४) सामाजिक बांधीलकी
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : समाजातील समस्या व त्यावरील उपाय
पूर्वनियोजित कृती :
शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने, शिक्षक गावातील/शहरातील / जवळपासच्या क्षेत्रातील एक किंवा अधिक वयोवृद्धांची यादी करतात.
शिक्षक नियोजनाच्या काही दिवस अगोदर भेट घेतात. (यामध्ये विद्यार्थ्यांचे आजोबा किंवा इतर उपलब्धते नुसार.) त्यांना शनिवारी शाळेत / एखादया वृद्धाच्या घरी / कोणत्याही योग्य सार्वजनिक ठिकाणी येण्याचे निमंत्रण देतात.
आपुलकीचे/वडिलकीचे/त्यांच्या अनुभवावर आधारित प्रश्न विचारण्यासाठी प्रश्न तयार करतात. (एकत्र कुटुंब, पूर्वीच्या काळात एकमेकांना मदत करण्याची पद्धती, वाहतूक दळणवळण, विविध समारंभ व इतर प्रासंगिक प्रश्न)
मुलांनाही प्रश्न विचारण्याची संधी देण्यासाठी, प्रश्नांचा सराव घेतात.
आजोबांना शाळेत घेऊन येणे, त्यांना घरी सोडवणे या सर्व कृती विद्यार्थ्यांनी करण्याचे नियोजन करतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती-
संवादकौशल्य, जीवनकौशल्य
आवश्यक साहित्य : जेष्ठ नागरिकांचा छोटेखानी सत्कार करण्यासाठी फुले.
शिक्षक कृती :
१) शिक्षक गावातील/शहरातील / जवळपासच्या क्षेत्रातील एक किंवा अधिक वयोवृद्धांना शाळेत बोलावतात.
२) शिक्षक त्यांचे शब्द सुमन/प्रत्यक्ष फूल/फुले देऊन स्वागत करतात.
३) शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्याशी संवाद साध्यण्यास सांगतात.
४) शिक्षक विद्यार्थ्यांशी वयोवृद्ध व्यक्तींबरोबर साधलेल्या संवादाबद्दल चर्चा करतात.
विद्यार्थी कृती :
१) स्वागत समारंभात भाग घेतात.
२) ज्येष्ठांशी संवाद साधतात.
३) विद्यार्थी त्यांना काही आपुलकीचे/वडिलकीचे/त्यांच्या अनुभवावर आधारित प्रश्न विचारतात. (एकत्र कुटुंब, पूर्वीच्या काळात एकमेकांना मदत करण्याची पद्धती, वाहतूक दळणवळण, लग्न समारंभ व इतर प्रासंगिक प्रश्न)
३) आजोबांना शाळेत घेऊन येणे, त्यांना घरी सोडवणे या पर्यंत सर्व कृती शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी करतात.