कृषी अवजारे ओळख उपक्रम | कृषीविषयक साक्षरता-2 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव : कृषी अवजारे ओळख उपक्रम
पूर्वनियोजित कृती :
विद्यार्थ्यांमध्ये कृषीविषयक साक्षरता विकसित होण्यासाठी कृषी अवजारे ओळख उपक्रम आयोजित करतात.
या उपक्रमांतर्गत नियोजित करावयाच्या कृती -
१ ) शाळेमध्ये कृषी अवजारे यांचे प्रदर्शन भरवण्यासाठी आवश्यक जागा/वर्गखोली यांची उपलब्धता, तसेच कृषी अवजारे मांडणीचे नियोजन करणे.
२) प्रत्यक्ष भेट देऊन किंवा शाळेत मांडलेल्या प्रदर्शनातील शेतीसाठी वापरली जाणारी कृषी अवजारे यांचे निरीक्षण करणे.
३) शालेय परिसरातील परसबागेत वापरली जाणारी कृषी अवजारे याबाबत तज्ज्ञ व्यक्तींकडून दिग्दर्शन
करणे.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती: निरीक्षणक्षमता, वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा, चिकित्सकवृत्ती,
संप्रेषण कौशल्य, पर्यावरण संरक्षण व संवर्धन जागृती इत्यादी.
आवश्यक साहित्य : कृषी अवजारांची मांडणी करण्यासाठी लागणारे साहित्य (टेबल, खुर्ची इत्यादी)
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना कृषी अवजारे यांची ओळख होण्यासाठी शाळेमध्ये प्रदर्शन भरविण्यासाठी नियोजन करतात. शक्य असल्यास प्रत्यक्ष भेट देऊन कृषी अवजारे यांचे निरीक्षण करण्यासाठी नियोजन करतात.
२) शिक्षक विद्यार्थ्यांना रोपांची लागवड आणि त्यांची देखभाल यासाठी वापरली जाणारी कृषी अवजारे, यांचा वापर कसा करावा याबाबत प्राथमिक माहिती देतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी कृषी अवजारे यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करतात व माहिती मिळवतात.
२) शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार वर्गातील मोकळ्या जागेत फुलझाडे लावतात आणि त्यांची देखभाल करतात.
३) विद्यार्थी परिसरातील जमा होणाऱ्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी आवश्यक कृती करतात.
४) विद्यार्थी शालेय परसबागेतील औषधी वनस्पती व इतर झाडांची नावे सांगून त्यांची माहिती सांगतात.
संदर्भ साहित्य :
१) परसबाग तयार करण्यासंबंधीचे व्हिडिओ, माहिती पुस्तिका.