झाडांची निगा ठेवू या व झाडांना पाणी देऊ या | सामाजिक बांधीलकी-2 | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव : झाडांची निगा ठेवू या व झाडांना पाणी देऊ या.
पूर्वनियोजित कृती :
१) शिक्षक परिसरात, शाळेत रोपे लावण्यायोग्य जागा निवडतात व जागेची निश्चित करतात. तसेच विद्यार्थ्यांना घरात, परिसरात रोपे कोठे लावता येतील याबाबत चर्चा करतात.
२) शिक्षक रोपे कशी लावावेत, झाडांची निगा कशी राखावी, झाडांची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी शेतकरी किंवा कृषितज्ज्ञ यांची परवानगी घेऊन शाळेतील उपक्रमात सहभागी होण्याची व त्यांना विद्यार्थ्यांना माहिती देण्याबाबतचे नियोजन करतात.
३) शिक्षक नवीन रोपे लावण्यासाठी व असलेल्या झाडांची निगा राखण्यासाठी उपयुक्त साहित्यांची जमवाजमव करतात. गटात काम करताना इजा होणार नाही याची काळजी घेण्याबाबत सूचना देतात. शिक्षक विदयार्थ्यांना रोपांची, झाडांची काळजी कशी घ्यावी, निगा कशी राखावी. हे खालील प्रश्नांच्या आधारे शेतकरी, कृषितज्ज्ञ यांना विचारण्यास सांगतात.
प्रश्न :
१) रोपांची/झाडांची निगा कशी राखावी ?
२) रोपे लावताना कोणती काळजी घ्यावी?
४) रोपे कशी तयार करावी? किती मोठी झाल्यानंतर ती जमिनीत लावावी ?
३) रोपांना/झाडांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे?
५) झाडांची काळजी किंवा निगा कशी घेता येईल?
विकसित होणारी कौशल्ये - सुसंवाद कौशल्ये, प्रश्न, जीवनकौशल्ये, सामाजिक बांधिलकी
शिक्षक कृती :
१) शिक्षक परिसरात, शाळेत रोपे लावण्यायोग्य निवडलेल्या जागेची पाहणी करतात.
२) शिक्षक रोपे कशी लावावीत, झाडांची निगा कशी राखावी, झाडांची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी शेतकरी किंवा कृषितज्ज्ञ यांना बोलावून रोपे, झाडे लावण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याबाबत सांगतात.
३) शिक्षक विद्यार्थ्यांना दिलेल्या मार्गदर्शनानुसार रोपे लावण्यासंदर्भात विविध कामे देऊन गटात काळजी घेऊन कामे करण्यास सांगतात.
४) शिक्षक विद्यार्थ्यांकडून पूर्वनियोजनानुसार काही तयार केलेल्या प्रश्नांच्या आधारे अनुभवी शेतकरी किंवा कृषितज्ज्ञ यांच्याकडून माहिती घेण्यास सांगतात.
५) उपक्रम राबविल्यावर शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्नावलीत दिलेले प्रश्न विचारून विद्यार्थ्यांशी चर्चा करतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी परिसरात, शाळेत रोपे लावण्यासाठी योग्य जागा निवडणे व निश्चित करणे याबाबत शिक्षकांशी चर्चा करतात.
२) विद्यार्थी रोपे, झाडे लावण्यासंदर्भात विविध कामे गटात काळजी घेऊन करतात.
३) विदयार्थी रोपे कशी लावावीत, झाडांची निगा कशी राखावी, काळजी कशी घ्यावी याबाबत अनुभवी शेतकरी किंवा कृषितज्ज्ञ यांच्याकडून पूर्वनियोजनाप्रमाणे माहिती घेतात.
४) विद्यार्थी माहिती घेण्यासंदर्भात अनुभवी शेतकरी किंवा कृषितज्ज्ञ यांना प्रातिनिधिक प्रश्न विचारतात.
५) विद्यार्थी शिक्षकांसोबत होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात.
संदर्भ साहित्य :