सायबर गुन्हेगारीचे प्रकार | तंत्रज्ञान कौशल्य सायबर सुरक्षितता | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
१८) तंत्रज्ञान कौशल्य सायबर सुरक्षितता
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : सायबर गुन्हेगारीचे प्रकार
१) पूर्वनियोजित कृती :
शिक्षक विद्यार्थ्यांना खालील बाबतीत अधिक माहिती देतील.
> सायबर गुन्हेगारी
> सायबर गुन्हेगारीचे प्रकार
> आपल्या अवतीभोवती घडणारी सायबर गुन्हेगारी.
> समाजातील नागरिकांना आलेले अनुभव
> सायबर गुन्हेगारीत छळ कसा आणि कोणत्या पद्धतीने होण्याची शक्यता असते ?
> सायबर सुरक्षा म्हणजे काय ?
> सायबर सुरक्षा देण्यासाठीचे उपाय
शिक्षक पालकांच्या अनुमतीने याबाबत समाजात घडणारी विविध उदाहरणे देतील. स्थानिक परिस्थितीनुसार यात योग्य तो बदल करतील.
विकसित होणारी कौशल्ये निरीक्षण, जाणीव-जागृती, जबाबदारी आवश्यक साहित्य : शिक्षक निर्मित PowerPoint सादरीकरण, संगणक, मोबाइल
शिक्षक कृती :
शिक्षक विद्यार्थ्यांना खालील बाबतीत अधिक माहिती देतात.
१) सायबर गुन्हेगारी म्हणजे काय? ऑनलाइन पद्धतीने फसविणे म्हणजे काय?, बेकायदेशीर कृत्य करणे. उदा. इमेल, वेबसाईटच्या बाबतीत हे दिसून येते.
२) सायबर गुन्हेगारीचे प्रकार किती व कोणते? भरपूर प्रकार, येथे अपेक्षित किमान ४ हॅकींग, वेब
हायजॅकींग, पोर्नोग्राफी, चाईल्ड पोर्नोग्राफी. (योग्य उदाहरणे देऊन स्पष्टीकरण करतील.)
३) आपल्या अवतीभोवती सायबर गुन्हेगारी कशी घडते? ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, स्पूफिंग, क्रेडीट कार्ड फसवणूक.
४) हे सांगून त्याद्वारे समाजातील नागरिकांना कशा प्रकारे धमकावले जाते? फोनवरून, ईमेलद्वारे, मेसेजद्वारे आणि त्यांचा छळ कसा आणि कोणत्या पद्धतीने केला जातो? वैयक्तिक /सार्वजनिक खाते हॅकींग, वैयक्तिक माहिती चोरून, साधनात व्हायरस टाकून, ऑनलाइन शिवीगाळ व पाठलाग करून.
५) सायबर सुरक्षा म्हणजे नेमके काय? सायबर गुन्हेगारीपासून वाचण्यासाठी अमलात आणलेल्या उपाययोजना सांगतात.
६) सायबर सुरक्षा देणारे उपाय कोणते? यामध्ये अधिकृत प्रणाली वापरणे, क्लिष्ट पासवर्ड ठेवणे, पासवर्ड कोणासही न देणे, वैयक्तिक माहिती कोणासमोरही न उघडणे, अनोळखी व्यक्तींशी ओळख न करणे या विषयी माहिती सांगतात.
७) आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे? यामध्ये सतत ऑनलाइन राहणे टाळावे, लहान बालकांच्या व्यवहारावर लक्ष ठेवावे, निनावी फोन/मेसेज / इमेल प्रतिसाद न देणे हे अत्यंत सोप्या भाषेत, धमकावणे आणि छळ याबददल अधिक माहिती देतात.
विदयार्थी कृती :
विद्यार्थी सायबर धमकी, त्याची पद्धत आणि त्याद्वारे होणारे नुकसान, केला जाणारा छळ याबद्दल अधिक जाणून घेतात व शिक्षकांशी चर्चा करतात.
१) सायबर गुन्हेगारी म्हणजे काय?- ऑनलाइन पद्धतीने फसविणे, बेकायदेशीर कृत्य करणे. उदा. ई-मेल, वेबसाईट हे समजावून घेतात.
२) सायबर गुन्हेगारीचे प्रकार किती व कोणते? भरपूर प्रकार, येथे अपेक्षित किमान ४ हॅकींग, वेब हायजॅकींग, पोर्नोग्राफी, चाईल्ड पोर्नोग्राफी हे समजावून घेतात.
३) आपल्या अवतीभोवती सायबर गुन्हेगारी कशी घडते? ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, स्पूफिंग, क्रेडीट कार्ड फसवणूक. हे वापराबाबत कोणती काळजी घ्यावी हे समजून घेतात.
४) समाजातील नागरिकांना कशा प्रकारे धमकावले जाते? फोनवरून, ईमेलद्वारे, मेसेजद्वारे याचे प्रकार व पद्धती समजून घेतात.
५) आणि त्यांचा छळ कसा आणि कोणत्या पद्धतीने केला जातो? वैयक्तिक / सार्वजनिक खाते हॅकींग, वैयक्तिक माहिती चोरून, साधनात व्हायरस टाकून, ऑनलाइन शिवीगाळ व पाठलाग करून हे
समजावून घेतात. ६) सायबर सुरक्षा म्हणजे नेमके काय? सायबर गुन्हेगारीपासून वाचण्यासाठी अमलात आणलेले उपाययोजना
हे लक्षपूर्वक ऐकतात व त्याविषयी चर्चा करतात.
७) सायबर सुरक्षा देणारे उपाय कोणते? अधिकृत प्रणाली वापरणे, क्लिष्ट पासवर्ड ठेवणे, पासवर्ड कोणासही न देणे, वैयक्तिक माहिती कोणासमोर ही न उघडणे, अनोळखी व्यक्तींशी ओळख न करणे. याचे पालन करण्याविषयी चर्चा करतात.
८) आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे? सतत ऑनलाइन राहणे टाळावे, लहान बालकांच्या व्यवहारावर लक्ष ठेवावे, निनावी फोन/मेसेज/ इमेल प्रतिसाद न देणे इत्यादी बाबी समजून देतात.
उदा. Phishing message's, email, links
Congratulations!
You're eligible for a tax refund of $ 550.
Click the link to claim now:
irs.gov.refund-claim
संदर्भ साहित्य :
1) https://youtu.be/iYvd6IcmPJU?feature=shared
2) https://youtu.be/fVeUeC7fYmg?si=Z4VF0