सार्वजनिक वाचनालयास भेट | जाणून घेऊया आपल्या परिसराचा इतिहास-2 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव : सार्वजनिक वाचनालयास भेट
उपक्रमाची पूर्वतयारी
१) शिक्षक विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगतील.
२) शिक्षक विद्यार्थ्यांना एखादया संस्थेची स्थापनेपासून वर्तमान कार्यापर्यंत माहिती कशा पद्धतीने घेतली जाते याविषयी मार्गदर्शन करतील.
३) संबधित वाचनालयाला भेटीची आगाऊ कल्पना देणे. परवानगी मिळवणे.
४) वाचनालयाला भेट देऊन विचारावयाच्या प्रश्नांची यादी करणे.
उपक्रमाची उद्दिष्टे :
१) सार्वजनिक वाचनालयाचे महत्त्व समजून घेणे.
२) वाचनालयासंबंधी माहिती मिळवणे.
३) वाचनालयातील पुस्तके व त्याची नोंद कशी ठेवली जाते, त्यांची देवघेव कशी केली जाते हे समजून घेणे.
४) वाचनालयाचा इतिहास समजून घेणे.
उपक्रमाची कार्यवाही / अंमलबजावणी :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना वाचनालयाला दयावयाच्या भेटीविषयी माहिती देतील.
२) शिक्षक या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विदयार्थ्यांची यादी तयार करतील. त्यांचे आवश्यकतेनुसार गटामध्ये विभाजन करतील.
३) विद्यार्थी वाचनालयाची माहिती घेत असताना शिक्षक सुलभक म्हणून वेळोवेळी मार्गदर्शन करतील.
४) विद्यार्थी शिक्षकांच्या सहकार्याने वाचनालयाची माहिती लिहितील.
उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन :
१) क्षेत्रभेटीदरम्यानचे विद्यार्थ्यांचे वर्तन, त्यांची तयारी, माहिती मिळवण्याचे कौशल्य याविषयी शिक्षक निरीक्षण करतील.
२) शिक्षक विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य हे सुद्धा पाहतील.
उपक्रमाची फलनिष्पत्ती :
१) विद्यार्थी वाचनालयाचा इतिहास समजेल.
२) विद्यार्थी माहिती मिळवण्याचे कौशल्य व माहितीवर प्रक्रिया करण्याचे कौशल्य शिकतील.