इतर संस्कृतीची व समुदायाची माहिती घेणे | कला-2 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
१३) कला
उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव : इतर संस्कृतीची व समुदायाची माहिती घेणे.
पूर्वनियोजित कृती : शुक्रवारी परिपाठात शिक्षकांनी विदयार्थ्यांना शनिवारी घेण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल
माहिती देणे व तयारी करून घेण्यास सांगणे.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती: इतर राज्यामधील संस्कृतीबद्दल आदरभाव निर्माण होतो, थोर युगपुरुष यांच्या कार्याची दखल घेण्याची सवय जोपासली जाते.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना उपक्रमाविषयी माहिती देतात.
२) विद्यार्थ्यांना शेजारील राज्य गुजरात याबद्दल त्यांच्या सांस्कृतिक धरोहर संदर्भात माहिती सांगतात.
३) गुजरातमधील समुदायांची, त्यांच्या गायन, नृत्य व कलेची माहिती देतात.
४) गुजरातचा सांस्कृतिक वारसा या संदर्भात विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानावर आधारित चर्चा करतात.
५) गुजरातमध्ये खेळले जाणारे सांस्कृतिक खेळ दांडिया, गरबा यासंदर्भात माहिती देतात.
६) गुजराती लोकगीते याबद्दल माहिती देतात.
७) गुजराती पेहराव व भाषा यांचे महत्त्व समजावून सांगतात.