विटी-दांडू | पारंपरिक खेळांचा परिचय-2 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव : विटी-दांडू
पूर्वनियोजित कृती :
शिक्षक विटी-दांडू खेळाशी संबंधित माहितीचे संकलन करतात.
विटी-दांडू या पारंपरिक खेळाविषयी माहिती विद्यार्थ्यांस गोळा करण्यास सांगतात व त्याविषयीचे घटक ठरवून देतात.
विटी-दांडू हा खेळ भारताव्यतिरिक्त अजून कोणत्या देशात खेळला जातो ?
गल म्हणजे काय ?
हा खेळ खेळण्यासाठी कोणते साहित्य आवश्यक आहे?
ओली सुकी म्हणजे काय ?
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती- हस्त व नेत्र समन्वय, एकाग्रता, चपळता, आत्मविश्वास, धोरणात्मक विचार, संघभावना.
आवश्यक साहित्य : विटी, दांडू, खापर
शिक्षक कृती :
१) विटी-दांडू खेळ खेळण्यासाठी लागणारी गल तयार करून घेतात.
२) विटी-दांडू खेळाविषयी विद्यार्थ्यांना माहिती विचारतात.
३) विटी-दांडू खेळ व खेळाचे नियम याविषयी विदयार्थ्यांना थोडक्यात माहिती देतात.
४) खेळ खेळताना पाळावयाच्या सुरक्षिततेच्या नियमांविषयी विद्यार्थ्यांना जाणीव करून देतात.
५) खेळ खेळण्यासाठी विद्यार्थ्यांची गटात विभागणी करतात.
६) विट-दांडू हा खेळ कसा खेळावा हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीद्वारे समजावतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी विटी-दांडू या खेळाविषयी संकलित केलेली माहिती सांगतात.
२) शिक्षकांनी खेळ खेळताना पाळावयाच्या सुरक्षिततेच्या नियमांविषयीच्या माहितीचे काळजीपूर्वक श्रवण करतात.
३) विटी दांडू हा खेळ व त्याच्या नियमांविषयी शिक्षकांनी सांगितलेली माहिती लक्षपूर्वक ऐकतात.
४) खेळ खेळण्यासाठी गटात विभागतात.
५) प्रत्यक्ष खेळ कसा खेळावा याविषयी शिक्षकांनी दाखविलेल्या प्रात्यक्षिकाचे काळजीपूर्वक निरीक्षण करून खेळ खेळतात.
संदर्भ साहित्य :
1) https://youtu.be/pYPnYPHxwB8?feature=shared
2) https://vishwakosh.marathi.gov.in/32640/