शेतीपूरक व्यवसाय | कृषीविषयक साक्षरता-2 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव : शेतीपूरक व्यवसाय
पूर्वनियोजित कृती :
शिक्षक विद्यार्थ्यांसाठी शेतीपूरक व्यवसाय या विषयांतर्गत दूग्धव्यवसायाविषयी माहिती घेणे या उपक्रमाचे आयोजन करतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती :
१) शेतीपूरक व्यवसायाबद्दल माहिती
२) संवादकौशल्य
३) नेतृत्व
४) निरीक्षण इत्यादी
आवश्यक साहित्य : क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य
शिक्षक कृती :
भरडधान्य पाककृती स्पर्धा :
१) शिक्षक शेतीपूरक व्यवसायांतर्गत विद्यार्थ्यांना दूग्धव्यवसायमधील दुग्धपदार्थ निर्मिती, त्यातील विविधता, नवीन तंत्रज्ञान, पॅकेजिंग इत्यादीविषयी माहिती होण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या दूध डेअरी प्रकल्पाला क्षेत्रभेट या उपक्रमाबाबत माहिती देतात.
२) शिक्षक क्षेत्रभेटीसाठी आवश्यक ते नियोजन करतात.
३) शिक्षक क्षेत्रभेटी करिता पूर्वनियोजनासाठी आवश्यक पत्रव्यवहार, वाहन सुविधा आणि इतर मानत्यांबाबत कामकाज करतात.
४) विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीदरम्यान घ्यावयाची काळजी, करावयाचे निरीक्षण व नोंदी याबाबत सविस्तर सूचना देतात.
५) विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीदरम्यान शंकांचे समाधान होण्यासाठी प्रश्न विचारण्यास आणि संवाद साधण्यास प्रोत्साहित करतात.
६) शिक्षक क्षेत्रभेटीतील आलेले अनुभव त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांच्या सूचनेनुसार क्षेत्रभेट उपक्रमामध्ये सहभागी होतात.
२) विद्यार्थी क्षेत्रभेटीदरम्यान दिलेली माहिती समजून घेतात आणि नोंदी करतात.
३) विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान होण्यासाठी प्रश्न विचारतात.
४) विद्यार्थी क्षेत्रभेटीतील आलेले अनुभव सांगतात.
संदर्भ साहित्य :
इंटरनेट व माहिती पुस्तिका
या उपक्रमाच्या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीचा विचार करून, परिसराजवळ असणाऱ्या शेतीपूरक व्यवसाय केंद्राला क्षेत्रभेट आयोजित करणे किंवा तज्ज्ञ व्यावसायिकांचे व्याख्यान आयोजित करणे.
१) काजू प्रक्रिया उद्योग क्षेत्रभेट/व्याख्यान.
२) रेशीम उत्पादन प्रक्रिया क्षेत्रभेट/व्याख्यान.
३) विविध फळांपासून क्रश, जॅम निर्मिती क्षेत्रभेट/व्याख्यान
४) मत्स्यव्यवसाय व्याख्यान.
५) खाद्यपदार्थ गुणवत्ता व पॅकेजिंग या विषयावर व्याख्यान इत्यादी.