दोन्ही हाताने रेखाटूया त्रिकोण आणि वर्तुळ | कृती व खेळांवर आधारित शिक्षण-1 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
१) कृती व खेळांवर आधारित शिक्षण
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : दोन्ही हाताने रेखाटूया त्रिकोण आणि वर्तुळ
व्हिडिओ पहा -
पूर्वनियोजित कृती :
• मुलांच्या बैठक व्यवस्थेचे नियोजन करतात. सोबत दोन पेन, एक वही आणण्याची सूचना देतात. खड्डू व फळ्याची व्यवस्था करतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती : दोन्ही हातांनी काम करण्याचे कौशल्य, तर्कशुद्ध विचार, अवयव
समन्वय
आवश्यक साहित्य : वही, दोन पेन, खडू.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना रांगेमध्ये बसायला सांगतात. विद्यार्थ्यांना कृतीचे निरीक्षण करायला सांगतात.
२) शिक्षक दोन्ही हातांमध्ये दोन खडू घेतात. फळ्यावर एका हाताने वर्तुळ आणि दुसऱ्या हाताने त्रिकोण एकाच वेळी काढून दाखवतात. तीच कृती सुरुवातीला हळुवार आणि नंतर वेगाने करतात.
३) विद्यार्थ्यांना वहीवर एकाच वेळी दोन्ही हातांचा वापर करून, एका हाताने वर्तुळ आणि दुसऱ्या हाताने त्रिकोण काढायला सांगतात. तीच कृती सुरुवातीला हळुवार आणि नंतर वेगाने करून घेतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांच्या कृतीचे बारकाईने निरीक्षण करतात.
२) दोन्ही हातांमध्ये दोन पेन घेऊन एकाच वेळी एका हाताने त्रिकोण व दुसऱ्या हाताने वर्तुळ काढण्याचा सराव करतात.
३) हा सराव खूप वेळा केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी समोर येऊन फळ्यावर खडूने एकाच वेळी दोन्ही हातांनी त्रिकोण आणि वर्तुळ काढून दाखवतात.