कागदाची गंमत व किंमत | सामाजिक बांधीलकी-2 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक: २
उपक्रमाचे नाव : कागदाची गंमत व किंमत
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक विद्यार्थ्यांना घरी, परिसरात अथवा शाळेत वापरून झालेले कागद जमा करण्यास सांगतात. उदा. खराब कागद, पुठ्ठे, लग्नपत्रिका, गिफ्टचे खराब पेपर, खराब रंगीत कागद जुन्या वह्यांचे लिहून उपयोगात आणलेले कागद.
• शिक्षक उपक्रमासाठी आवश्यक साहित्याची यादी करतात, यातील विद्यार्थ्यांना सहज शक्य होईल ते साहित्य आणायला सांगतात व उर्वरित साहित्य शिक्षक उपलब्ध करून देतात. शिक्षक कागदाचा पुनर्वापर करून बनवायच्या विविध वस्तूंची यादी करतात.
जसे ओरिगामी, शोभेच्या वस्तू, तोरण, माळा, फुले, मुखवटे, वह्या, पुठ्ठ्यांचे घर, यान, वारी इत्यादी कृतींची चर्चा करतात.
• शिक्षक कागदापासून विविध वस्तू बनवण्यासाठी वेळेचे नियोजन करतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती निरीक्षण, संप्रेषण, सहकार्य, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधीलकी निसर्गप्रेम, सर्जनशीलता.
आवश्यक साहित्य : टाकाऊ खराब झालेले कागद, लग्नपत्रिका, खराब गिफ्ट पेपर, खराब रंगीत कागद, जुन्या वह्यामधील लिहून उपयोगात आणलेले कागद, पुठ्ठा, डिंक, दोरा, सुई, कात्री, इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांशी कागदाच्या उपयोगाविषयी चर्चा करतात. कागद कसा तयार होतो या प्रक्रियेविषयी माहिती सांगतात.
२) शिक्षक विद्यार्थ्यांना आपण कागद कोठे वापरतो याविषयी माहिती देतात.
३) वापरात आलेल्या कागदांचे नंतर काय होते याविषयी माहिती देतात.
४) शिक्षक विद्यार्थ्यांना टाकाऊ कागदांच्या लगद्यापासून विविध वस्तू बनविण्यासंदर्भात मार्गदर्शन करतात.
५) शिक्षक टाकाऊ कागदांपासून विविध वस्तू बनवून घेतात.
६) शिक्षक उपक्रमातील कृती करताना आवश्यक तेथे विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करतात.
७) शिक्षक विद्यार्थ्यांनी वस्तू बनवून झाल्यानंतर प्रश्नावलीच्या आधारे कागदाची बचत व कागदाच्या पुनर्वापराविषयी चर्चा करतात. प्रश्न विचारून चर्चा (प्रश्नोत्तरे, गप्पागोष्टी) करतात.
विद्यार्थी कृती :
१ ) विद्यार्थी कागदाचे उपयोग समजून घेतात. कागद कसा तयार होतो याची प्रक्रिया समजून घेतात.
२) विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे टाकाऊ, खराब झालेले कागद, लग्नपत्रिका, गिफ्टचे खराब पेपर, खराब रंगीत कागद, जुन्या वह्यांमधील लिहून उपयोगात आणलेले कागद, जमा करतात.
३) विद्यार्थी कागदापासून बनवायच्या विविध वस्तूंची यादी करतात.
४) कागदाच्या लगद्यापासून वस्तू बनविण्याची कृती समजून घेऊन प्रत्यक्ष वस्तू बनवतात अथवा कागदापासून तयार होणाऱ्या वस्तू तयार करतात.
५) विद्यार्थी आवश्यक तेथे शिक्षकांची मदत घेतात.
६) विदयार्थी कागदाच्या पुर्नवापराविषयी चर्चेत सहभागी होतात.
७) विदयार्थी कागदाची बचत करतात. कागद जपून वापरण्याविषयी निर्णय घेतात.
संदर्भ साहित्य :
१) टाकावू कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तूचे फोटो.