअरचे स्टिक पपेटद्वारे क्षिकांनी केलेले सादरीकरण पाहतात.
९) विद्यार्थी गटनिहाय स्टिक पपेटच्या साहाय्याने संगणकाचे हार्डवेअर व कामे स्पष्ट करतात.
१०) संगणकाची व त्यांच्या हार्डवेअरची निगा कशी राखावी याची माहिती ऐकतात व चर्चेत भाग घेतात.
संदर्भ साहित्य :