परिसरातील प्राचीन बारव, विहीर, तलाव या जलव्यवस्थापनाच्या स्रोतांचा अभ्यास करणे | जाणून घेऊया आपल्या परिसराचा इतिहास-1 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
२०) जाणून घेऊया आपल्या परिसराचा इतिहास
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : परिसरातील प्राचीन बारव, विहीर, तलाव या जलव्यवस्थापनाच्या स्रोतांचा अभ्यास करणे.
पूर्वनियोजित कृती :
• विद्यार्थ्यांना बारव, विहीर, तलाव यांविषयी माहिती देणे.
परिसरातील बारव, विहीर, तलाव यांचा शोध घेणे.
ऐतिहासिक माहिती असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींची माहिती घेणे.
• पालक व ज्येष्ठ नागरिक यांच्याशी विचार विनिमय करणे.
उपक्रमाची उद्दिष्टे :
१) परिसरातील बारव, विहीर, तलाव यांद्वारे केल्या जाणाऱ्या जलव्यवस्थेचा अभ्यास करणे.
२) प्राचीन जलव्यवस्थापन व आजचे जलव्यवस्थापन यांचा तौलनिक अभ्यास करणे.
३) भारताच्या प्राचीन जलसंस्कृतीची माहिती घेणे.
४) जलव्यवस्थापनाच्या स्रोतांना प्रत्यक्ष भेटी देऊन अध्ययन करणे.
उपक्रमाची कार्यवाही व अंमलबजावणी :
१) प्रथमतः परिसरातील बारव, विहीर, तलाव याविषयी पालकांशी चर्चा करून माहिती घेणे.
२) बारव, तलाव यांना प्रत्यक्ष भेटीचे नियोजन करणे.
३) गावातील ऐतिहासिक माहिती असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेणे व त्यांच्या मदतीने प्रत्यक्ष भेट देणे.
४) विद्यार्थ्यांची विविध गटात विभागणी करून त्यांना माहिती जमा करण्यासाठी सांगणे.
५) विद्यार्थ्यांना जमा केलेल्या माहितीच्या आधारे लेखन करण्यासाठी सुलभक म्हणून मार्गदर्शन करणे.
उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन :
१) विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती तपासणे.
२) विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता तपासणे.
३) विद्यार्थी मिळालेल्या माहितीचे उपयोजन कसे करतात हे पाहणे.
उपक्रमाची फलनिष्पत्ती :
१) विद्यार्थ्यांना जलव्यवस्थापन स्रोतांचे महत्त्व समजेल.
२) विद्यार्थ्यांचा प्राचीन संस्कृती, लोकजीवन, जीवनशैली या विषयांचा अभ्यास होईल.
३) विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व समजेल.
४) विद्यार्थ्यांमध्ये शोधकवृत्ती वाढीस लागेल.