माहिती (डेटा) चा योग्य वापर | तंत्रज्ञान कौशल्य सायबर सुरक्षितता-2 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक: २
उपक्रमाचे नाव : माहिती (डेटा) चा योग्य वापर
१) पूर्वनियोजित कृती :
शिक्षक खालील घटकांचा स्वतः अभ्यास करतील.
• डेटा म्हणजे काय ?
• डेटा कुठून-कुठून प्राप्त होतो ?
• डेटाचे प्रकार कोणते ?
डेटा कसा साठवून ठेवता येतो?
डेटाचे वर्गीकरण, विश्लेषण कसे करावे ?
• डेटा उल्लंघन / गैरवापर याबद्दल अधिक माहिती मिळवतील, तसेच एक पीपीटी तयार करतील.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती- निरीक्षण, आत्मविश्वास, विश्वसनीयता, विद्यार्थी डेटा उल्लंघन
नेमके कसे होते? हे अचूक ओळखतात.
आवश्यक साहित्य : शिक्षकनिर्मित PowerPoint सादरीकरण, संगणक, मोबाइल
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना डेटा कशाला म्हणतात? प्राथमिक स्वरुपात पुरविलेली कच्ची माहिती मग ती ऑनलाइन असो वा ऑफलाइन याविषयी विद्यार्थ्यांना समजावून सांगतात याविषयी चर्चा घडवून आणतात.
२) डेटा कुठून कुठून प्राप्त होतो? फोन / मेसेज /इमेल/सर्वेक्षण/ऑनलाइन फॉर्म, प्रतिसाद
३) डेटाचे प्रकार किती? २, संख्यात्मक आणि गुणात्मक याबाबत स्पष्टीकरण करतात.
४) डेटा कसा साठवून ठेवता येतो? पोर्टलवर, ड्राईव्हवर, क्लाऊडवर याची प्रक्रिया सांगतात.
५) डेटाचे वर्गीकरण, विश्लेषण कसे होते? विविध सोफ्टवेअरद्वारा उदा. SPSS, Google फॉर्म, एक्सेल शीट याबाबत माहिती देतात.
६) डेटा उल्लंघन/गैरवापर कसे होते? वैयक्तिक कामासाठी, चोरी करण्यासाठी, त्रास देण्यासाठी, आर्थिक लूट करण्यासाठी.
७) त्याचा परीणाम काय होतो? वैराश्य, मनोविकृतपणा येणे, वाईट मार्गाला लागणे याबद्दल अधिक माहिती देतात.
विद्यार्थी कृती :
१) डेटा कशाला म्हणतात ? प्राथमिक स्वरूपात पुरविलेली कच्ची माहिती मग ती ऑनलाइन असो वा ऑफलाइन हे समजून घेतात व चर्चेत सहभाग घेतात.
२) डेटा कुठून-कुठून प्राप्त होतो? फोन / मेसेज/ इमेल/सर्वेक्षण/ऑनलाइन फॉर्म, प्रतिसाद याबाबत समजून घेतात.
३) डेटाचे प्रकार किती ? २- संख्यात्मक आणि गुणात्मक याबाबत समजून घेतात.
४) डेटा कसा साठवून ठेवता येतो? पोर्टलवर, ड्राईव्हवर, पोर्टवर, क्लाऊडवर याबाबत माहिती ऐकतात.
५) डेटाचे वर्गीकरण, विश्लेषण कसे होते? विविध सोफ्टवेअरद्वारा उदा. SPSS, Google फॉर्म, एक्सेल शीट.
६) डेटा उल्लंघन / गैरवापर कसे होते? वैयक्तिक कामासाठी, चोरी करण्यासाठी, त्रास देण्यासाठी, आर्थिक लूट करण्यासाठी याबाबत माहिती घेतात व चर्चा करतात.
७) त्याचा परीणाम काय होतो? डेटा कशाला म्हणतात? याविषयी समजून घेतात.
८) डेटा उल्लंघन कसे होते? याबद्दल अधिक जाणून घेतात.
संदर्भ साहित्य :
1) https://youtu.be/gPqaVBiQvRk?feature=shared