बिंदू जोडून पूर्ण करू आरशासारखी प्रतिमा | कृती व खेळांवर आधारित शिक्षण-2 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव : बिंदू जोडून पूर्ण करू आरशासारखी प्रतिमा.
पूर्वनियोजित कृती :
मुलांना वही, २ पेन आणण्यासाठी सूचना देतात.
• मुलांची बैठक आणि फळा-खडूची व्यवस्था करतात.
विकसित होणारी कौशल्ये- कारककौशल्ये व एकाच वेळी दोन्ही हातांनी कामे करण्याची कौशल्ये.
आवश्यक साहित्य : वही, २ पेन, खडू, फळा, आसनव्यवस्था.
शिक्षक कृती :
१) शिक्षक फळ्यावर चार बिंदूंच्या चार ओळी काढतात. विद्यार्थ्यांना अशा प्रकारे वहीवर चार टिंबांच्या चार ओळी काढायला सांगतात. दोन्ही हातात खडू घेऊन, हात न उचलता दोन दोन बिंदू आडवे, उभे असे क्रमाने जोडतात. पुन्हा हीच कृती वेगाने करून दाखवतात. नंतर विद्यार्थ्यांना दोन्ही हाताचा एकदाच वापर करून रेषा काढून बिंदू क्रमाने जोडायला सांगतात. पुन्हा हीच कृती वेगाने करायला सांगतात.
२) शिक्षक फळ्यावर खडूने दोन्ही हातांचा वापर करून बाहुलीचे चित्र काढून दाखवतात. विद्यार्थ्यांना कृतीचे निरीक्षण करण्याच्या सूचना देतात. वहीवर आवडीप्रमाणे दोन्ही हाताने बाहुलीचे रेखाटन करायला प्रोत्साहित करतात. हीच कृती पुन्हा वेगाने करून घेतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी वहीवर चार बाय चार चे बिंदू काढतील आणि शिक्षकांच्या सूचनेप्रमाणे दोन्ही हातांचा एकदाच वापर करून सुरुवातीचे दोन बिंदू जोडून रेष क्रमांक एक काढतील तसेच नंतर रेष दोन, तीन, चार, पाच, सहा, सात अशा प्रकारे बिंदू जोडून आरशातील प्रतिमा तयार करतात.
२) विद्यार्थी दोन्ही हातात पेन धरून वहीवर बाहुली अथवा आवडीचे चित्र रेखाटतात. तीच कृती वेगाने करतात.
संदर्भ साहित्य :