फळभाज्यांपासून विविध कलाकृती निर्मिती व सादरीकरण | कृषीविषयक साक्षरता-2 | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रम २ : फळभाज्यांपासून विविध कलाकृती निर्मिती व सादरीकरण.
पूर्वनियोजित कृती :
या उपक्रमात फळभाज्यांपासून विविध कलाकृती, आकार, ठसेकाम इत्यादी माध्यमातून तयार केलेल्या कलाकृर्तीचे सादरीकरण करण्यासाठी स्पर्धा आयोजित करणे.
विकसित होणारी कौशल्ये- फलनिष्पत्ती फळभाज्या, पालेभाज्या यांची ओळख होणे, कारककौशल्यांचा विकास, हस्त-नेत्र समन्वय, विविध
आवश्यक साहित्य : कलाकृती सादर करण्यासाठी आवश्यक साहित्य
शिक्षक कृती :
१) शिक्षक फळभाज्यांपासून विविध कलाकृतींचे सादरीकरण या स्पर्धेचे नियोजन करतात.
२) आवश्यकतेनुसार इतर शिक्षकांची मदत घेऊन इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे निकष तयार करतात.
३) शिक्षक विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे सूचना देतात.
फळभाज्यांचा वापर करून आकर्षक कलाकृती (आकार, ठसेकाम, आकर्षक मांडणी) तयार करावयाची आहे.
घरी पालकांच्या मदतीने या उपक्रमामध्ये काय सादरीकरण करायचे आहे, कोणते साहित्य वापरायचे आहे याची चर्चा करा.
• घरी ही कलाकृती तयार करून प्रदर्शनाच्या दिवशी सुस्थितीत शाळेत आणावी.
प्रदर्शन दरम्यान कलाकृतीबाबत २ मिनिटात सादरीकरण/माहिती सांगायची असल्याने आवश्यक पूर्वतयारी करावी.
४) दिलेल्या सूचनेप्रमाणे विद्यार्थ्यांना घरी काम करण्यास सांगून पुरेसा कालावधी देतात. नियोजनानुसार विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतींचे शाळेमध्ये प्रदर्शन भरवून मूल्यमापन करतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी फळभाज्यांपासून विविध कलाकृती सादरीकरण स्पर्धेमध्ये सहभागी होतात. २) विदयार्थी त्यांनी तयार केलेल्या कलाकृतींबाबत थोडक्यात माहिती सांगतात.
संदर्भ साहित्य :
१) इंटरनेट, माहिती पुस्तिका, वर्तमानपत्र कात्रणे इत्यादी.