संगणकावर पेंट टूलची ओळख | संगणकाची ओळख-2 | इयत्ता पहिली व दुसरी |आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव : संगणकावर पेंट टूलची ओळख
कृतीचे नाव : भौमितिक आकाराचे घर बनविणे
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक प्रयोगशाळेतील किंवा ऑफिसमधील डेस्कटॉप कॉम्प्युटर / लॅपटॉपचे नियोजन करतील.
अधिक संगणक उपलब्ध झाल्यास ही कृती गटाने करण्याचे नियोजन करावे.
एकच संगणक उपलब्ध असल्यास तो मोठ्या स्क्रिनला (प्रोजेक्टरला) जोडून घ्यावा.
संगणक सुरू करून उपरोक्त कृती करताना अवलंबवायची प्रक्रिया.
> संगणकाचे पॉवर बटण सुरू करावे.
> डेस्कटॉप असल्यास सीपीयूचे बटण सुरू करावे. / लॅपटॉप असल्यास लॅपटॉपचे बटण सुरू करावे.
> विंडोज स्टार्ट बटणावर क्लिक करा.
> शोध बारमध्ये 'Paint' टाईप करा.
> Paint शब्दावर किंवा आयकॉनवर क्लिक करा किंवा एंटर दाबा.
> पेंट अॅप उघडेल.
> विविध भौमितिक आकारांच्या आधारे घर बनविण्याची कृती करावी.
विकसित होणारी कौशल्ये निरीक्षण, सृजनकौशल्य, सहयोग कौशल्य, सादरीकरण कौशल्य, डिजिटल साक्षरता, संगणकावर पेंट टूलमध्ये विविध आकार बनवतात. आवश्यक साहित्य : डेस्कटॉप कॉम्प्युटर / लॅपटॉप, प्रोजेक्टर
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना संगणक प्रयोगशाळेत दोन-तीन विद्यार्थ्यांचा एक गट याप्रमाणे गट करून बसवितात.
२) सर्व संगणक व्यवस्था करून ठेवतात.
३) शिक्षक विद्यार्थ्यांना संगणक सुरू करण्यासाठी क्रम सांगून दिशादर्शन करतात.
४) केवळ एक संगणक असल्यास (तो मोठी स्क्रीन /प्रोजेक्टरला जोडतात.) शिक्षक अधूनमधून विद्यार्थी बदलून त्यांच्या मदतीने क्रिया करून घेतात.
५) शिक्षक गटनिहाय विदयार्थ्यांना पेंट (Paint) सुरू करण्याचा पुढील क्रम प्रात्यक्षिक करून दाखवितात.
१) विंडोज स्क्रीनवरील पेंट (Paint) प्रोग्राम आयकॉनवर क्लिक करणे.
२) Enter बटन क्लिक करणे किंवा डबल क्लिक करणे. पेंट (Paint) प्रोग्राम स्क्रीनवर येणार.
६) विदयार्थ्यांकडून पेंट (Paint) प्रोग्राम सुरू करण्याचे प्रात्यक्षिक करून घेतात.
७) शिक्षक विद्यार्थ्यांना गटनिहाय पेंट (Paint) प्रोग्राममध्ये विविध आकार करण्याचे पुढील क्रम प्रात्यक्षिक
करून दाखवितात. (पेंट प्रोग्राममध्ये विविध आकार तयार करता येतात. काही आकार रेडिमेड दिलेले असतात.) शिक्षक खालील विकल्पांचा उपयोग करतात.
• रीबनवर Shapes ग्रुपमध्ये विविध आकार दिसतात.
ड्रॉइंग एरियामध्ये माऊसवरील डावे बटण दाबून ओढा / ड्रॅग करणे.
आकारवर क्लिक करून ड्रॅग केल्यास आकार/साइज बदलणे. निवडलेल्या आकारात कलर डबा /फील ऑप्शन आकारात घेऊन रंग भरणे.
यामध्ये कोणी बोलताना त्यांचा संवाद/वाक्यांसाठी कॉलआऊट (Callout) आकार शोधणे.
एक कॉलआऊट (Callout) आकार क्लिक करून निवडणे.
ड्रॉइंग एरियामध्ये माऊसवरील डावे बटन दाबून ओढा / ड्रॅग करणे.
• कॉलआऊट (Callout) आकारात क्लिक करून हवी ते टाइप करून वाक्य अॅड करणे, आकारात निवडलेल्या आकारात कलर डबा /फील ऑप्शन आकारात घेऊन रंग भरणे.
६) विद्यार्थ्यांकडून पेंटमधील आकार (Shape) करण्याचे प्रात्यक्षिक करून घेतात. ७) शिक्षक गटनिहाय विद्यार्थ्यांना आकार घेऊन रंग भरण्याच्या आवश्यक तिथे मार्गदर्शन करतात.
विद्यार्थी कृती :
१) शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी संगणक प्रयोगशाळेत दोन तीन जणांचा एक गट याप्रमाणे बसतात.
२) विद्यार्थी, संगणक सुरू करण्यासाठी शिक्षकाचे दिशादर्शन ऐकून (शिक्षकांनी सांगितलेला क्रम) कृती करतात.
३) विद्यार्थी, गटनिहाय पेंट (Paint) अॅप्लिकेशन सुरू करण्याचा पुढील क्रम (प्रात्यक्षिक) पाहतात. विद्यार्थी पेंट (Paint) प्रोग्राम सुरू करण्याचे प्रात्यक्षिक करतात.
४) विद्यार्थी, गटनिहाय, पेंट (Paint) प्रोग्राममध्ये विविध आकार करण्याचे प्रात्यक्षिक पाहतात, रेडिमेड दिलेले आकार (Shapes) कसे वापरावेत हे समजून घेतात.
५) विद्यार्थी पेंट (Paint) मधील आकार (Shapes) करण्याचे प्रात्यक्षिक करतात.
६) गटनिहाय, विदयार्थी, अॅप्लिकेशन मधून योग्य तो आकार घेऊन रंग भरण्यासाठी आवश्यक तिथे शिक्षकांचे मार्गदर्शन घेतात.
७) शिक्षक सांगतील व करून दाखवतील त्याप्रमाणे कृतींचे निरीक्षण करतात.
८) शिक्षकांनी वेळोवेळी संधी दिल्यानुसार प्रत्यक्ष कृतीत सहभाग घेतात.
९) कृतींचा सराव करतात.
संदर्भ साहित्य : https://youtu.be/vuWVTsMEFB4?si=25xDHe-GeDn_awVG