उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव : माझ्या कमाईचे नियोजन
पूर्वनियोजित कृती :
शिक्षक विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून खादय मेळाव्याची तारीख, खाद्यपदार्थ, इतर सजावट याबाबत नियोजन करतात.
खादय मेळाव्यात जो खाद्यपदार्थ बनविणे शक्य असेल त्याची विद्यार्थिनिहाय यादी तयार करतात.
खादयपदार्थ खादय मेळाव्यासाठी ठेवण्यापूर्वी त्याला आलेला सगळा खर्च साहित्य खरेदी, बनविण्याची किंमत, एकूण खर्च खाद्यपदार्थ प्रत्येक प्लेट विक्री किंमत, एकूण विक्री किंमत, झालेला नफा/तोटा याची नोंद ठेवण्यास सांगतात.
मिळालेल्या नफ्याचे नियोजन २५% रक्कम एका दिवशीची घरात भाजी विकत घेणे. तसेच २५% रक्कम गरजूंना मदत करणे व उर्वरित रक्कम बचत करणे असे करायचे आहे असे सांगतात.
• यापैकी कोणी कसे नियोजन केले / खर्च केला याबाबत नोंद ठेवण्यास सांगतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती- बचत करण्याची सवय, बँकिंग व्यवहार कौशल्य
आवश्यक साहित्य : वही, पेन, बचत पुस्तक.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना खालील प्रश्न विचारतात.
• खादय मेळाव्यासाठी खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी किती खर्च आला ?
खादयपदार्थ विक्रीतून किती मिळकत झाली ?
नफा झाला की तोटा झाला?
किती रुपये नफा/तोटा झाला?
मिळालेल्या रकमेपैकी २५% रक्कम एका दिवसाची भाजी विकत घेणे तसेच २५% रक्कम गरजूंना मदत केल्यावर बचतीसाठी किती पैसे वाचतील?
२) ज्या विद्यार्थ्यांचा जास्त नफा झाला त्याचे कौतुक करतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी आनंद मेळाव्यात सहभागी होतात व विक्रीसाठी खाद्यपदार्थ ठेवतात. (उदा. पाणी-पुरी, भेळ, मिसळ पाव इत्यादी.)
• खाद्य मेळावा यासाठी खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी किती खर्च लागला हे सांगतात.
• खाद्यपदार्थ विक्रीतून किती मिळकत झाली हे सांगतात.
• नफा झाला की तोटा झाला हे सांगतात.
• किती रुपये नफा/तोटा झाला सांगतात.
मिळालेल्या रकमेपैकी २५% रक्कम एका दिवसाची भाजी विकत घेणे. तसेच २५% रक्कम गरजूला दान केल्यावर बचतीसाठी किती पैसे वाचतील याबाबत माहिती देतात.
२) ज्या विद्यार्थ्यांचा जास्त नफा झाला त्याचे टाळ्या वाजवून कौतुक करतात.
संदर्भ साहित्य :
https://youtu.be/9ZxpWI1rDTE?si=VBYfrxOzoJpK67ds