| सांविधानिक मूल्यांची रुजवणूक-1 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
१४) सांविधानिक मूल्यांची रुजवणूक
उपक्रम क्रमांक : १
उपक्रम १ चे नाव : चला जाणून घेऊया भारतीय संविधान प्रश्नमंजूषा
उद्देश : भारतीय संविधानाविषयी माहिती जाणून घेणे.
पूर्वनियोजित कृती :
विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत उपलब्ध करून देणे. संविधानावर आधारित प्रश्नमंजुषेच्या स्पर्धेविषयी माहिती सांगणे. भारतीय संविधानावर आधारित प्रश्नमंजुषेसाठी प्रश्न निर्मिती करणे. प्रश्नमंजुषेच्या अनुषंगाने बैठक व्यवस्था करणे.
विकसित होणारी कौशल्ये- माहिती मिळविणे, मिळालेल्या माहितीचे आकलन होण्यासाठी वाचन करणे, लक्षपूर्वक ऐकणे, प्रश्न समजून घेणे, अचूक प्रतिसाद देणे.
आवश्यक साहित्य : भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत, प्रक्षेपक, विद्यार्थ्यांना वितरित करावयाची पारितोषिके.
शिक्षक कृती :
१) प्रश्नमंजुषेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे गट तयार करतात. प्रत्यक्ष प्रश्नमंजुषेचे आयोजन करतात. विद्यार्थ्यांना भारतीय संविधानावर आधारित वैविध्यपूर्ण प्रश्न विचारतात. जसे - १) भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची पहिली बैठक कधी झाली ?
उत्तर :
२) भारतीय राज्यघटनेत एकूण किती कलमे आहेत ?
उत्तर :
३) भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर :
गटनिहाय प्राप्त गुणांचे फलकावर लेखन करतात. विद्यार्थ्यांना उत्तर देण्यासाठी वेळोवेळी प्रेरणा देतात.
विदयार्थी कृती :
१) विद्यार्थी भारतीय संविधानावर आधारित प्रश्नमंजुषेत सहभागी होण्याच्या दृष्टीने संविधानाविषयी अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी होतात. शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात.
संदर्भ साहित्य :
१) भारतीय संविधानावर आधारित माहितीच्या विविध स्रोत पाठ्यपुस्तके, इंटरनेट इत्यादी
२) प्रश्नमंजुषेवर आधारित व्हिडिओ.
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.