सजावट करण्यासाठी रंगीत कागदांपासून रंगीत चेंडू तयार करणे | कला-1 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
१३) कला
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : सजावट करण्यासाठी रंगीत कागदांपासून रंगीत चेंडू तयार करणे.
पूर्वनियोजित कृती :
शुक्रवारी किंवा शेवटच्या तासिकेला शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना शनिवारी घेण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती देतात व तयारी करण्यास सांगतात. साहित्याची यादी लिहून देतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती: टाकाऊ वस्तूमधून, कागदातून व उपलब्ध साहित्यातून बौद्धिक कौशल्य, बहुअंगी विचार, आकलन क्षमता वाढीस लागते.
आवश्यक साहित्य : रंगीबेरंगी क्राफ्ट पेपर, कात्री, डिंक, पांढरा कागद, पेन्सिल, उपलब्ध टाकाऊ पेपर वस्तू इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शनिवारी शिक्षक विद्यार्थ्यांना गटाने कार्य देतात.
२) विद्यार्थी गटाने बसवून घेतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी आवडीने शिक्षकांनी दिलेली माहिती ऐकतात.
२) पूर्वज्ञानावर आधारित माहितीने शिक्षकांसोबत चर्चा करतात.
३) शिक्षकांना प्रश्न विचारतात.
४) शिक्षकांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे व दाखवलेल्या चित्रांच्या आधारे छोटे प्रोजेक्ट तयार करतात.
५) या प्रोजेक्टमध्ये शिक्षकांनी सांगितलेल्या माहितीचा व स्वतः घेतलेल्या माहितीचा उपयोग करतात.
६) चित्र चिकटवतात.
संदर्भ साहित्य :
1) https://youtu.be/zo5nVkvrKNE?si=lawRq1X703930K3A
2) https://www.marathimol.in/gujarat-information-in-marathi/