चला निसर्गमित्र बनूया | पर्यावरण संवर्धन-2 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रम : चला निसर्गमित्र बनूया
पूर्वनियोजित कृती :
• विद्यार्थ्यांसाठी 'चला निसर्गमित्र बनूया' या उपक्रमांतर्गत सर्पमित्राचे व्याख्यान आयोजित करणे.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती :
१) पर्यावरण संरक्षण जाणीवजागृती
२) वैज्ञानिक दृष्टिकोन
३) वैयक्तिक व सामाजिक जबाबदारीचे भान
४) संवाद
५) माहिती संकलन
६) नेतृत्व इत्यादी
आवश्यक साहित्य : खडू, फळा, प्रोजेक्टर इत्यादी.
शिक्षक कृती :
१) इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गातील जिज्ञासू व आवड असणाऱ्या विदयार्थ्यांचा सहभाग घेऊन निसर्गमित्र मंडळ स्थापना करतात. या मंडळामार्फत 'सर्पमित्र व्याख्यान' या पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन करतात.
२) परिसरातील सर्पमित्रांशी संपर्क साधून त्यांचे व्याख्यान/मुलाखतीचे आयोजन करतात व आवश्यक
पूर्वतयारी करतात.
३) शिक्षक विद्यार्थ्यांच्या मदतीने नियोजित शनिवारी व्याख्यानासाठी पोस्टर्स, घोषवाक्ये लावून वातावरण निर्मिती करतात.
४) सर्पमित्र विद्यार्थ्यांना सापांच्या जाती, सापांविषयी असलेल्या अंधश्रद्धा, सापांविषयी शास्त्रीय ज्ञान, सापांचे अन्नसाखळीतील महत्त्व, त्यांच्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन करतात. ५) सर्पमित्र विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करतात.
६) शिक्षक व्याख्यान संपल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिक माहितीचे संकलन करायला सांगतात व त्याविषयी सूचना देऊन समारोप करतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांच्या सूचनेनुसार उपक्रमामध्ये सक्रिय सहभागी होतात.
२) विदयार्थी व्याख्यान काळजीपूर्वक ऐकतात व शंका विचारतात.
३) विद्यार्थी निसर्गमित्र म्हणून स्वतःची भूमिका जाणून घेतात.
संदर्भ साहित्य :
१) इंटरनेटवरील माहिती
२) यूट्यूबवर उपलब्ध असणारे सुयोग्य व समर्पक व्हिडिओ.
३) ग्रंथालयात संबंधित विषयाचे उपलब्ध असणारी पुस्तके.
या उपक्रमाव्यतिरिक्त शिक्षक 'निसर्गमित्र' उपक्रमांतर्गत पुढील कृतीचे आयोजन करू शकतात.
१) सागरी मित्र या विषयावर व्याख्यान.
२) वृक्षमित्र उपक्रम
३) सापांच्या विविध जाती दाखविणारी पोस्टर्स तयार करणे व त्यांचे सादरीकरण.
४) 'निसर्गमित्र म्हणून माझी भूमिका' या विषयावर वर्तृत्व स्पर्धा आयोजन.
५) निसर्गमित्र अंतर्गत परिसर स्वच्छता व निर्माल्य संकलन उपक्रम इत्यादी.